वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०२ पृ. ७
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९१
  • आपल्याला मंडळीची गरज आहे
    आमची राज्य सेवा—१९९५
  • मंडळीची उन्‍नती होवो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • तुम्ही दुसरीकडे राहायला जाणार आहात का?
    आमची राज्य सेवा—१९९९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ११/०२ पृ. ७

प्रश्‍न पेटी

▪ आपणे जेथे राहतो त्या क्षेत्रातील मंडळीत जाणे फायदेकारक का आहे?

मंडळीच्या व्यवस्थेद्वारे आपल्याला “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन” मिळते. (इब्री १०:२४, २५) मंडळीद्वारे आपण सत्य शिकतो आणि शिष्य बनवण्याची आपली नेमणूक पार पाडण्यासाठी आपल्याला सज्ज केले जाते. (मत्त. २८:१९, २०) परीक्षांत विश्‍वासूपणे टिकून राहण्याची बळकटी देखील आपल्याला मिळते आणि आपल्यावर येणारे अनेक दबाव व चिंता यांना यशस्वीरीत्या तोंड देण्यासाठी प्रेमळ पर्यवेक्षकांची योजना करण्यात येते. स्पष्टतः, मंडळी ही आपल्या आध्यात्मिक बचावासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. परंतु, आपण राहतो त्या क्षेत्रातील मंडळीत जाणे फायदेकारक आहे का?

प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि नोकरी, सत्यात नसलेला विवाह सोबती, वाहन व्यवस्था या सर्व गोष्टींच्या आधारावर एखादी व्यक्‍ती निर्णय घेईल. तरीपण, एखादी व्यक्‍ती राहते त्या क्षेत्रातील मंडळीत गेल्याने त्या व्यक्‍तीला निश्‍चितच आध्यात्मिक व इतरही लाभ होतात. एखाद्या तातडीच्या प्रसंगी मंडळीचे वडील जन लवकरात लवकर सर्व प्रचारकांशी संपर्क साधू शकतात. पूर्वीच्या प्रश्‍न पेटीत इतर अनेक फायदे दाखवण्यात आले आहेत.—जून १९९१, एप्रिल १९७६ (इंग्रजी) आणि मार्च १९६७ (इंग्रजी).

सहसा, जवळपासच्या सभांना जाणे अधिक सोयीस्कर असते; लवकर जाऊन आपण इतरांशी बोलू शकतो, काही काम असेल तर ते करू शकतो आणि सुरवातीच्या गीत व प्रार्थनेला उपस्थित राहू शकतो. आपल्याच भागात राहणाऱ्‍या नवीन लोकांना पुन्हा जाऊन भेट द्यायला आपल्याला अधिक सोपे जाते, त्यांच्याबरोबर आपण बायबल अभ्यास सुरू करू शकतो आणि त्यांनाही सोयीस्कर वाटणाऱ्‍या सभांना जाण्याचे मार्गदर्शन देऊ शकतो.

सर्व कुटुंब प्रमुख या गोष्टीवर प्रार्थनापूर्वक विचार करतील, आपल्या कुटुंबांचे आध्यात्मिक व शारीरिक कल्याण कशात आहे हे ते तोलून-मापून पाहतील अशी आमची खात्री आहे.—१ तीम. ५:८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा