आपल्याला मंडळीची गरज आहे
१ कोरहाच्या पुत्रांनी एकदा यहोवाच्या मंडळीकरता त्यांची गुणग्राहकता या शब्दात व्यक्त केली: “तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम आहे.” (स्तोत्र ८४:१०) त्यांच्याकरता, याच्या तुलनेत देण्यास जगाकडे काहीच नव्हते. तुम्हालाही तसेच वाटत असल्यास, तुम्ही मंडळीला तुमच्या जीवनातील केंद्रबिंदू केला पाहिजे.
२ ख्रिस्ती मंडळीची सुरवात झाल्यापासून, तिच्यावर यहोवाचा आशीर्वाद आहे हे तिने प्रादर्शित केले आहे. (प्रो. कृत्ये १६:४, ५) आपल्यातील कोणाही व्यक्तीने, मंडळीबद्दल कृतघ्न असू नये किंवा आपल्याला दैहिकरित्या एकत्र आणण्याचे हे केवळ एक माध्यम आहे असा विचार करू नये. प्रात्येक समाजात, मंडळी ही यहोवाच्या साक्षीदारांसाठी उत्तेजन व बळकटी मिळवण्याचे स्थान आहे. आपण यहोवाकडून शिकवलेले व्हावे व राज्य कार्यहालचालीसाठी संघटित व्हावे म्हणून ती संयुक्त सहवास पुरवते.—यश. २:२.
३ ख्रिस्ती मंडळी, आपल्याला सत्य शिकवण्याचे मूलभूत माध्यम आहे. (१ तीम. ३:१५) येशूचे अनुयायी हे ‘सर्व एक असले पाहिजेत’—ते देवाच्या, ख्रिस्ताच्या व एकमेकांच्या ऐक्यतेत असले पाहिजेत. (योहान १७:२०, २१; पडताळा यशया ५४:१३.) आपण जगात कोठेही गेलो, तरी आपले बांधव बायबलच्या शिकवणी व तत्त्वे यांवर विश्वास करतात व त्यानुरूप वागतात.
४ शिष्य बनवण्याची आपली नेमणूक पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्राशिक्षित व सुसज्ज केले जाते. शास्त्रवचनीय चर्चा सुरू करण्यात मदत करण्यासाठी, टेहळणी बुरूज, सावध राहा! व आमची राज्य सेवा दर महिन्याला मदतदायक माहिती देतात. आस्था कशी शोधावी व विकसित करावी हे आपल्याला दाखवले जावे अशा पद्धतीने सभा तयार केलेल्या असतात. जगभरात दिसून येणाऱ्या वाढीने या कार्यात आपल्याला स्वर्गीय पाठिंबा आहे हे सिद्ध होते.—मत्त. २८:१८-२०.
५ मंडळीद्वारे आपल्याला “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन” देणारी प्रोरणा दररोज मिळते. (इत्त्वी. १०:२४, २५) विश्वासूपणे परीक्षेत टिकून राहण्यास आपल्याला बळकट केले जाते. प्रोमळ पर्यवेक्षक परीक्षा व चिंतांना तोंड देण्यास आपली मदत करतात. (उप. ४:९-१२) आपल्याला बहकण्याचा धोका असल्यास, आवश्यक सल्ला दिला जातो. इतर कोणती संघटना अशी प्रोमळ काळजी पुरवते?—१ थेस्सलनी. ५:१४.
६ आपले ऐक्य टिकवून ठेवण्यास यहोवाच्या संघटनेशी जवळीक ठेवावी अशी त्याची इच्छा आहे. (योहा. १०:१६) विश्वासू दास वर्गाशी संपर्क साधण्यास मंडळी आपली मदत करते तो एक मार्ग म्हणजे, आपल्या उत्तेजनास्तव प्रावासी पर्यवेक्षकांना पाठवणे होय. आपण प्रोमळ मार्गदर्शनाला प्रातिसाद दिल्याने, आध्यात्मिकरित्या खंबीर राहण्यात आपली मदत करणाऱ्या जवळीकीत आपल्याला एकत्र आणले जाते.
७ आपल्याला आध्यात्मिकरित्या जिवंत राहण्यासाठी मंडळी अत्यावश्यक आहे. त्याशिवाय यहोवाची सेवा स्वीकारणीय पद्धतीने करणे अशक्य झाले असते. तर मग, यहोवाने जे काही पुरवले आहे त्याच्याशी आपण जवळीक राखू या. आपण तिच्या हेतूंच्या एकवाक्यतेत कार्य करू या व तेथे प्राप्त होणारा सल्ला प्रामाणिकपणे लागू करू या. मंडळीचा आपल्याकरता किती अर्थ होतो हे आपण केवळ याच प्राकारे दाखवू शकतो.—स्तोत्र २७:४.