घोषणा
▪ साहित्य सादरता नोव्हेंबर: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. लोकांकडे ही प्रकाशने आधीपासूनच असतील तर कोणतेही जुने प्रकाशन तुम्ही देऊ शकता. डिसेंबर: सर्व काळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. पर्यायी सादरता म्हणून, तुम्ही बायबल कथांचं माझं पुस्तक; बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी); तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल, ही पुस्तके देऊ शकता. मंडळीकडे या पर्यायी सादरतांचा साठा नसल्यास, तुमच्या जवळपासच्या मंडळीकडे जादा साठा आहे का याची विचारपूस करा जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडून काही पुस्तके घेऊ शकता. जानेवारी: मंडळीकडे साठा असलेले कोणतेही १९२ पानी पुस्तक. तुमच्या मंडळीकडे यांतील कोणतेही पुस्तक नसेल तर तुमच्या जवळपासच्या मंडळीकडे जुन्या प्रकाशनांचा जादा साठा आहे का अशी विचारपूस करा जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडून काही पुस्तके घेऊ शकता. ज्या मंडळ्यांकडे जुन्या पुस्तकांचा साठा नाही त्या मंडळ्या मानवजातीने केलेला देवाचा शोध (इंग्रजी) पुस्तक सादर करू शकतात. फेब्रुवारी: पुढील कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक सादर केले जाऊ शकते: चिरकाल टिकणारे ईश्वरी नाव (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करितो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, मेल्यावर आपले काय होते? (इंग्रजी). उचित असेल तेथे, आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—मदत अथवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी), युद्ध नसलेले जग असेल का? (इंग्रजी) व सर्व लोकांसाठी एक पुस्तक ही माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात.
▪ ज्या मंडळ्यांकडे, ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या शिक्षणाचा फायदा घ्या हे नवीन पुस्तक त्यांना समजणाऱ्या भाषांत उपलब्ध नसल्यास त्यांनी सन २००३ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा यात दिलेल्या माहितीचा आणि संदर्भ साहित्याचा उपयोग करावा. एखाद्या भाषणाच्या गुणावर आधारलेल्या पाच मिनिटांच्या भाषणासाठी ते, ईश्वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक ही पुस्तिका त्यांच्या भाषेत उपलब्ध असल्यास त्यातून साहित्य घेऊ शकतात.
▪ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने डिसेंबर १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. त्यानंतर मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.
▪ मंडळ्या जेव्हा त्यांच्या प्रमुख भाषेत साहित्यांची मागणी करतात तेव्हा त्यांनी लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मवर (S-14) “प्रमुख भाषा” असे शीर्षक असलेल्या रकान्यात त्या साहित्यांची संख्या लिहिली पाहिजे, आणि इंग्रजी भाषेत हव्या असलेल्या साहित्याची संख्या इंग्रजीसाठी असलेल्या रकान्यात लिहिली पाहिजे. इतर सर्व भाषांमध्ये हव्या असलेल्या प्रकाशनांची विनंती फॉर्मच्या पृष्ठ ३ वर लिहिली पाहिजे. एखाद्या मंडळीच्या बहुतेक सभा ज्या भाषेत होतात ती तिची प्रमुख भाषा असते हे कृपया लक्षात असू द्या. मंडळीच्या महिन्याच्या शिपिंग पावत्यांमध्ये मंडळीच्या क्रमांकाशेजारी मंडळीची प्रमुख भाषा दाखवण्यात आली आहे.
▪ विभागीय संमेलने, खास संमेलन दिवस, प्रांतीय अधिवेशने येथे चेकने दिलेल्या देणग्या, शाखा दफ्तराला पाठवलेले देणग्यांचे चेक, जगभरात होणाऱ्या कार्यासाठी असलेल्या तसेच राज्य सभागृह निधीसाठी असलेल्या स्थानीय राज्य सभागृहातील दानपेटीत टाकलेले चेक “द वॉचटावर सोसायटीला” देय असले पाहिजेत. रजिस्टर्ड पोस्टाचा शाखा दफ्तराचा वित्तीय पत्ता पुढीलप्रमाणे आहे: The Watch Tower Bible and Tract Society of India, c/o Post Master, Yelahanka P O, Bangalore 560 064 KAR.
▪ सोव्हियत युनियनमधील यहोवाचे साक्षीदार—परीक्षांत विश्वासू राहिले (इंग्रजी) या व्हिडिओची चर्चा फेब्रुवारी महिन्याच्या सेवा सभेत केली जाईल. ज्या मंडळ्यांना हा व्हिडिओ आपल्या पुस्तकालयासाठी हवा आहे त्या मंडळ्यांनी लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मवर (S-14) त्याची मागणी लवकरात लवकर करावी.
▪ वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स २००१ याच्या इंग्रजीतील मर्यादित प्रती उपलब्ध आहेत. प्रत्येक मंडळी आपल्या मंडळीच्या पुस्तकालयासाठी केवळ एकाच इंडेक्सची मागणी करू शकते आणि लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मवर “मंडळीसाठी” असे लिहिलेल्या रकान्यात याची स्पष्ट निशाणी करावी.
▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:
वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स २००१ —इंग्रजी
यहोवाचे गुणगान करा (लहान आकाराचे) —इंग्रजी
यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीसाठी प्रकाश २ —पंजाबी