वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०२ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००२
  • उपशिर्षक
  • नोव्हेंबर ११ ने सुरू होणारा सप्ताह
  • नोव्हेंबर १८ ने सुरू होणारा सप्ताह
  • नोव्हेंबर २५ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर २ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००२
km ११/०२ पृ. २

सेवा सभा आराखडा

नोव्हेंबर ११ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २७ (२२१)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून ऑक्टोबर-डिसेंबरचे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील पहिले) आणि नोव्हेंबर १५ चे टेहळणी बुरूज कसे सादर करावे त्याची दोन वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवा. एका प्रात्यक्षिकात, आपल्या जगभरातल्या कामाचा आर्थिक भार कसा उचलला जातो ते सांगा.—टेहळणी बुरूज पृष्ठ २ किंवा सावध राहा! पृष्ठ ५ पाहा.

१५ मि: खऱ्‍या उपासनेचे पाठीराखे—पूर्वी आणि आता. टेहळणी बुरूज, नोव्हेंबर १, २००२ पृष्ठे २६-३० वर आधारित भाषण.

२० मि: “तुमच्या मंडळीच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांना साहाय्य करणे.”a मंडळीचे पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक असलेल्या वडिलांनी हा भाग सादर करावा. परिच्छेद ३ ची चर्चा करताना सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तक उपलब्ध असल्यास त्यातल्या पृष्ठ ७० वरील मुद्द्‌यांचा चर्चेत समावेश करा. पुस्तक अभ्यास व्यवस्थेला मंडळीतले बंधूभगिनी ज्या विशिष्ट पद्धतीने सहकार्य देतात त्याबद्दल त्यांची प्रशंसा करा आणि कोणत्या क्षेत्रात सुधारणा करण्याची आवश्‍यकता आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधा.

गीत क्र. २३ (२००) आणि समाप्तीची प्रार्थना.

नोव्हेंबर १८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २१ (१९१)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. “सर्वोत्कृष्ट लेख!” या चौकोनाची चर्चा करा.

१० मि: प्रश्‍न पेटी. सुयोग्य वडिलांचे भाषण.

२५ मि: “कुटुंब प्रमुखांनो—आध्यात्मिक नित्यक्रम टिकवून ठेवा.” परिच्छेद १-३ वर संक्षिप्त प्रस्ताविक भाषण दिल्यानंतर परिच्छेद ४-१३ ची श्रोत्यांबरोबर चर्चा करा. वेळ असेल तर परिच्छेद ७, ८, ११ आणि १२ वाचा. एक अथवा दोन पालकांची मुलाखत घ्या. कोणत्या गोष्टीने त्यांच्या कुटुंबाला, आध्यात्मिक कार्यांचा सुनियोजित नित्यक्रम ठेवण्यास मदत केली आहे? यासाठी त्यांना कोणकोणते प्रयत्न करावे लागले? याचा त्यांना कशाप्रकारे लाभ झाला? परिच्छेद १४ वर संक्षिप्त विवेचने करून समारोप करा.

गीत क्र. २० (९३) आणि समाप्तीची प्रार्थना.

नोव्हेंबर २५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २२ (१३०)

१० मि: स्थानीय घोषणा. क्षेत्र सेवेत सोबत काम करणारे एक विवाहित जोडपे, पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून ऑक्टोबर-डिसेंबरचे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील तिसरे) आणि डिसेंबर १ चे टेहळणी बुरूज सादर करत असल्याचे प्रात्यक्षिक करून दाखवतात. पत्नी सावध राहा! नियतकालिक सादर करते आणि पती टेहळणी बुरूज सादर करतो.

१५ मि: “येशूविषयीचे सत्य जाहीर करणे.”b सेवा प्रशाला पुस्तक उपलब्ध असल्यास त्यातल्या पृष्ठ २७८ वरील काही मुद्द्‌यांचा समावेश करा. पुढील आठवडी सेवा सभेतील “सर्वात महत्त्वपूर्ण कार्यांसाठी आपल्याला निपुण बनवणारी प्रशाला” या भागासाठी सर्वांना आपले पाठ्यपुस्तक आणण्याचे उत्तेजन द्या.

२० मि: “‘पितृहीनांना’ ममता दाखवणे.” परिच्छेद १ आणि सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) खंड १, पृष्ठ ८१६ वर आधारित, पितृहीन मुलामुलींबद्दल यहोवाचा दृष्टिकोन काय आहे यावर तीन मिनिटांसाठी भाषण देऊन सुरवात करा. प्रश्‍न-उत्तराने उरलेल्या लेखाची चर्चा करा. बाकीचे जण कोणत्या व्यावहारिक मार्गांनी साहाय्य व उत्तेजन देऊ शकतात त्यावर जोर द्या. परिच्छेद ३-४ वर चर्चा करताना, सावध राहा! ऑक्टोबर ८, १९९५ पृष्ठे ८-९ वरील मुद्द्‌यांचा समावेश करा.

गीत क्र. १७ (१८७) आणि समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर २ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १० (८२)

८ मि: स्थानीय घोषणा. सर्व प्रचारकांना नोव्हेंबरचा त्यांचा क्षेत्र सेवेचा अहवाल देण्याची आठवण करून द्या. सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक सादर करताना वापरता येईल अशा सादरतेची संक्षिप्त उजळणी करा.—आमची राज्य सेवा जून १९९८ पृष्ठ ८ पाहा.

१२ मि: स्थानीय गरजा.

२५ मि: “सर्वात महत्त्वपूर्ण कार्यांसाठी आपल्याला निपुण बनवणारी प्रशाला.” प्रशाला पर्यवेक्षकांनी श्रोत्यांबरोबर चर्चा करून हा भाग पूर्ण करावा. जानेवारीपासून सुरू होणाऱ्‍या नवीन प्रशाला कार्यक्रमाबद्दल सर्वांची उत्सुकता वाढवा. आमची राज्य सेवा ऑक्टोबर २००२ च्या पुरवणीतील “सन २००३ साठी ईश्‍वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा” यातील वैशिष्ट्यांकडे श्रोत्यांचे लक्ष वेधा. सेवा प्रशाला पुस्तकाच्या पृष्ठ २८२ वर सांगितल्याप्रमाणे, या प्रशालेत दाखल होऊ इच्छिणाऱ्‍यांसाठी कोणत्या आवश्‍यकता आहेत ते सांगा आणि या प्रशालेत ज्यांनी आपले नाव अद्याप दाखल केलेले नाही त्यांना ते करायला उत्तेजन द्या.

गीत क्र. १५ (१२७) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा