सर्वोत्कृष्ट लेख!
सावध राहा! नियतकालिकातील काही जुने लेख सर्वोत्कृष्ट होते, याजशी तुम्ही सहमत नाहीत का?
“स्मरणशक्ती कशी वाढवावी?”
“दररोजच्या जीवनात स्त्रियांचा आदर करणे”
“नकारात्मक भावना—त्यांच्यावर मात कशी करता येईल?”
“तुम्ही व्याख्यान देऊ शकता!”
“तुम्ही कोणते मनोरंजन निवडाल?”
हे आणि यांसारखे असंख्य लेख १९९२ सालच्या सावध राहा! (इंग्रजी) नियतकालिकात आले होते. हे लेख जुने असल्यामुळे त्यांचा आता आपल्याला काही फायदा आहे का? नक्कीच आहे! सावध राहा! याचा १९९२ सालचा इंग्रजीतला बांधणी खंड तुम्हाला आताही मिळवता येऊ शकतो. ज्या प्रचारकांना हा खंड हवा आहे त्यांनी मंडळीच्या लिटरेचर सेवकाद्वारे त्याची आताच मागणी करावी.
हा बांधणी खंड आपल्या मंडळीच्या राज्य सभागृह पुस्तकालयात आहे की नाही हे ईश्वरशासित सेवा प्रशाला पर्यवेक्षकांनी पाहावे; नसल्यास, त्याची मागणी करावी.