मंडळीचे पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक व्यक्तिगत रस घेतात
१ मंडळीचे पुस्तक अभ्यास गट, ‘प्रत्येक व्यक्तीच्या आध्यात्मिक वाढीसंबंधाने अधिक व्यक्तिगत लक्ष देण्यामध्ये सहायता देतात. . . . येथे यहोवाच्या प्रेमळदयेची व त्याला त्याच्या लोकांबद्दल वाटणाऱ्या कळवळ्याची छटा दिसते.’ (om-MR पृ. ७५; यश. ४०:११) पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक अशी मदत देण्यात मुख्य भूमिका बजावतात.
२ पुस्तक अभ्यासात: पुस्तक अभ्यास गट हे मुद्दामहून लहान ठेवण्यात आले आहेत; यामुळे, पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक त्यांच्या गटातील सदस्यांशी चांगल्याप्रकारे परिचित होऊ शकतात. (नीति. २७:२३) सहसा, दर आठवडी अभ्यासाच्या आधी आणि नंतर बंधूभगिनींबरोबर मिसळण्याची संधी मिळते. अशाप्रकारे एका महिन्यात गटातील प्रत्येक व्यक्तीबरोबर ते बोलू शकतात. यामुळे पुस्तक अभ्यास गटातील सदस्य जेव्हा एखाद्या परीक्षेचा सामना करीत असतात किंवा त्यांना उत्तेजन हवे असते तेव्हा पर्यवेक्षकांबरोबर मोकळ्या मनाने बोलू शकतील.—यश. ३२:२.
३ पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक गटातील सर्वांना अभ्यासात भाग घेण्याचे उत्तेजन देण्याचा प्रयत्न करतात. असे ते, प्रेमळ आणि कोमलतेने अभ्यास संचालित करण्याद्वारे करतात. (१ थेस्सलनी. २:७, ८) चर्चेत सर्वांना, लहान मुलांनासुद्धा कसा भाग घेता येईल याचा ते विचार करतात. काहींना उत्तरे द्यायला लाज वाटत असेल तर ते अशा लोकांना खाजगीरित्या साहाय्य देतील; अभ्यासातले एखादे शास्त्रवचन वाचण्यासाठी किंवा एखाद्या परिच्छेदावर उत्तर देण्यासाठी ते आधीच त्यांना सांगतील. किंवा स्वतःच्या शब्दांत उत्तरे कशी द्यायची हे ते त्यांना दाखवतील.
४ पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांचा सहायक एक सेवा सेवक असेल तर पर्यवेक्षक त्याला दोन महिन्यातून एकदा अभ्यास संचालित करण्यास सांगतील. यामुळे, सहायक कशाप्रकारे अभ्यास संचलित करतो हे पाहण्याची व काही मार्गदर्शक सूचना देण्याची संधी पर्यवेक्षकाला मिळू शकते. कुठे मदत हवी आहे, सुधारणा करायची आहे ते पाहता येईल. शिकवण्याची कला सुधारण्यासाठी बांधवांना मदत करण्यासाठी किती ही उत्तम योजना!—तीत १:९.
५ क्षेत्र सेवेत: पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांच्या जबाबदाऱ्यांपैकी एक प्रमुख जबाबदारी म्हणजे, सुवार्तिक कार्यांत पुढाकार घेणे. (गण. २७:१६, १७) ते, गटाच्या साक्षकार्याकरता व्यावहारिक योजना आखतात आणि गटांतील सर्वांना क्षेत्र सेवेत आनंद घेता यावा म्हणून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. (इफिस. ४:११, १२) यासाठी, ते गटातील प्रत्येकाबरोबर सेवेत भाग घेण्याचे एक ध्येय ठेवतात. सेवेच्या एखाद्या पैलूत सुधारणा करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला एखाद्या अनुभवी प्रचारकाकडून मदत मिळण्याची व्यवस्था करण्यासाठी ते सेवा पर्यवेक्षकांबरोबर देखील विचारविनिमय करतात.
६ प्रेमळ मेंढपाळ: काही प्रचारक जे आपल्या परिस्थितीमुळे प्रचार कार्यात फार कमी भाग घेऊ शकतात अशांना मदत करण्यास पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांना आनंद वाटतो. ते याची खात्री करतात, की वाढत्या वयामुळे किंवा घराबाहेर पडू शकत नसल्यामुळे किंवा तात्पुरत्या काळासाठी गंभीरपणे आजारी पडल्यामुळे किंवा काहीतरी दुखापत झाल्यामुळे जे बंधूभगिनी क्षेत्र सेवेत मर्यादित भाग घेतात त्यांना याची जाणीव आहे, की अशी एक व्यवस्था आहे ज्यात ते एका महिन्यादरम्यान संपूर्ण एक तासाचा अहवाल घालू शकत नसले तरी, १५-१५ मिनिटांचा अहवाल घालू शकतात. (ही व्यवस्था कोणास लागू होऊ शकते हे मंडळीची सेवा समिती ठरवते.) पुस्तक अभ्यास गटात कोणी अक्रियाशील असेल तर अशा लोकांमध्येही ते रस घेऊन त्यांना पुन्हा एकवार मंडळीच्या कार्यात सक्रिय बनवण्यास मदत करतात.—लूक १५:४-७.
७ पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक घेत असलेल्या प्रेमळ आस्थेबद्दल आपण त्यांचे किती आभारी आहोत! ते देत असलेल्या या व्यक्तिगत मदतीमुळे सर्वांना “परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, . . . ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त” करण्यास साहाय्य मिळते.—इफिस. ४:१३.