आपल्या दिवसांतील ईशारेवजा उदाहरणांकडे लक्ष देण्याची विनम्र विनंती
आपल्या दिवसांतील ईशारेवजा उदाहरणे (इंग्रजी) या व्हिडिओत दाखवलेल्या बायबल आधारित नाटकातून धडा शिकून एकनिष्ठ राहण्याचा आपला निश्चय आपण सर्वजण आणखी पक्का करू शकतो. व्हिडिओ पाहण्याआधी कृपया गणना अध्याय २५ आणि शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) खंड २, पृष्ठ ४१९, परिच्छेद ३-५ वरील संबंधित माहिती वाचा. मग पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: मवाबी लोक कोण होते, आणि त्यांच्याबरोबर युद्ध छेडू नका असे यहोवाने मोशेला का सांगितले? (अनु. २:९) मवाबी लोकांद्वारे इस्राएल राष्ट्राचा नाश करण्याचे षडयंत्र बलामाने कसे रचले? वचनयुक्त देशात प्रवेश करण्याआधी पुष्कळ इस्राएली लोक एका महत्त्वपूर्ण परीक्षेत कसे अपयशी झाले हे आपण का विसरू नये?—१ करिंथ. १०:११, १२.
ईशारेवजा उदाहरणे व्हिडिओ पाहत असताना, विश्वासू सिद्ध होण्यासाठी व देवाची मर्जी संपादन करण्यासाठी आज आपण जीवनातील पुढील चार क्षेत्रांवर गंभीरपणे विचार केला पाहिजे. (१) मनोवृत्ती: काही इस्राएली लोकांनी यहोवा आणि त्याच्या व्यवस्था यांच्याबद्दल चुकीची मनोवृत्ती कशी दाखवली होती? आपण कोणती मनोवृत्ती दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे? (२) संगती: इस्राएली लोकांनी मवाबी लोकांबरोबर मैत्री का करू नये अशी यहोवाची इच्छा होती? (निर्ग. ३४:१२; नीति. १३:२०) आपण आपले मित्र सुज्ञपणे का निवडले पाहिजेत? (३) नैतिकता: वाईट संगतीमुळे जवळजवळ २३,००० इस्राएली लोकांनी कोणते गंभीर पाप केले? (१ करिंथ. १०:८) आज, कोणत्या आमिषांमुळे देवाच्या काही लोकांनी अनैतिक कार्ये केली व आपण स्वतःचे संरक्षण कशाप्रकारे करू शकतो? (४) उपासना: उपासनेच्या शुद्धतेच्या बाबतीत इस्राएली लोकांची कशाप्रकारे परीक्षा घेण्यात आली? आजही काही लोक मूर्तीपूजेच्या कोणत्या कावेबाज प्रकाराला बळी पडू शकतात पण ती कशी टाळता येऊ शकते?—कलस्सै. ३:५.
यामीन नैतिकरीत्या निष्ठावान राहिल्यामुळे त्याला कोणते प्रतिफळ मिळाले? या व्हिडिओद्वारे, नियमन मंडळ सर्व खऱ्या ख्रिश्चनांना कोणती विनम्र विनंती करू इच्छित आहे? तुम्ही एक कुटुंब प्रमुख असाल तर, तुमच्या कुटुंबाने हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा पाहणे सुज्ञपणाचे आहे असे तुम्हाला का वाटते?