वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०२ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००१
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km १०/०२ पृ. ८

मासिके कशी सादर कराल?

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“शेवटल्या काळात कठीण दिवस येतील अशी बायबलमध्ये भविष्यवाणी केली आहे. [२ तीमथ्य ३:१, ३ वाचा.] याचा पुरावा, संपूर्ण जगात, गुन्हेगारीच्या वाढलेल्या प्रमाणावरून मिळतो. पण समजा पोलिसच नसते तर परिस्थिती आणखी किती बिकट झाली असती याची कल्पना करा! सावध राहा! च्या या अंकात संपूर्ण जगभरातील पोलिसांना कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते त्याची चर्चा करण्यात आली आहे.”

टेहळणी बुरूज ऑक्टो. १५

“आज जगात इतक्या वाईट गोष्टी का घडत आहेत हे तुम्ही मुलांना कसे समजावून सांगाल? [उत्तरासाठी थांबा.] ‘दुष्टाईला जबाबदार कोण?’ या प्रश्‍नाचे उत्तर बायबलमध्ये देण्यात आले आहे. [१ योहान ५:१९ वाचा.] तो दुष्ट कोण होता आणि आपण त्याचा विरोध कसा करू शकतो हे समजायला टेहळणी बुरूज मासिकाचा हा अंक तुम्हाला मदत करील.”

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“पुष्कळ लोकांना अश्‍लील चित्रे पाहण्यात काही गैर नाही, हे केवळ एक प्रकारचे मनोरंजन आहे असे वाटते. इतर लोकांना वाटते, की पोर्नोग्राफीमुळे सर्वसामान्यपणे, लोकांवर, कुटुंबांवर व समाजावर वाईट परिणाम होतो. सावध राहा! याच्या या अंकात, पोर्नोग्राफीच्या संबंधाने असलेल्या बायबल तत्त्वांचे परिक्षण करण्यात आले आहे.” उदाहरण म्हणून, इफिसकर ४:१७-१९ वाचून दाखवा.

टेहळणी बुरूज नोव्हें. १

“पुष्कळ लोक इतरांबरोबर शांतीनं राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे म्हणावे तितके सोपे नाही याच्याशी तुम्ही नक्कीच सहमत असाल. [उत्तरासाठी थांबा.] असे का ते बायबल सांगते. [याकोब ३:२ वाचा.] या लेखात दाखवलं आहे, की क्षमा मागितल्यानं दोन्ही लोकांमध्ये पुन्हा एकदा शांती येते आणि ती टिकवून ठेवता येते.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा