सेवा सभा आराखडा
ऑक्टोबर १४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ११ (८५)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. आपल्या दिवसांतील ईशारेवजा उदाहरणे (इंग्रजी) व्हिडिओ पाहण्याआधी सर्वांना, ऑक्टोबर २८ ने सुरू होणाऱ्या सप्ताहाच्या सेवा सभेच्या तयारीकरता, गणना अध्याय २५ आणि शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), खंड २, पृष्ठ ४१९, परिच्छेद ३-५ वरील संबंधित माहिती वाचण्याचे प्रोत्साहन द्या. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून ऑक्टोबर-डिसेंबरचे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील पहिले) आणि ऑक्टोबर १५ चे टेहळणी बुरूज कसे सादर करायचे त्याची दोन प्रात्यक्षिके दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, “मी आधीच तुमच्या कामाशी सुपरिचित आहे,” या संभाषणाला खीळ घालणाऱ्या प्रतिक्रियेला हाताळण्याची वेगळी पद्धत दाखवा.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पुस्तिका, पृष्ठ १२.
१५ मि: एकट्या पालकांसमोर असलेली आव्हाने. एक वडील एक अथवा दोन एकट्या पालकांची (किंवा ज्यांचे विवाह सोबती साक्षीदार नाहीत अशांची) मुलाखत घेऊन त्यांना विचारतील, की मुलांना शिक्षण देण्याच्या, शिस्त लावण्याच्या व आध्यात्मिक मार्गदर्शन देण्याच्या बाबतीत त्यांना येणाऱ्या समस्यांना ते कशाप्रकारे तोंड देतात. ते कौटुंबिक जबाबदाऱ्या कशा हाताळतात आणि त्यासोबतच नियमितरीत्या सभांसाठी व क्षेत्रसेवेसाठी कसे येतात? कौटुंबिक सौख्यानंद पुस्तकाच्या पृष्ठे १०४-१० वरील काही सूचनांचा देखील उपयोग करा. पृष्ठे ११३-१५ वर दाखवल्याप्रमाणे, इतर जण अशा एकट्या पालकांना कशाप्रकारे मदत करू शकतात त्याचे काही व्यावहारिक मार्ग सांगा.
२० मि: “मंडळीचे पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक व्यक्तिगत रस घेतात.” पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक हा भाग प्रश्न-उत्तराने हाताळतील. सुरवातीला, पुस्तक अभ्यास व्यवस्था कशी सुरू झाली त्याचे संक्षिप्त वर्णन द्या. (jv २३७ परि. ४) दोन किंवा तीन प्रचारकांना, मंडळीच्या पुस्तक अभ्यासाद्वारे व्यक्तिगतरीत्या त्यांच्याकडे लक्ष कसे पुरवण्यात आले ते सांगण्याची व्यवस्था करा.
गीत क्र. २३ (२००) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर २१ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ४ (४३)
१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.
३५ मि: “बहुभाषिक क्षेत्रात शिष्य बनवणे.” भाषण व श्रोत्यांबरोबर चर्चा करून सेवा पर्यवेक्षकांनी हा भाग हाताळावा. परिच्छेद ८ ची चर्चा करताना दोन प्रचारकांचे एक प्रात्यक्षिक दाखवा ज्यात, एक प्रचारक आपला प्रगतीशील बायबल अभ्यास दुसऱ्या एका प्रचारकाला (ज्याला बायबल विद्यार्थ्याची भाषा येते) सोपवत आहे असे दाखवा. स्थानीय परिस्थितीनुसार, इतर भाषा बोलणाऱ्या मंडळीतल्या व बाहेरच्या लोकांना मदत कशाप्रकारे करता येते त्याचे संक्षिप्त वर्णन करा.
गीत क्र. २० (९३) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर २८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १६ (१४३)
८ मि: स्थानीय घोषणा. पुढच्या आठवड्याच्या सेवा सभेच्या तयारीसाठी सर्वांना गेल्या वर्षाच्या खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमाच्या त्यांनी घेतलेल्या टिपणींची उजळणी करून यायला सांगा. ऑक्टोबरचा सेवा अहवाल देण्याची सर्वांना आठवण करून द्या. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून एक बांधव ऑक्टोबर-डिसेंबरचे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील तिसरे) सादर करत असल्याचे आणि एक भगिनी नोव्हेंबर १ चे टेहळणी बुरूज सादर करत असल्याचे प्रात्यक्षिक दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकानंतर, सादरतेत उपयोगात आणलेल्या एखाद्या प्रभावी मुद्द्यावर थोडक्यात जोर द्या.
१२ मि: शाळेत सत्यासाठी दृढ भूमिका घेणे. एक अथवा दोन तरुण प्रचारकांची मुलाखत घ्या ज्यांना, सत्यात नसलेल्या वर्गसोबत्यांबरोबर जास्त मैत्री का करू नये हे माहीत आहे. राष्ट्रीय कार्यक्रम, शाळेतील नृत्याचे कार्यक्रम, शर्यती आणि असभ्य वर्तन यांद्वारे येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याचा व यांत सामील होण्याचा मोह टाळण्यासाठी ते कशारीतीने प्रयत्न करीत आहेत? शाळेत साक्ष देण्यासाठी ते कोणकोणत्या पद्धतींचा अवलंब करतात हेही सांगण्यास त्यांना उत्तेजन द्या.
२५ मि: “आपल्या दिवसांतील ईशारेवजा उदाहरणांकडे लक्ष देण्याची विनम्र विनंती.” एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून श्रोत्यांबरोबर लेखातील प्रत्येक प्रश्नावर चर्चा करा. डिसेंबर महिन्यात आपण रक्ताविना उपचार—वैद्यकशास्त्र आव्हान स्वीकारते (इंग्रजी) या व्हिडिओची उजळणी करणार आहोत.
गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर ४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ९ (३७)
१० मि: स्थानीय घोषणा. अपेक्षा माहितीपत्रक आणि ज्ञान पुस्तक सादर करण्यासाठी जानेवारी २००२ च्या आमची राज्य सेवा यातील पुरवणीत आलेल्या सूचनांची संक्षिप्त उजळणी करा. एका सादरतेचे प्रात्यक्षिक दाखवा.
१३ मि: सुवार्तेची लाज वाटत नाही. (रोम. १:१६) एक युवक आपल्या पित्याकडे एक समस्या घेऊन येतो. आपले मित्रजन आपली टिंगल करतील म्हणून त्यांना, मी यहोवाचा साक्षीदार आहे हे सांगू इच्छित नाही असे युवक म्हणतो. युवकाने आपल्या मनातली गोष्ट मोकळेपणाने सांगितल्याबद्दल पिता त्याचे आभार मानतो. समवयस्कांच्या दबावामुळे पेत्र एकदा कसा वागला होता हे पिता युवकाला सांगतो. (मत्त. २६:६९-७४) पिता पुढील सल्ला देतो: ख्रिस्ती यानात्याने आपण कोण आहोत हे सांगायला आपण केव्हाही लाजू नये. (मार्क ८:३८) शाळेत स्वतःची ओळख साक्षीदार म्हणून करून देणे फायदेकारक आहे. शिक्षकांना सांगितल्यावर अनेक शिक्षक तुमच्या धार्मिक विश्वासांचा आदर करतील आणि तुम्हाला आक्षेपार्ह वाटणाऱ्या अनेक कार्यांत गोवण्याचा प्रयत्न करणार नाहीत. तत्त्वशून्य युवक कदाचित तुमच्यावर त्यांच्याबरोबर बेशिस्तीने वागण्याचा दबाव आणणार नाहीत. इतर वर्गमित्रांना कदाचित लगेच समजू शकेल की तुम्ही, डेटिंग का करत नाही, शाळेच्या वेळानंतरच्या खेळांमध्ये किंवा शाळेनंतरच्या कार्यांत भाग का घेत नाही. वेळ अनुमती देते त्यानुसार पिता आणि युवक तरुणांचे प्रश्न पुस्तकातील ३१५-१८ पृष्ठांवरील “देवासोबत मैत्री असल्याचे जाहीररीत्या प्रकट करणे” या पोटमथळ्याखालील माहितीतून काही मुद्द्यांची चर्चा करतात. वडिलांकरवी मिळालेल्या या उत्तम सल्ल्याबद्दल युवक त्यांचे आभार मानतो.
२२ मि: देवाच्या अधीन व्हा—सैतानाला अडवा. (याको. ४:७) येथे दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करून एक वडील गेल्या सेवा वर्षादरम्यान भरलेल्या खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमाची श्रोत्यांबरोबर उत्साही चर्चा करतात. मंडळीतल्या बंधूभगिनींनी शिकलेल्या गोष्टींचा अवलंब कसा केला ते सांगण्याचे त्यांना आमंत्रण द्या. (आधीच एकेक भाग नेमला जाऊ शकतो.) पुढील कार्यक्रम भागांवर अधिक जोर द्या: (१) “गुलामगिरीच्या जगात देवाला अधीनता.” जगीक पाश टाळण्याच्या बाबतीत आपण हुशार का असले पाहिजे? (२) “कौटुंबिक सदस्य या नात्याने ईश्वरी अधीनता प्रदर्शित करणे.” यहोवाच्या संघटनेत कुटुंबातील नातेसंबंध मजबूत करण्याची तातडीची गरज का आहे? हे आपण कसे करू शकतो? (३) “यहोवाच्या बाजूने दृढ भूमिका घेण्यासाठी नवोदित शिष्यांना मदत करा.” आपल्या विश्वासाची परीक्षा घेणाऱ्या अडखळणांवर मात करायला आपण नवोदितांना कशाप्रकारे मदत करू शकतो? (४) “दियाबलाला अडवण्याचा काय अर्थ होतो.” दियाबलाविरुद्ध यशस्वीपणे उभे राहण्याची गुरूकिल्ली काय आहे? इफिसकर ६:११-१८ येथे वर्णन करण्यात आलेली आध्यात्मिक शस्त्रसामग्री आपले संरक्षण कसे करू शकते? (w९२ ५/१५ २१-३) (५) “दुष्टाचा यशस्वीपणे विरोध करणारे तरुण” आणि “ईश्वरी अधीनतेमुळे लाभ प्राप्त करणारे तरुण.” सैतानाच्या काही कुयुक्त्या कोणत्या आहेत ज्यांपासून तरुणांनी सावध राहिले पाहिजे? यहोवाच्या अधीन झाल्याने तरुणांना कोणती प्रतिफळे मिळतात? (w-MR९१ ९/१ ३०-३१, परि. १५-१७) (६) “ईश्वरी अधीनतेमुळे लाभ प्राप्त करत राहणे.” सरकारी अधिकाऱ्यांप्रती, नोकरीच्या ठिकाणी असलेल्या मालकांप्रती, कुटुंबात आणि ख्रिस्ती मंडळीत ख्रिस्ती जन अधीनता कशी दाखवतात ते सांगा. असे करण्यासाठी कोणते गुण आपल्याला मदत करतील?
गीत क्र. २४ (१८५) आणि समाप्तीची प्रार्थना.