वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०२ पृ. १
  • बहुभाषिक क्षेत्रात शिष्य बनवणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बहुभाषिक क्षेत्रात शिष्य बनवणे
  • आमची राज्य सेवा—२००२
आमची राज्य सेवा—२००२
km १०/०२ पृ. १

बहुभाषिक क्षेत्रात शिष्य बनवणे

१ सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी एका मोठ्या बहुभाषिक जनसमूहाला संभ्रमात टाकणारे भाषण ऐकायला मिळाले. त्यांनी म्हटले: “पाहा, हे बोलणारे सर्व गालीली ना? तर आपण प्रत्येक जण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे?” (प्रे. कृत्ये २:७, ८) यांतील काही ग्रीक किंवा इब्री भाषा बोलणारे असण्याची शक्यता असली तरी, आपल्या मातृभाषेत त्यांना सुवार्तेचा संदेश ऐकायला जास्त आवडला आणि ३,००० लोकांचा बाप्तिस्मा झाला.

२ आज भारतात, ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रचारक एकापेक्षा अधिक भाषा बोलल्या जाणाऱ्‍या मोठ्या शहरांमध्ये राहतात. शिवाय, काहींचे शिक्षण इंग्रजीत किंवा इतर भाषेत झालेले असते त्यामुळे ते त्या भाषेत संभाषण करणे पसंत करतात. इतर भाषेच्या आस्थेवाईक लोकांना प्रगती करण्यासाठी तुम्ही त्यांना मदत कशी करू शकाल? त्यांना त्यांच्या मातृभाषेत संदेश ऐकायला कसा मिळू शकतो? सभांचा त्यांना फायदा व्हावा म्हणून कोणत्या योजना केल्या जाऊ शकतात?

३ अन्य भाषा बोलण्याचे दान आज कोणाला नसले तरीसुद्धा, देवाचा पवित्र आत्मा त्याच्या पृथ्वीवरील संघटनेवर कार्यरत आहे; ही संघटना एकाच वेळी अनेक भाषांत प्रकाशने तयार करते. त्यामुळे, स्थानीय भाषेचे कमी ज्ञान असलेल्यांना संपूर्ण कार्यक्रम समजू शकतो.

४ काही मंडळ्यांमध्ये वडिलांनी, कार्यक्रमांचे भाषांतर करण्याद्वारे दोन भाषेच्या लोकांकरता सभा चालवण्याचे ठरवले आहे. सभांचे भाषांतर होत असताना, वक्‍त्‌याला एखादा वाद किंवा एखादा मुद्दा सलग समजावता येत नाही. अगदी अनुभवी भाषांतरकार असला तरीसुद्धा, प्रस्तुत करण्याची जी माहिती असते त्यांपैकी केवळ ६० टक्के माहितीच सादर केली जाऊ शकते; याचा अर्थ मंडळीतल्या श्रोत्यांना पुष्कळ मौल्यवान आध्यात्मिक अन्‍नाला मुकावे लागते.

५ कधीकधी, काही जण प्रचारकांना सभांमध्ये कोणत्याही भाषेत उत्तरे द्यायला किंवा सभांमधले भाग हाताळायला सांगतात. यामुळे पहिल्या शतकात जशी परिस्थिती उद्‌भवली होती तशी परिस्थिती उद्‌भवू शकते: “सर्वच लोक जर निरनिराळ्या भाषा बोलू लागले, आणि अशिक्षित किंवा विश्‍वास न ठेवणारे लोक आत आले, तर तुम्ही वेडे आहा असे ते म्हणणार नाहीत काय?” (१ करिंथ. १४:२३) याऐवजी पौलाने सभा चालवण्यासाठी एक सुनियोजित व्यवस्था सांगितली जेणेकरून उपस्थित असलेल्या सर्वांना ती समजेल.—१ करिंथ. १४:२६-४०.

६ अतिरिक्‍त भाषेत एक नवीन मंडळी स्थापन करण्याच्या दिशेने टप्प्याटप्प्याने प्रगती करण्याचे उत्तेजन देणे अधिक चांगले आहे. एखाद्या योग्यता-प्राप्त बांधवाला एका विशिष्ट भाषेचे चांगल्याप्रकारे ज्ञान असेल आणि त्याच भाषेचे अनेक लोक सभांना उपस्थित राहत असतील तर वडील जन पुढील मार्गदर्शनासाठी शाखा दफ्तराला लिहू शकतात.

७ परंतु पुष्कळवेळा असे होते, की या लोकांना स्थानीय भाषा देखील बोलता येते; इतकेच नव्हे तर ते पूर्ण आत्मविश्‍वासाने ती भाषा बोलूही शकतात. अशावेळी, या बंधूभगिनींना, केवळ एखाद्या विशिष्ट भाषेचा गर्व असल्यामुळे किंवा दुसरी भाषा बोलण्याची इच्छा नसल्यामुळे एका नवीन भाषेचा गट बनवण्याऐवजी त्यांना आहे त्याच भाषेचे ज्ञान वाढवण्याचे उत्तेजन देणे उचित ठरेल. प्रामाणिक अंतःकरणाचे लोक सत्याच्या संदेशाकडे आकर्षित होतात आणि त्यांना समजेल अशा कोणत्याही भाषेत ते सत्य शिकायला तयार असतात.

८ दुसऱ्‍या भाषेचे गट तयार झाल्यावर मग मंडळीतील सर्वजण त्यांना भेटणाऱ्‍या आस्थेवाईक लोकांना, त्यांच्या भाषेत ज्या सभा होतात, त्या जराशा दूर असल्या तरी तेथे जाण्याचे उत्तेजन देऊ शकतात. घरमालक जी भाषा बोलतो ती भाषा तुम्हाला चांगल्याप्रकारे बोलता येत असली तरीसुद्धा, घरमालक बोलत असलेल्या भाषेत चालणाऱ्‍या मंडळीतल्या एखाद्या योग्य प्रचारकाला तुम्ही त्या घरमालकाकडे नेऊ शकता. हा प्रचारक मग त्यांना प्रगती करण्याचे आणि मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याचे पुढेही उत्तेजन देऊ शकतो.

९ तुम्हाला असे क्षेत्र माहीत असेल की जेथे बहुतेक लोक दुसरी भाषा बोलतात तर मग तुमच्या स्थानीय वडिलांना हे कळवा. वडील कदाचित मग हे क्षेत्र, ती भाषा बोलणाऱ्‍या जवळपासच्या मंडळीला सोपवण्याचा निर्णय घेतील. मंडळ्यांमध्ये चांगले सहकार्य असले पाहिजे. तुमची भाषा चांगल्याप्रकारे समजू शकणारे, पसंत करणारे लोक ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रात सेवा करण्यावर तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.

१० कधीकधी काही पालकांना स्वतःच्या मातृभाषेतील सभांना जायला आवडते पण त्यांच्या मुलांचे इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे त्यांना इंग्रजीतील सभांना जायला आवडते. यासाठी काही मंडळ्यांमध्ये, एकाच वेळी परंतु वेगवेगळ्या खोल्यांमध्ये दोन टेहळणी बुरूज अभ्यास होतात. तुमची मुले जर दुसऱ्‍या खोलीत बसली आहेत, तर पालकांनो तुम्हाला, आपली मुले सभेत चांगल्याप्रकारे भाग घेत आहेत की नाही, आध्यात्मिक प्रगती करीत आहेत की नाही हे कळणार नाही. या कारणास्तव कुटुंबांनी एकत्र मिळून आध्यात्मिक शिक्षण कोणत्या भाषेत घ्यायचे हे ठरवावे आणि त्या भाषेत ऐक्याने ईश्‍वरशासित कार्यांत भाग घ्यावा. काही कुटुंबांनी केवळ आपल्या मुलांसाठी इंग्रजी भाषा बोलणाऱ्‍या मंडळीत जाण्यास सुरवात केली आहे.

११ या सूचनांचे पालन केल्यास सर्वांना संपूर्ण ईश्‍वरशासित शिक्षणाचा पुरेपूर फायदा मिळवता येईल. नवीन लोक स्वतःच्या भाषेत सुवार्ता ऐकतील आणि यांत काय काय गोवले आहे हे समजून घेतील तेव्हा तेही आपला महान शिक्षक यहोवा देव याची स्तुती करायला प्रवृत्त होतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा