सन २००३ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा
सूचना
सन २००३ मध्ये ईश्वरशासित सेवा प्रशाला पुढील व्यवस्थांनुरूप चालवली जाईल.
मूळ-पाठ: द होली बायबल मराठी—आर. व्ही. [bsi], टेहळणी बुरूज [w-MR], ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या शिक्षणाचा फायदा घ्या [be], ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित आणि लाभदायक’ (१९९० आवृत्ती) [si], शास्त्रवचनांतून युक्तिवाद करणे (१९८९ आवृत्ती) [rs], सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान [kl-MR] आणि कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य [fy-MR].
शास्त्रवचनांतून युक्तिवाद करणे हे पुस्तक उपलब्ध नसल्यास अतिरिक्त संदर्भ देण्यात आले आहेत.
प्रशालेची सुरवात, गीत, प्रार्थना आणि स्वागतपर शब्दांनी वेळेवर झाली पाहिजे व ती पुढीलप्रमाणे व्हावी:
भाषणाचा गुण: ५ मिनिटे. शाळा पर्यवेक्षक, साहाय्यक सल्लागार किंवा दुसरे एखादे योग्यताप्राप्त वडील, सेवा प्रशाला पाठ्यपुस्तकावर आधारित असलेल्या एखाद्या भाषणाच्या गुणाची चर्चा करतील. (कमी वडील असलेल्या मंडळ्यांत, योग्यताप्राप्त सेवा सेवकाचा उपयोग केला जाऊ शकतो.) अन्यथा सूचित नसल्यास, नेमलेल्या पानांवरील चौकोनातील माहितीसुद्धा चर्चेत समाविष्ट केली जावी. प्रश्न करू नयेत. हे खासकरून व्यक्तिगत व खाजगी सल्ल्यासाठी आहेत.
नेमणूक क्र. १: १० मिनिटे. वडील किंवा सेवा सेवकांकरवी ही नेमणूक हाताळली जावी आणि ती टेहळणी बुरूज, ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या शिक्षणाचा फायदा घ्या किंवा ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित आणि लाभदायक’ यावर आधारलेली असेल. हा भाग दहा मिनिटांच्या बोधप्रद भाषणाच्या रूपात सादर केला जावा आणि त्यानंतर उजळणी प्रश्न विचारू नयेत. केवळ दिलेले साहित्य सादर करणे हा या मागील हेतू नसावा तर त्या माहितीच्या व्यावहारिक मूल्यावर लक्ष केंद्रित करून मंडळीस अत्यंत सहायक ठरणारे मुद्दे ठळकपणे मांडणे हा असावा. आराखड्यात दिलेले शीर्षक वापरावे. या भाषणाची नेमणूक मिळालेल्या बांधवांनी आपले भाषण मर्यादित वेळेमध्ये संपवण्याची दक्षता घ्यावी. आवश्यक असल्यास खासगी सूचना दिल्या जाऊ शकतात.
बायबल वाचनातील ठळक मुद्दे: १० मिनिटे. एखाद्या योग्यताप्राप्त वडिलांनी अथवा सेवा सेवकांनी, सुरवातीच्या सहा मिनिटांसाठी दिलेले साहित्य स्थानीय गरजांना प्रभावीपणे लागू केले पाहिजे. आठवड्यासाठी नेमलेल्या बायबल वाचनाच्या कोणत्याही भागावर ते विवेचन मांडू शकतात कारण नेमणूक क्रमांक २ हाताळणारा बांधव त्यांनी वाचलेल्या वचनांवर काहीही विवेचन मांडणार नाही. पण त्यांनी वाचनाचा केवळ एक सारांश देऊ नये. या भागाचा प्रमुख हेतू, ही माहिती आपल्याकरता का व कशाप्रकारे महत्त्वाची आहे, हे जाणण्यास श्रोत्यांना साहाय्य करणे हा आहे. त्यानंतर, उरलेली चार मिनिटे वक्ता श्रोत्यांना, पुढील दोन प्रश्नांवर संक्षिप्त टिपणी (३० किंवा त्याहूनही कमी सेकंद) देण्याचे आमंत्रण देईल: “या आठवड्याच्या बायबल वाचनात तुम्हाला कोणता मुद्दा आढळला जो तुम्हाला तुमच्या सेवेत किंवा तुमच्या जीवनशैलीत लाभदायक ठरू शकतो?” आणि “कोणत्या गोष्टीमुळे यहोवावरील तुमचा विश्वास मजबूत झाला व त्याच्याबद्दलची कदर वाढली?” यानंतर मग प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गात पाठवतील.
नेमणूक क्रमांक २: ४ मिनिटे. वाचनाची ही नेमणूक एखाद्या बांधवाला दिली जावी. हे वाचन सहसा बायबलच्या भागाचे असेल. महिन्यातून एकदा, या नेमणुकीत टेहळणी बुरूज मधील भागाचे वाचन केले जाईल. नेमलेला भाग प्रस्तावना किंवा समारोप न देता विद्यार्थ्याने नुसताच वाचावा. दर आठवडी वाचनाचा भाग कमी-अधिक असेल; पण तरीसुद्धा चार मिनिटे किंवा कमी वेळात तो वाचून पूर्ण झाला पाहिजे. प्रशाला पर्यवेक्षकांनी भाग नेमण्याआधी त्यावर एक नजर टाकावी, विद्यार्थ्याचे वय आणि क्षमता लक्षात घेऊन मग तो नेमावा. प्रशाला पर्यवेक्षक खासकरून विद्यार्थ्याला, नेमलेल्या भागाचा अर्थ समजून, अस्खलितपणे, उचित ठिकाणी जोर देऊन, आवाजात योग्य चढउतार आणून, उचित ठिकाणी थांबून, आणि सहजपणे वाचण्यात मदत करण्यास उत्सुक असतील.
नेमणूक क्रमांक ३: ५ मिनिटे. ही नेमणूक भगिनीला नेमून देण्यात येईल. ही नेमणूक मिळालेली भगिनी, स्वतः एखादे दृश्य निवडेल अथवा सेवा प्रशाला पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ ८२ वरील यादीतील एखादे दृश्य तिला नेमले जाईल. विद्यार्थीनीने, नेमलेला विषय वापरावा आणि तो विषय, स्थानीय मंडळीच्या क्षेत्रात वास्तविक आणि व्यावहारिक ठरेल अशा क्षेत्र सेवेतील एखाद्या पैलूला लागू करावा. मूळ-पाठ सूचित करणारा संदर्भ नसतो तेव्हा विद्यार्थीनीला विश्वासू व बुद्धिमान दासाने पुरवलेल्या प्रकाशनांतून संशोधन करून तिच्या भाषणासाठी माहिती गोळा करावी लागेल. नवीन विद्यार्थ्यांना, ज्या भाषणांना संदर्भ दिलेले आहेत अशी भाषणे नेमावीत. विद्यार्थीनी साहित्य कशाप्रकारे मांडते आणि घरमालकाला शास्त्रवचनांवर तर्क करायला तसेच सादरतेतील मुख्य मुद्दे समजायला कशाप्रकारे मदत करते ते शाळा पर्यवेक्षक खासकरून पाहतील. ज्या विद्यार्थिनीला हा भाग नेमला जातो तिला वाचता आले पाहिजे. शाळा पर्यवेक्षक विद्यार्थिनीला एक साहाय्यकही नेमतील.
नेमणूक क्रमांक ४: ५ मिनिटे. विद्यार्थ्याने, दिलेल्या विषयावर भाषण तयार करावे. मूळ-पाठ सूचित करणारा संदर्भ नसतो तेव्हा विद्यार्थिनीला विश्वासू व बुद्धिमान दासाने पुरवलेल्या प्रकाशनांतून संशोधन करून तिच्या भाषणासाठी माहिती गोळा करावी लागेल. हा भाग एखाद्या बांधवाला नेमला जातो तेव्हा तो, राज्य सभागृहातील श्रोत्यांना उद्देशून भाषणाच्या रूपात सादर करता येईल. किंवा, भाषणाच्या विशिष्ट गुणावर विद्यार्थ्याला प्रगती करायची असल्यामुळे एखादा बांधव, क्षेत्र सेवेतील एखादे दृश्य रचून हा भाग हाताळू शकतो असे प्रशाला पर्यवेक्षक कदाचित सुचवतील. एखाद्या भगिनीला हा भाग नेमल्यास तिने तो नेमणूक क्रमांक ३ च्या पद्धतीने सादर करावा. चौफुली चिन्ह असलेले विषय, केवळ बांधवांना नेमले जावेत व ते भाषण-रूपात सादर केले जावेत याची कृपया नोंद घ्या.
वेळ: कोणतेही भाषण किंवा सल्लागाराचे शेरे जादा वेळ असू नयेत. नेमणूक क्रमांक २ ते ४, वेळ पूर्ण होते तेव्हा विचारशीलपणे थांबवले पाहिजेत. भाषणाच्या एखाद्या गुणावर सुरवातीचे भाषण देणारे बांधव, नेमणूक क्रमांक १ करणारे किंवा बायबल वाचनाचे ठळक मुद्दे सादर करणारे बांधव जादा वेळ घेत असतील तर त्यांना खासगीत सल्ला द्यावा. सहभाग घेणाऱ्या सर्वांनी आपल्या वेळेकडे विशेष लक्ष द्यावे. कार्यक्रमाची एकूण वेळ: गीत व प्रार्थना सोडून ४५ मिनिटे आहे.
सल्ला: १ मिनिट. विद्यार्थ्याने दिलेल्या भाषणातील एखाद्या प्रशंसनीय मुद्द्यावर सकारात्मक अभिप्राय देण्याकरता प्रशाला पर्यवेक्षकांनी एक मिनिटापेक्षा अधिक वेळ घेऊ नये. “भाषण खूप चांगले होते,” फक्त असे म्हणण्याचा प्रशाला पर्यवेक्षकांचा हेतू नसतो तर विद्यार्थ्याने दिलेल्या भाषणातील तो पैलू प्रभावी असण्यामागच्या विशिष्ट कारणांकडे श्रोत्यांचे लक्ष आकर्षित करणे हा असतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार, सभा संपल्यावर किंवा इतर वेळी खासगीत अतिरिक्त सकारात्मक सल्ला दिला जाऊ शकतो.
साहाय्यक सल्लागार: प्रशाला पर्यवेक्षकांच्या व्यतिरिक्त आणखी एखादा योग्यताप्राप्त वडील उपलब्ध असल्यास, वडील वर्ग त्याला सहायक सल्लागार म्हणून नेमू शकतात. साहाय्यक सल्लागाराची जबाबदारी, आवश्यक असेल तर नेमणूक क्रमांक १ आणि बायबल वाचनाचे ठळक मुद्दे सादर करणाऱ्या बांधवांना खासगी सल्ला देणे ही असेल. परंतु सह वडिलांच्या किंवा सेवा सेवकांच्या प्रत्येक भाषणानंतर त्याने सल्ला देणे आवश्यक नाही. ही योजना २००३ दरम्यान चालू होईल आणि पुढे कदाचित त्यात काही फेरबदल केले जातील.
काऊंसल फॉर्म: पाठ्यपुस्तकात आहे.
तोंडी उजळणी: ३० मिनिटे. दर दोन महिन्यांनंतर प्रशाला पर्यवेक्षक एक तोंडी उजळणी घेतील. भाषणाच्या एखाद्या गुणाची चर्चा केल्यानंतर व वर सांगितल्याप्रमाणे बायबल वाचनाच्या ठळक मुद्द्यांची चर्चा केल्यानंतर ही उजळणी असेल. तोंडी उजळणी, गेल्या दोन महिन्यांच्या आणि चालू आठवड्याच्या शाळेत चर्चिलेल्या विषयांवर आधारित असेल.
आराखडा
जाने. ६ बायबल वाचन: मत्तय १-६ गीत २१ (१९१)
भाषणाचा गुण: ईश्वरशासित सेवा प्रशालेत स्वागत (be पृ. ५ परि. १-पृ. ८ परि. १)
क्र. १: देवाचे वचन प्रिय माना (be पृ. ९ परि. १-५)
क्र. २: मत्तय ४:१-२२
क्र. ३: शेवटल्या दिवसांच्या चिन्हाचा खऱ्या ख्रिश्चनांवर कोणता परिणाम होतो? (rs पृ. २३८ परि. २-३; kl-MR अध्याय ११ परि. ३, ४, १७)
क्र. ४: येशू आता काय करत आहे?
जाने. १३ बायबल वाचन: मत्तय ७-११ गीत ५ (४६)
भाषणाचा गुण: बायबल दररोज वाचा (be पृ. १० परि. १-पृ. १२ परि. ४)
क्र. १: “असे धावा” (w-MR०१ १/१ पृष्ठे २८-३१)
क्र. २: मत्तय ९:९-३१
क्र. ३: आपण इतरांना प्रचार का करतो
क्र. ४: १९१४ साली शेवटल्या दिवसांची सुरवात झाली असे यहोवाचे साक्षीदार का म्हणतात? (rs पृ. २३९ परि. २-पृ. २४० परि. १; kl-MR अध्याय ११ परि. २, ५-१४, १६))
जाने. २० बायबल वाचन: मत्तय १२-१५ गीत ३ (३२)
भाषणाचा गुण: अस्खलित वाचन (be पृ. ८३ परि. १-५)
क्र. १: निराशेवर औषध आहे! (w-MR०१ २/१ पृष्ठे २०-३)
क्र. २: मत्तय १३:१-२३
क्र. ३: सध्याच्या जगिक व्यवस्थेचा अंत झाल्यावर कोणी पृथ्वीवर जिवंत असेल का? (rs पृ. २४० परि. २-५; kl-MR अध्याय १९ परि. ६, १०)
क्र. ४: देव बदलतो का?
जाने. २७ बायबल वाचन: मत्तय १६-२१ गीत १८ (१६२)
भाषणाचा गुण: अस्खलित कसे वाचायचे (be पृ. ८४ परि. १-पृ. ८५ परि. ३)
क्र. १: समयाची क्षणभंगुरता (si पृष्ठे २७८-९ परि. १-६)
क्र. २: w-MR०१ १/१५ पृ. २० परि. २०-पृ. २१ परि. २४
क्र. ३: कशामुळे जगात ऐक्य येईल?
क्र. ४: दुष्टाईचा नाश करण्याआधी देवाने इतका वेळ का जाऊ दिला आहे? (rs पृ. २४१ परि. १-३; kl-MR अध्याय ८ परि. ८-११, १४, १५)
फेब्रु. ३ बायबल वाचन: मत्तय २२-२५ गीत १६ (१४३)
भाषणाचा गुण: शब्दांचा स्पष्ट उच्चार करणे (be पृ. ८६ परि. १-६)
क्र. १: “तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा” (be पृ. १३ परि. १-पृ. १४ परि. ५)
क्र. २: मत्तय २२:१५-४०
क्र. ३: कशावरून शेवटल्या काळाचे चिन्ह आपल्या काळाला लागू होते (rs पृ. २४१ परि. ५-पृ. २४२ परि. २; kl-MR अध्याय ११ परि. १, २, १६ आणि पृष्ठ १०२ वरील पेटी)
क्र. ४: विश्वासू आणि बुद्धिमान दास कोण आहे?
फेब्रु. १० बायबल वाचन: मत्तय २६-२८ गीत ४ (४३)
भाषणाचा गुण: स्पष्ट कसे बोलावे (be पृ. ८७ परि. १-पृ. ८८ परि. ३)
क्र. १: खऱ्या सुखाचे रहस्य काय (w-MR०१ ३/१ पृष्ठे ४-७)
क्र. २: मत्तय २६:६-३०
क्र. ३: मी ड्रग्ज का घेत नाही
क्र. ४: मानवी जीवनाचा उद्देश काय आहे? (rs पृ. २४३ परि. ३-पृ. २४४ परि. ४; kl-MR अध्याय १ परि. २, ८-१०)
फेब्रु. १७ बायबल वाचन: मार्क १-४ गीत ११ (८५)
भाषणाचा गुण: उचित उच्चार—विचार करण्याजोगी कारणे (be पृ. ८९ परि. १-पृ. ९० परि. २)
क्र. १: बायबलच्या काळातील दर्शके (si पृष्ठे २७९-८० परि. ७-१३)
क्र. २: w-MR०१ २/१५ पृ. २५ परि. १०-पृ. २६ परि. १४
क्र. ३: मानवांनी काही काळ जगून शेवटी मरावे म्हणून त्यांना निर्माण करण्यात आले होते का? (rs पृ. २४५ परि. १-३; kl-MR अध्याय १ परि. ६, ७, ९)
क्र. ४: जुगार खेळणे चुकीचे का आहे
फेब्रु. २४ बायबल वाचन: मार्क ५-८ गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: उच्चार सुधारण्याचे मार्ग (be पृ. ९० परि. ३-पृ. ९२)
तोंडी उजळणी
मार्च ३ बायबल वाचन: मार्क ९-१२ गीत ८ (५३)
भाषणाचा गुण: अस्खलितपणे भाषण देणे (be पृ. ९३ परि. १-पृ. ९४ परि. ३)
क्र. १: चर्चा, संमेलने व अधिवेशने येथील भाषणे ऐकणे (be पृ. १५ परि. १-पृ. १६ परि. ५)
क्र. २: मार्क १०:१-२२
क्र. ३: आपण देवाकडून शक्ती कशाप्रकारे मिळवू शकतो
क्र. ४: कशाच्या आधारावर आपण सदासर्वदा जिवंत राहण्याची आशा बाळगू शकतो? (rs पृ. २४६ परि. ५-७; kl-MR अध्याय ७ परि. १७-२०)
मार्च १० बायबल वाचन: मार्क १३-१६ गीत १७ (१८७)
भाषणाचा गुण: अस्खलितपणात सुधारणा कशी करता येईल (be पृ. ९४ परि. ४-पृ. ९६ परि. ३, पृ. ९५ वरील कोष्टक सोडून)
क्र. १: आध्यात्मिक परादीस काय आहे? (w-MR०१ ३/१ पृष्ठे ८-११)
क्र. २: मार्क १३:१-२३
क्र. ३: भवितव्यातील जीवनाची आशा कशाप्रकारे पूर्ण होईल? (rs पृ. २४६ परि. ८-पृ. २४७ परि. १; kl-MR अध्याय ९ परि. १५-१८)
क्र. ४: मानवांच्या युद्धात देव पक्ष घेतो का?
मार्च १७ बायबल वाचन: लूक १-३ गीत १ (१३)
भाषणाचा गुण: तोतरेपणावर मात करणे (be पृ. ९५, कोष्टक)
क्र. १: ‘ज्याला बुद्धी प्राप्त होते तो मनुष्य धन्य’ (w-MR०१ ३/१५ पृष्ठे २५-८)
क्र. २: लूक ३:१-२२
क्र. ३: येशूची उपासना करणे उचित आहे का?
क्र. ४: aकायदेशीर नियमांनुसार विवाह करणे महत्त्वाचे आहे का? (rs पृ. २४८ परि. २-पृ. २४९ परि. २; kl-MR अध्याय १३ परि. ११)
मार्च २४ बायबल वाचन: लूक ४-६ गीत २८ (२२४)
भाषणाचा गुण: विरामचिन्हांच्या वेळी व विचार बदलते वेळी थांबणे (be पृ. ९७ परि. १-पृ. ९८ परि. ५)
क्र. १: तुमच्याविषयी कोणाचे वाईट मत झाले आहे का? (w-MR०१ ४/१ पृष्ठे २०-३)
क्र. २: लूक ६:१-२३
क्र. ३: स्मारकाचा अर्थ काय होतो? (rs पृ. २६६ परि. १-पृ. २६७ परि. १; kl-MR अध्याय १३ परि. १८)
क्र. ४: ख्रिस्ती लोक देवाकडून संरक्षणाची अपेक्षा करू शकतात का?
मार्च ३१ बायबल वाचन: लूक ७-९ गीत ११ (८५)
भाषणाचा गुण: जोर देण्याकरता, ऐकण्याकरता थांबणे (be पृ. ९९ परि. १-पृ. १०० परि. ४)
क्र. १: “देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ” (be पृ. २७२ परि. १-पृ. २७५ परि. ३)
क्र. २: w-MR०१ ३/१५ पृ. १८ परि. १७-पृ. १९ परि. २०
क्र. ३: बायबल देवाकडून आहे हे आपल्याला कसे माहीत आहे
क्र. ४: स्मारक बोधचिन्हे कशाला चित्रित करतात? (rs पृ. २६७ परि. २-३; kl-MR अध्याय १३ परि. १८)
एप्रि. ७ बायबल वाचन: लूक १०-१२ गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: योग्य अर्थावर जोर देणे (be पृ. १०१ परि. १-पृ. १०२ परि. ३)
क्र. १: “येशूविषयीची साक्ष” देणे (be पृ. २७५ परि. ४-पृ. २७८ परि. ४)
क्र. २: लूक १०:१-२२
क्र. ३: प्रभूच्या सांजभोजनात कोणी सहभाग घेतला पाहिजे? (rs पृ. २६७ परि. ५-पृ. २६८ परि. १)
क्र. ४: पहिल्या विवाहात कोणकोणत्या रीतीरिवाजांचा समावेश होता? (rs पृ. २४९ परि. ३-४; fy-MR अध्याय १६ परि. १)
एप्रि. १४ बायबल वाचन: लूक १३-१७ गीत ८ (५३)
भाषणाचा गुण: अर्थावर जोर देण्याच्या बाबतीत सुधारणा करणे (be पृ. १०२ परि. ४-पृ. १०४ परि. ४)
क्र. १: “राज्याची ही सुवार्ता” (be पृ. २७९ परि. १-पृ. २८१ परि. ४)
क्र. २: लूक १५:११-३२
क्र. ३: दुरात्मिक प्रभावापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे
क्र. ४: स्मारक किती वेळा साजरा केला पाहिजे व केव्हा? (rs पृ. २६९ परि. १-२; kl-MR अध्याय १३ परि. १८)
एप्रि. २१ बायबल वाचन: लूक १८-२१ गीत ५ (४६)
भाषणाचा गुण: मुख्य विचारांवर जोर देणे (be पृ. १०५ परि. १-पृ. १०६ परि. २)
क्र. १: ऋतू—यहोवाने केलेली सुज्ञ व प्रेमळ तरतूद (si पृ. २८० परि. १४-१७)
क्र. २: w-MR०१ ४/१५ पृ. ६ परि. १९-पृ. ७ परि. २२
क्र. ३: पुनरुत्थानाच्या आशेचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो
क्र. ४: bबहुपत्नीकत्वाकडे बायबल दुर्लक्ष करते का? (rs पृ. २५० परि. १-पृ. २५१ परि. २; fy-MR पृ. १७ परि. २; kl-MR अध्याय १३ परि. १३)
एप्रि. २८ बायबल वाचन: लूक २२-२४ गीत २९ (२२२)
भाषणाचा गुण: श्रोत्यांना आरामशीर ऐकता येईल इतका आवाज (be पृ. १०७ परि. १-पृ. १०८ परि. ४)
तोंडी उजळणी
मे ५ बायबल वाचन: योहान १-४ गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: आवाजात सुधार कसा करायचा (be पृ. १०८ परि. ५-पृ. ११० परि. २)
क्र. १: तुम्ही तुमची स्मरणशक्ती सुधारू शकता (be पृ. १७ परि. १-पृ. १९ परि. १)
क्र. २: योहान २:१-२५
क्र. ३: मद्याचे सेवन करण्यास देव मनाई करतो का?
क्र. ४: cवैवाहिक सोबत्यांनी विभक्त होण्याविषयी देवाचा काय दृष्टिकोन आहे (rs पृ. २५१ परि. ३; fy-MR अध्याय १३ परि. १७-२०)
मे १२ बायबल वाचन: योहान ५-७ गीत २० (९३)
भाषणाचा गुण: आवाजात चढउतार—तुमच्या आवाजात फेरबदल करा (be पृ. १११ परि. १-पृ. ११२ परि. २)
क्र. १: जीवनातले यश लहानपणी आलेल्या अनुभवांवर अवलंबून नाही (w-MR०१ ४/१५ पृष्ठे २५-८)
क्र. २: योहान ५:१-२४
क्र. ३: नशीबाचा सिद्धान्त तर्काला पटण्याजोगा का नाही
क्र. ४: dघटस्फोट आणि पुनर्विवाह याबद्दल बायबलचा दृष्टिकोन काय आहे? (rs पृ. २५२ परि. १-४; fy-MR अध्याय २ परि. ४ आणि अध्याय १३ परि. १४-१६)
मे १९ बायबल वाचन: योहान ८-११ गीत २४ (१८५)
भाषणाचा गुण: आवाजातील चढउतार—बोलण्याच्या गतीत बदल करा (be पृ. ११२ परि. ३-६)
क्र. १: ‘बुद्धीमुळे आपले दिवस बहुगुणित होतील’ (w-MR०१ ५/१५ पृष्ठे २८-३१)
क्र. २: योहान १०:१६-४२
क्र. ३: पूर्वी, देवाने भावा-बहिणीच्या विवाहाला अनुमती का दिली? (rs पृ. २५२ परि. ५-पृ. २५३ परि. १)
क्र. ४: तणावाचा सामना कसा करावा
मे २६ बायबल वाचन: योहान १२-१६ गीत १३ (१२४)
भाषणाचा गुण: आवाजात चढउतार—स्वरपट्टीत फेरबदल (be पृ. ११३ परि. १-पृ. ११४ परि. ३)
क्र. १: वर्ष आणि पवित्र शास्त्रवचने (si पृष्ठे २८०-२ परि. १८-२३)
क्र. २: w-MR०१ ५/१ पृ. १४ परि. ४-पृ. १५ परि. ७
क्र. ३: ‘जगाचे नसणे’ याचा अर्थ काय होतो
क्र. ४: वैवाहिक संबंध सुधारण्यासाठी कोणती गोष्ट मदत करू शकते? (rs पृ. २५३ परि. २-५; fy-MR अध्याय ३)
जून २ बायबल वाचन: योहान १७-२१ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: भावना ओतून बोला (be पृ. ११५ परि. १-पृ. ११६ परि. ४)
क्र. १: स्मरण करून देण्यात देवाच्या आत्म्याची भूमिका (be पृ. १९ परि. २-पृ. २० परि. ३)
क्र. २: योहान २०:१-२३
क्र. ३: वैवाहिक संबंध सुधारण्यासाठी कोणती गोष्ट मदत करू शकते? (rs पृ. २५४ परि. १-४; kl-MR अध्याय १५)
क्र. ४: संघटित धर्माची आवश्यकता आहे का?
जून ९ बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये १-४ गीत १८ (१६२)
भाषणाचा गुण: साहित्याला अनुरूप असलेला उत्साह (be पृ. ११६ परि. ५-पृ. ११७ परि. ४)
क्र. १: यहोवावरील तुमचा भरवसा भक्कम करा (w-MR०१ ६/१ पृष्ठे ७-१०)
क्र. २: प्रेषितांची कृत्ये ४:१-२२
क्र. ३: बायबलमधील मरीयेविषयीच्या अहवालावरून आपण काय शिकू शकतो? (rs पृ. २५४ परि. ५-पृ. २५५ परि. २; kl-MR अध्याय ४ परि. १५)
क्र. ४: आपण उपासना कशी करतो याची देव दखल घेतो का?
जून १६ बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये ५-७ गीत ७ (५१)
भाषणाचा गुण: प्रेमळपणे बोलणे (be पृ. ११८ परि. १-पृ. ११९ परि. ५)
क्र. १: कबुलीजबाबामुळे होते आध्यात्मिक सुधारणा (w-MR०१ ६/१ पृष्ठे २८-३१)
क्र. २: प्रेषितांची कृत्ये ७:१-२२
क्र. ३: यहोवाचे साक्षीदार इतर धर्मांपासून वेगळे कसे आहेत
क्र. ४: मरीयेने येशूला जन्म दिला तेव्हा ती खरोखरच कुमारिका होती का? (rs पृ. २५५ परि. ३-४; kl-MR पृ. ३७ आणि पृ. ४० परि. १५)
जून २३ बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये ८-१० गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: भावना व्यक्त करणे (be पृ. ११९ परि. ६-पृ. १२० परि. ५)
क्र. १: संकटात अनाथ व विधवांना साहाय्य करणे (w-MR०१ ६/१५ पृष्ठे ९-१२)
क्र. २: w-MR०१ ६/१ पृ. १२ परि. १-पृ. १३ परि. ५
क्र. ३: मरीया कुमारिकाच राहिली का? (rs पृ. २५५ परि. ५-पृ. २५६ परि. २; kl-MR अध्याय ४ परि. १५)
क्र. ४: eआध्यात्मिक वाढीसाठी सभांना उपस्थित राहणे महत्त्वाचे का आहे
जून ३० बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये ११-१४ गीत २६ (२१२)
भाषणाचा गुण: हातवारे आणि चेहऱ्यावरील हावभावांचे महत्त्व (be पृ. १२१ परि. १-४)
तोंडी उजळणी
जुलै ७ बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये १५-१७ गीत १६ (१४३)
भाषणाचा गुण: हातवाऱ्यांचा व चेहऱ्यावरील हावभावांचा उपयोग करणे (be पृ. १२२ परि. १-पृ. १२३ परि. २)
क्र. १: वाचनाकडे लक्ष का दिले पाहिजे? (be पृ. २१ परि. १-पृ. २३ परि. ३)
क्र. २: प्रेषितांची कृत्ये १५:१-२१
क्र. ३: आपण यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन कशाप्रकारे करतो
क्र. ४: मरीया देवाची आई होती का? (rs पृ. २५६ परि. ३-पृ. २५७ परि. २; kl-MR अध्याय ४ परि. १३, १५)
जुलै १४ बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये १८-२१ गीत ३ (३२)
भाषणाचा गुण: सेवेमध्ये दृष्टी संपर्क (be पृ. १२४ परि. १-पृ. १२५ परि. ४)
क्र. १: शंकांमुळे आपला विश्वास कमकुवत होऊ देऊ नका (w-MR०१ ७/१ पृष्ठे १८-२१)
क्र. २: प्रेषितांची कृत्ये १९:१-२२
क्र. ३: fस्वतः मरीयेची गर्भधारणा निर्दोष झाली होती का? (rs पृ. २५७ परि. ३-पृ. २५८ परि. १; kl-MR अध्याय ६ परि. १२, १३)
क्र. ४: ‘पहिल्याने राज्य मिळवण्यास झटत राहा’ याचा अर्थ काय होतो
जुलै २१ बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये २२-२५ गीत २९ (२२२)
भाषणाचा गुण: भाषण देताना दृष्टी संपर्क (be पृ. १२५ परि. ५-पृ. १२७ परि. १)
क्र. १: तुम्ही खरोखरच सहनशील आहात का? (w-MR०१ ७/१५ पृष्ठे २१-३)
क्र. २: प्रेषितांची कृत्ये २४:१-२३
क्र. ३: दियाबल खरा आहे का?
क्र. ४: gमरीया दैहिक शरीराने स्वर्गात गेली का? (rs पृ. २५८ परि. २-३; kl-MR अध्याय ९ परि. १९)
जुलै २८ बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये २६-२८ गीत ८ (५३)
भाषणाचा गुण: क्षेत्र सेवेत सहजतेने बोलणे (be पृ. १२८ परि. १-पृ. १२९ परि. १)
क्र. १: शून्य वर्ष नाही (si पृ. २८२ परि. २४-६)
क्र. २: w-MR०१ ७/१ पृ. १४ परि. ५-८
क्र. ३: मरीयेला मध्यस्थ समजून तिला प्रार्थना करणे उचित आहे का? (rs पृ. २५८ परि. ४-पृ. २५९ परि. १; kl-MR अध्याय १६ परि. ९)
क्र. ४: जीवनाच्या देणगीसाठी आपण आदर कसा दाखवतो
ऑग. ४ बायबल वाचन: रोमकर १-४ गीत ७ (५१)
भाषणाचा गुण: स्टेजवरून भाषण देताना सहजतेने बोला (be पृ. १२९ परि. २-पृ. १३० परि. १)
क्र. १: वाचनाकडे लक्ष कसे ठेवावे (be पृ. २३ परि. ४-पृ. २६ परि. ५)
क्र. २: रोमकर २:१-२४
क्र. ३: तुम्ही पूर्वी जिवंत होता का?
क्र. ४: पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीत मरीयेचा खास आदर केला जात होता का? (rs पृ. २५९ परि. ३-पृ. २६० परि. ३)
ऑग. ११ बायबल वाचन: रोमकर ५-८ गीत २ (१५)
भाषणाचा गुण: सार्वजनिक वाचन करताना सहजतेने वाचा (be पृ. १३० परि. २-४)
क्र. १: ‘धार्मिकाला आशीर्वाद मिळतात’ (w-MR०१ ७/१५ पृष्ठे २४-७)
क्र. २: रोमकर ५:६-२१
क्र. ३: hतुम्ही कुमारी मरीयेवर विश्वास ठेवता का? (rs पृ. २६० परि. ४-पृ. २६१ परि. २; kl-MR पृ. ३७ परि. १ व पृ. ४० परि. १५)
क्र. ४: तुम्ही पुनर्जन्मावर विश्वास ठेवावा का?
ऑग. १८ बायबल वाचन: रोमकर ९-१२ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: वैयक्तिक स्वच्छता संदेशाला शोभा आणते (be पृ. १३१ परि. १-३)
क्र. १: चांगल्या सवयींनी तुमचे भले होऊ द्या (w-MR०१ ८/१ पृष्ठे १९-२२)
क्र. २: w-MR०१ ८/१५ पृ. २२ परि. १०-१३
क्र. ३: मानवांनी बायबलमध्ये बदल केले आहेत का?
क्र. ४: भाकर आणि द्राक्षारस यांचे रूपांतर खरोखर ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांत होते का? (rs पृ. २६२ परि. १-पृ. २६३ परि. २; kl-MR अध्याय १३ परि. १८)
ऑग. २५ बायबल वाचन: रोमकर १३-१६ गीत ४ (४३)
भाषणाचा गुण: विनयशीलता आणि संयम यांचा वेशभूषा व केशभूषा यांवर कसा प्रभाव पडतो (be पृ. १३१ परि. ४-पृ. १३२ परि. ३)
तोंडी उजळणी
सप्टें. १ बायबल वाचन: १ करिंथकर १-९ गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: सभ्य पेहरावाचे महत्त्व (be पृ. १३२ परि. ४-पृ. १३३ परि. १)
क्र. १: अभ्यास कसा करायचा (be पृ. २७ परि. १-पृ. ३१ परि. २)
क्र. २: १ करिंथकर ३:१-२३
क्र. ३: योहान ६:५३-५७ चा अर्थ काय होतो? (rs पृ. २६३ परि. ३-४; kl-MR अध्याय १३ परि. २२)
क्र. ४: दारिद्र्य चोरी करण्यासाठी सबब आहे का?
सप्टें. ८ बायबल वाचन: १ करिंथकर १०-१६ गीत २१ (१९१)
भाषणाचा गुण: चांगला पेहराव कोणास अडखळण ठरत नाही (be पृ. १३३ परि. २-४)
क्र. १: तुमच्या प्रगतीत बाधा आणणाऱ्या अडथळ्यांवर मात करा! (w-MR०१ ८/१ पृष्ठे २८-३०)
क्र. २: १ करिंथकर १२:१-२६
क्र. ३: देव वाईट गोष्टी का होऊ देतो?
क्र. ४: मिस्सा साजरा करण्यास येशूने सुरवात केली होती का? (rs पृ. २६४ परि. १-पृ. २६५ परि. ५; kl-MR अध्याय १३ परि. १८)
सप्टें. १५ बायबल वाचन: २ करिंथकर १-७ गीत २५ (२०४)
भाषणाचा गुण: योग्य ढब आणि सुव्यवस्थित साधनसामग्री (be पृ. १३३ परि. ५-पृ. १३४ परि. ४)
क्र. १: तुमच्या तारुण्यात यश मिळवणे (w-MR०१ ८/१५ पृष्ठे ४-७)
क्र. २: २ करिंथकर ६:१-७:१
क्र. ३: जगीक अधिकाऱ्यांसंबंधी ख्रिश्चनांची मनोवृत्ती (rs पृ. २७० परि. १-३; kl-MR अध्याय १४ परि. ७-१०)
क्र. ४: पृथ्वीच्या प्रदूषणाविषयी देवाला काळजी आहे का?
सप्टें. २२ बायबल वाचन: २ करिंथकर ८-१३ गीत १ (१३)
भाषणाचा गुण: बोलताना वाटणारी भीती कमी कशी करावी (be पृ. १३५ परि. १-पृ. १३७ परि. २)
क्र. १: तुम्ही योग्य निर्णय कसे घ्यावेत (w-MR०१ ९/१ पृष्ठे २७-३०)
क्र. २: २ करिंथकर ८:१-२१
क्र. ३: मृत्यूनंतर आपल्यातील काहीतरी जिवंत राहते का
क्र. ४: लढाईविषयी ख्रिस्ती व्यक्तीच्या मनोवृत्तीवर प्रभाव पाडणारी शास्त्रवचने (rs पृ. २७१ परि. १-४)
सप्टें. २९ बायबल वाचन: गलतीकर १-६ गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: शांत आणि संतुलित कसे होऊ शकतो (be पृ. १३७ परि. ३-पृ. १३८ परि. ५)
क्र. १: प्रमुख तारखांचे महत्त्व (si पृष्ठे २८२-३ परि. २७-३०)
क्र. २: w-MR०१ ९/१ पृ. १५ परि. ८-पृ. १७ परि. ११
क्र. ३: कोणत्या परिस्थितीत देवाने इस्राएली लोकांना युद्धात भाग घेण्याची परवानगी दिली? (rs पृ. २७१ परि. ५-पृ. २७३ परि. १)
क्र. ४: देवाचे राज्य सुरू झाले आहे हे आपल्याला कसे माहीत होते
ऑक्टो. ६ बायबल वाचन: इफिसकर १-६ गीत ८ (५३)
भाषणाचा गुण: आवाज वाढवण्याचे महत्त्व (be पृ. १३९ परि. १-पृ. १४० परि. १)
क्र. १: अभ्यास करणे प्रतिफलदायी आहे (be पृ. ३१ परि. ३-पृ. ३२ परि. ४)
क्र. २: इफिसकर २:१-२२
क्र. ३: देवावर विश्वास ठेवणे समंजसपणाचे आहे
क्र. ४: कोणती शास्त्रवचने, राजनैतिक विषयांत भाग घेण्याविषयी एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीच्या विचारसरणीवर प्रभाव पाडतात? (rs पृ. २७३ परि. २-पृ. २७४ परि. १; kl-MR अध्याय ५ परि. १६ व अध्याय १३ परि. १४)
ऑक्टो. १३ बायबल वाचन: फिलिप्पैकर १–कलस्सैकर ४ गीत १७ (१८७)
भाषणाचा गुण: मायक्रोफोनचा प्रभावकारी उपयोग करा (be पृ. १४० परि. २-पृ. १४२ परि. १)
क्र. १: ‘नीट मार्गाने’ चाल (w-MR०१ ९/१५ पृष्ठे २४-८)
क्र. २: फिलिप्पैकर २:१-२४
क्र. ३: कोणती शास्त्रवचने, देशभक्तीच्या कार्यक्रमांच्या बाबतीत एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीच्या मनोवृत्तीवर प्रभाव पाडतात? (rs पृ. २७४ परि. २-पृ. २७५ परि. ३; kl-MR अध्याय ५ परि. १६ व अध्याय १३ परि. १४)
क्र. ४: यहोवा आज आपल्याकडून काय अपेक्षितो
ऑक्टो. २० बायबल वाचन: १ थेस्सलनीकाकर १–२ थेस्सलनीकाकर ३ गीत १३ (१२४)
भाषणाचा गुण: उत्तर देताना बायबलचा वापर करा (be पृ. १४३ परि. १-३)
क्र. १: वेळेच्या बाबतीत यहोवाचा दृष्टिकोन (si पृष्ठे २८३-४ परि. ३१-३)
क्र. २: w-MR०१ १०/१५ पृ. २३ परि. ६-पृ. २४ परि. ९
क्र. ३: स्वर्गात कोण जातात?
क्र. ४: ख्रिस्ती लोक तटस्थ असतात याचा अर्थ त्यांना शेजाऱ्यांच्या कल्याणात मुळीच रस नाही असा होतो का? (rs पृ. २७६ परि. १; kl-MR अध्याय ५ परि. १९ व अध्याय ११ परि. १४)
ऑक्टो. २७ बायबल वाचन: १ तीमथ्य १–२ तीमथ्य ४ गीत ५ (४६)
भाषणाचा गुण: बायबलचा उपयोग करण्यात सुधारणा कशी करता येईल (be पृ. १४४ परि. १-४)
तोंडी उजळणी
नोव्हें. ३ बायबल वाचन: तीत १–फिलेमोन गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: बायबलचा उपयोग करण्याचे प्रोत्साहन (be पृष्ठे १४५-६)
क्र. १: बायबलचा उपयोग करून संशोधन कसे करावे (be पृ. ३३ परि. १-पृ. ३५ परि. २)
क्र. २: फिलेमोन १-२५
क्र. ३: परिपूर्णावस्थेतील जीवन कंटाळवाणे असेल का?
क्र. ४: यहोवा हे नाव ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या नवे जग भाषांतर यांत का वापरण्यात आले आहे? (rs पृ. २७८ परि. १-३; kl-MR अध्याय ३ परि. १२, १३)
नोव्हें. १० बायबल वाचन: इब्री लोकांस १-८ गीत १६ (१४३)
भाषणाचा गुण: परिणामकारकपणे शास्त्रवचनांचा परिचय करून देण्याचे महत्त्व (be पृ. १४७ परि. १-पृ. १४८ परि. २)
क्र. १: हनोख अधर्मी जगात देवाबरोबर चालला (w-MR०१ ९/१५ पृष्ठे २९-३१)
क्र. २: इब्री लोकांस २:१-१८
क्र. ३: i‘तुमचं बायबल वेगळं आहे,’ असे म्हणणाऱ्या लोकांना उत्तर देणे (rs पृ. २७९ परि. १-४; kl-MR अध्याय २)
क्र. ४: पुनरुत्थित लोकांचा त्यांच्या कार्यांनुसार न्याय कशाप्रकारे केला जाईल?
नोव्हें. १७ बायबल वाचन: इब्री लोकांस ९-१३ गीत ४ (४३)
भाषणाचा गुण: शास्त्रवचनांचा परिचय करून देण्यासाठी उचित शब्द निवडणे (be पृ. १४८ परि. ३-पृ. १४९ परि. २)
क्र. १: निष्ठावान असण्याचा काय अर्थ होतो? (w-MR०१ १०/१ पृष्ठे २०-३)
क्र. २: इब्री लोकांस ९:११-२८
क्र. ३: देवाची स्वर्गीय सृष्टी सुसंघटित आहे का? (rs पृ. २८० परि. २-३; kl-MR अध्याय ३ परि. १५)
क्र. ४: देवाचा आदर करणारे आचरण फायदेकारक का आहे
नोव्हें. २४ बायबल वाचन: याकोब १-५ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: उचित प्रकारे जोर देण्यात भावनांचा समावेश असतो (be पृ. १५० परि. १-२)
क्र. १: काळाच्या ओघात घटनांचे मापन (si पृष्ठे २८४-५ परि. १-४)
क्र. २: w-MR०१ ११/१ पृ. १२ परि. १५-पृ. १३ परि. १९
क्र. ३: विनयशीलतेचे मूल्य
क्र. ४: गत काळात देवाने आपल्या सेवकांना सूचना कशाप्रकारे दिल्या? (rs पृ. २८१ परि. १-२; kl-MR अध्याय १७ परि. ६, १६, १७)
डिसें. १ बायबल वाचन: १ पेत्र १–२ पेत्र ३ गीत १ (१३)
भाषणाचा गुण: योग्य शब्दांवर जोर द्या (be पृ. १५० परि. ३-पृ. १५१ परि. २)
क्र. १: संशोधन करण्यासाठी असलेल्या इतर साधनांचा उपयोग करण्यास शिकणे (be पृ. ३५ परि. ३-पृ. ३८ परि. ४)
क्र. २: १ पेत्र १:१-१६
क्र. ३: खरे ख्रिस्ती संघटित केले जातील असे बायबल सांगते का? (rs पृ. २८२ परि. १-४; kl-MR अध्याय १४ परि. १९-२३)
क्र. ४: ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाचा प्रभाव आपल्या जीवनावर कशाप्रकारे पडला पाहिजे
डिसें. ८ बायबल वाचन: १ योहान १–यहूदा गीत ५ (४६)
भाषणाचा गुण: जोर देण्याच्या पद्धती (be पृ. १५१ परि. ३-पृ. १५२ परि. ५)
क्र. १: आपल्या विवेकबुद्धीचे रक्षण करा (w-MR०१ ११/१ पृष्ठे ४-७)
क्र. २: १ योहान ३:१-१८
क्र. ३: स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या गैरवागणुकीसाठी बायबलला दोषी का ठरवले जाऊ शकत नाही
क्र. ४: देवाचे विश्वासू सेवक ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसमध्ये विखुरलेले आहेत का? (rs पृ. २८३ परि. १-३; kl-MR अध्याय १७ परि. ३, ४, ६-८, १५-२०)
डिसें. १५ बायबल वाचन: प्रकटीकरण १-६ गीत २० (९३)
भाषणाचा गुण: शास्त्रवचने उचितरीत्या लागू करणे (be पृ. १५३ परि. १-पृ. १५४ परि. ३)
क्र. १: नोहाचा विश्वास जगाला दोषी ठरवतो (w-MR०१ ११/१५ पृष्ठे २८-३१)
क्र. २: प्रकटीकरण २:१-१७
क्र. ३: यहोवाच्या संघटनेच्या दृश्य भागाची ओळख कशाप्रकारे करता येऊ शकते? (rs पृ. २८३ परि. ४-पृ. २८४ परि. २; kl-MR अध्याय ५ परि. १६-२२)
क्र. ४: नाताळ ख्रिश्चनांचा सण का नाही
डिसें. २२ बायबल वाचन: प्रकटीकरण ७-१४ गीत ८ (५३)
भाषणाचा गुण: शास्त्रवचने कशाप्रकारे लागू होतात ते स्पष्ट करणे (be पृ. १५४ परि. ४-पृ. १५५ परि. ४)
क्र. १: तुम्ही आध्यात्मिक हार्ट अटॅक टाळू शकता (w-MR०१ १२/१ पृष्ठे ९-१३)
क्र. २: w-MR०१ १२/१५ पृ. १७ परि. १०-पृ. १८ परि. १३ (तळटीपेसह)
क्र. ३: समवयस्कांच्या दबावाचा सामना कसा करावा
क्र. ४: यहोवाच्या संघटनेबद्दल आपण आदर कसा दाखवू शकतो? (rs पृ. २८४ परि. ३-७; kl-MR अध्याय १४ परि. १९-२३)
डिसें. २९ बायबल वाचन: प्रकटीकरण १५-२२ गीत १७ (१८७)
भाषणाचा गुण: शास्त्रवचनांतून तर्क करा (be पृ. १५५ परि. ५-पृ. १५६ परि. ५)
तोंडी उजळणी
[तळटीपा]
a केवळ बांधवांना हा भाग देणे.
b केवळ बांधवांना हा भाग देणे.
c केवळ बांधवांना हा भाग देणे.
d केवळ बांधवांना हा भाग देणे.
e केवळ बांधवांना हा भाग देणे.
f वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे, स्थानीय क्षेत्रातील लोक करत असलेले दावे, आक्षेप वगैरे, यांना समाधानकारकरीतीने कशाप्रकारे उत्तर देता येईल हेही दाखवा.
g वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे, स्थानीय क्षेत्रातील लोक करत असलेले दावे, आक्षेप वगैरे, यांना समाधानकारकरीतीने कशाप्रकारे उत्तर देता येईल हेही दाखवा.
h वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे, स्थानीय क्षेत्रातील लोक करत असलेले दावे, आक्षेप वगैरे, यांना समाधानकारकरीतीने कशाप्रकारे उत्तर देता येईल हेही दाखवा.
i वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे, स्थानीय क्षेत्रातील लोक करत असलेले दावे, आक्षेप वगैरे, यांना समाधानकारकरीतीने कशाप्रकारे उत्तर देता येईल हेही दाखवा.