वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०२ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००२
आमची राज्य सेवा—२००२
km १०/०२ पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके. पुनर्भेट करता तेव्हा यहोवाचे साक्षीदार—जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत हे माहितीपत्रक द्या. पहिल्या भेटीपासूनच घरमालकाला मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण द्या. नोव्हेंबर: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. लोकांकडे ही प्रकाशने आधीपासूनच असतील तर कोणतेही जुने प्रकाशन तुम्ही देऊ शकता. डिसेंबर: सर्व काळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. पर्यायी सादरता म्हणून, तुम्ही बायबल कथांचं माझं पुस्तक; बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी); तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल, ही पुस्तके देऊ शकता. मंडळीकडे या पर्यायी सादरतांचा साठा नसल्यास, तुमच्या जवळपासच्या मंडळीकडे जादा साठा आहे का अशी विचारपूस करा जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडून काही पुस्तके घेऊ शकता. जानेवारी: मंडळीकडे साठा असलेले कोणतेही १९२ पानी पुस्तक. तुमच्या मंडळीकडे यांतील कोणतेही पुस्तक नसेल तर तुमच्या जवळपासच्या मंडळीकडे जादा साठा आहे का अशी विचारपूस करा जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडून काही पुस्तके घेऊ शकता. ज्या मंडळ्यांकडे जुन्या पुस्तकांचा साठा नाही त्या मंडळ्या मानवजातीने केलेला देवाचा शोध (इंग्रजी) पुस्तक सादर करू शकतात.

▪ आमची राज्य सेवा याच्या या अंकाच्या पुरवणीत “सन २००३ साठी ईश्‍वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा” आहे आणि तो संपूर्ण २००३ वर्षाकरता जपून ठेवावा.

▪ तुमच्या मंडळीच्या सभांच्या वेळा जानेवारी १ पासून बदलणार असतील तर मंडळीच्या सचिवांनी काँग्रीगेशन मिटिंग इन्फरमेशन आणि हॅण्डबिल रिक्वेस्ट फॉर्म (S-5) भरून शाखा दफ्तराला कळवावे. आवश्‍यकता असल्यास, हॅण्डबिलच्या नवीन साठ्यासाठी त्याच फॉर्मवर मागणी करता येते. हॅण्डबिल्सची मागणी निदान आठ आठवड्यांआधी पाठवल्यास तुम्हाला निर्धारित वेळी ती मिळू शकेल.

▪ लिटरेचर इन्व्हेन्ट्री ॲझ ऑफ सप्टेंबर १, २००२ (S-18) या फॉर्मच्या तीन प्रती, जुलैच्या स्टेटमेंटबरोबर सर्व मंडळ्यांना पाठवण्यात आल्या होत्या. ज्या मंडळ्यांनी आपली मोजणी पाठवलेली नाही त्यांनी लवकरात लवकर वरील फॉर्म भरून पाठवावा. “राज्य सभागृह साहित्य गट” यात असलेल्या मंडळ्यांसाठी कोऑर्डिनेटींग मंडळ्यांनी हा फॉर्म भरून पाठवावा.

▪ मंडळीच्या सचिवांनी मंडळीचा रिपोर्ट (S-1) जेहोवाज विटनेसेस ऑफ इंडिया या लेटरहेडमध्ये दिलेल्या पत्त्यावर शाखा दफ्तराला पाठवावा आणि फॅक्स पाठवताना केवळ पुढे दिलेला फॅक्स नंबर वापरावा: 080-8468417.

▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:

समाधानी जीवन—कसे मिळवता येईल?

—कन्‍नड, तेलगू

▪ नवीन व्हिडिओकॅसेट उपलब्ध:

आपल्या दिवसांतील ईशारेवजा उदाहरणे —इंग्रजी

▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक —नेपाळी

“पहा! मी सर्व नवे करतो” —नेपाळी

देव आपल्याकडून काय अपेक्षितो? —उर्दू

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा