वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०२ पृ. १
  • ईश्‍वरशासित साधनसंपत्तीची कदर करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित साधनसंपत्तीची कदर करा
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९१
  • आपल्या बायबल आधारित साहित्याचा विचारपूर्वक उपयोग करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • आपल्या प्रकाशनांना तुम्ही मौल्यवान समजता का?
    आमची राज्य सेवा—१९९२
  • आपल्या प्रकाशनांचा विचारपूर्वक उपयोग करा
    आमची राज्य सेवा—२००९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ९/०२ पृ. १

ईश्‍वरशासित साधनसंपत्तीची कदर करा

१ मंदिराच्या जीर्णोद्धोराच्या योजनेच्या वेळेस, या कामासाठी नेमलेल्या लोकांची प्रशंसा करताना राजा योशियाने म्हटले: “ज्यांच्या हाती तो पैका दिला होता, त्यांच्याकडे कोणी हिशोब मागितला नाही, कारण ते आपले काम सचोटीने [“विश्‍वासूपणे,” NW] करीत.” (२ राजे २२:३-७) या लोकांना सोपवलेल्या पैशाचा त्यांनी ज्याप्रकारे उपयोग केला त्यावरून त्यांना पवित्र गोष्टींबद्दल कदर असल्याचे स्पष्ट दिसले. आज, “देवाच्या सुवार्तेच्या पवित्र कार्यात” भाग घेत असताना आपणही, आपल्याला सोपवलेल्या साधनसंपत्तीचा उपयोग करताना त्यांच्यासारखीच सचोटी दाखवली पाहिजे.

२ क्षेत्र सेवेत: आपल्या प्रकाशनांत असलेल्या महत्त्वपूर्ण संदेशाबद्दल गुणग्राहकता बाळगण्याद्वारे व या प्रकाशनांना छापण्यासाठी झालेल्या खर्चाची जाणीव बाळगण्याद्वारे आपण त्यांना मोलाचे समजतो. बायबलच्या संदेशाची खरोखर कदर न करणाऱ्‍यांना आपण अविचारीपणे आपली प्रकाशने देऊ नयेत. एखाद्या व्यक्‍तीने फारशी आस्था दाखवली नसेल तर तिला प्रकाशने देण्याऐवजी आपण एखादी हस्तपत्रिका देऊ शकतो.

३ प्रकाशनांचे वाटप अशाप्रकारे करा, ज्याद्वारे त्यांच्याबद्दलची कदर व्यक्‍त होईल. इकडे-तिकडे पडून राहतील अशा सार्वजनिक ठिकाणी प्रकाशने ठेवण्याचे टाळा. आणखी प्रकाशने घेण्याआधी, घरात आपल्याजवळ किती प्रकाशने आहेत याची यादी करा; यामुळे काहीही वाया जाणार नाही. प्रत्येक अंकाची तुमच्याकडे नेहमीच मासिके उरत असतील तर तुमची मागणी कमी करा.

४ व्यक्‍तिगत वापरासाठी प्रकाशने: आता आपण, डिलक्स बायबल, रेफरन्स बायबल, कॉन्कर्डन्स, इंडेक्स, इन्साईट खंड, प्रोक्लेमर्स पुस्तक यांसारख्या इतर मोठ्या प्रकाशनांची मागणी करू शकत नसल्यामुळे, त्यांची किंमत आपल्याला अधिक चांगल्याप्रकारे कळते. तुमच्या पुस्तकालयात ही पुस्तके असल्यास ती नीट जपून वापरा. काहींना राज्य सभागृहातील पुस्तकालयात ठेवण्यात आलेल्या प्रती वापराव्या लागतील. ही प्रकाशने चांगल्या स्थितीत ठेवली जात आहेत, ती हरवली जात नाहीत याची खबरदारी मंडळीतील सर्वांनी घेतली पाहिजे.

५ तुमच्या व्यक्‍तिगत प्रतींवर तुमचे स्वतःचे नाव आणि तुमचा पत्ता लिहून ठेवला आहे का? यामुळे हरवलेले प्रकाशन पुन्हा मिळवण्यासाठी घ्यावा लागणारा त्रास कमी होऊ शकतो. तुमचे राज्य-गीत पुस्तक, बायबल किंवा अभ्यासाचे प्रकाशन हरवले असेल तर तुम्हाला ते राज्य सभागृहातील किंवा संमेलनाच्या ठिकाणी हरवलेल्या वस्तूंमध्ये कदाचित सापडेल.—लूक १५:८, ९.

६ आपल्या प्रकाशनांचा योग्य वापर करण्याचा आपण कटाक्षाने प्रयत्न करू या. याद्वारे यहोवाने आपल्याला सोपवलेल्या राज्याच्या साधनसंपत्तीचा वापर आपण सचोटीने अथवा विश्‍वासूपणे करत आहोत हे दाखवू शकतो.—लूक १६:१०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा