वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०२ पृ. २-७
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००२
  • उपशिर्षक
  • सप्टेंबर ९ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर १६ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर २३ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर ३० ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर ७ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००२
km ९/०२ पृ. २-७

सेवा सभा आराखडा

टीप: अधिवेशन होणाऱ्‍या महिन्यांत, आपली राज्य सेवा यात दर आठवड्याच्या एका सेवा सभेचा आराखडा तयार करण्यात येईल. “आवेशी राज्य उद्‌घोषक” प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहता यावे म्हणून मंडळ्या आवश्‍यकतेनुसार त्यात फेरबदल करू इच्छितील. उचित आहे तेथे, अधिवेशनाला उपस्थित राहण्याआधी, शेवटल्या सेवा सभेत १५ मिनिटांसाठी, या महिन्याच्या पुरवणीतील लागू होणाऱ्‍या सल्ल्याची उजळणी करा. जानेवारी महिन्यात, एका संपूर्ण सेवा सभेत अधिवेशन कार्यक्रमाच्या मुख्य मुद्द्‌यांची उजळणी करण्यात येईल. या चर्चेसाठी तयार असण्याकरता, आपण सर्वजण अधिवेशनात अर्थभरीत टिपणी घेऊ शकतो, आपल्या स्वतःच्या जीवनात आणि क्षेत्र सेवेत आपण लागू करू इच्छिणारे विशिष्ट मुद्दे लिहून घेऊ शकतो. आणि मग, अधिवेशनाला उपस्थित राहिल्यापासून तुम्ही त्या सूचनांचे कशाप्रकारे पालन करण्याचा प्रयत्न केला आहे ते सांगू शकता. मिळालेल्या उत्तम प्रशिक्षणाचा आपल्याला लाभ कसा झाला ते एकमेकांकडून ऐकल्याने परस्पर उत्तेजन मिळेल.

सप्टेंबर ९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र.  ४ (४३)

१२ मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून जुलै-सप्टेंबरचे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील पहिले) आणि सप्टेंबर १५ चे टेहळणी बुरूज कसे सादर करायचे त्याची दोन प्रात्यक्षिके दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, “मला यहोवाच्या साक्षीदारांमध्ये आस्था नाही,” या संभाषणाला खीळ घालणाऱ्‍या प्रतिक्रियेला हाताळण्याची वेगळी पद्धत दाखवा.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पुस्तिका, पृष्ठ ९-१०.

१६ मि: “यहोवाची स्तुती करण्यास लोकांना मदत करणे.”a वेळ मिळेल त्याप्रमाणे, शास्त्रवचनांतून युक्‍तिवाद (इंग्रजी), पुस्तकाच्या पृष्ठे १९६-९ वरील एक अथवा दोन व्यावहारिक मुद्दे सांगा.

१७ मि: गेल्या वर्षी आपण काय साध्य केले? सेवा पर्यवेक्षकांचे भाषण. मंडळीच्या २००२ सेवा वर्षाचे ठळक मुद्दे सांगा. साध्य केलेल्या गोष्टींबद्दल मंडळीतील सर्वांची प्रशंसा करा. सभांची उपस्थिती, पुनर्भेटी व बायबल अभ्यास, साहाय्यक पायनियरींग याबाबतीत मंडळीने कशी प्रगती केली आहे ते सांगा आणि सुधारणा करण्यासाठी व्यावहारिक सूचना द्या. येत्या वर्षात साध्य करता येण्याजोगी ध्येये ठेवा.

गीत क्र. १६ (१४३) आणि समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर १६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र.  ९ (३७)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.

१७ मि: “एक खासप्रकारचे परस्पर उत्तेजन.” भाषण. प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यास, बांधवांमध्ये उत्सुकता व कृतज्ञता निर्माण करा. पहिल्या दिवसाच्या सकाळपासून ते तिसऱ्‍या दिवसाच्या संध्याकाळपर्यंतच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सर्वांना आर्जवा.

१८ मि: “सर्वदा चांगले करीत राहा.”b आपल्या लाभास्तव, मुक्कामाच्या बाबतीत केलेल्या योजनांनुसार वागणे किती महत्त्वाचे आहे यावर जोर द्या. परिच्छेद २ वरील आठवणीत ठेवण्याजोग्या सहा गोष्टींवर भर द्या. प्रत्येकाने उचित वर्तन का ठेवावे त्याचे कारण सांगा.

गीत क्र. २३ (२००) आणि समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर २३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र.  १ (१३)

१२ मि: स्थानीय घोषणा. पुढील आठवड्याच्या सेवा सभेच्या तयारीसाठी गेल्या विभागीय संमेलन कार्यक्रमाच्या टिपणींची उजळणी करण्यास सर्वांना उत्तेजन द्या. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून एक सेवा सेवक जुलै-सप्टेंबरचे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील तिसरे) आणि एक वडील ऑक्टोबर १ चे टेहळणी बुरूज सादर करत असल्याचे प्रात्यक्षिक दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकानंतर, घरमालकाची आस्था वाढवण्यासाठी प्रस्तुतीत वापरण्यात आलेली सुरवातीची एक किंवा दोन वाक्ये पुन्हा बोलून दाखवा.

१५ मि: “आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करा.” भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. सर्वांनी अधिवेशन कार्यक्रमाकडे एकाग्रतेने लक्ष का दिले पाहिजे याची कारणे सांगा. फक्‍त ऐकणेच पुरेसे नाही तर आपण जे शिकतो ते आपल्या जीवनात आचरले पाहिजे यावर जोर द्या. जानेवारीतील एका सेवा सभेत, प्रांतीय अधिवेशनाच्या मुख्य मुद्द्‌यांची चर्चा केली जाणार आहे त्याबद्दल वरती देण्यात आलेली सूचना विचारात घ्या. सर्वांना टिपणी द्यायचे उत्तेजन द्या. गेल्या वर्षाच्या कार्यक्रमातून मिळालेल्या लाभाविषयी सांगण्यास एक-दोघांना आमंत्रित करा.

१८ मि: “स्वच्छतेमुळे यहोवाचे गौरव होते.”c वडिलांनी हा भाग हाताळावा आणि प्रत्येक परिच्छेदावर चर्चा झाल्यावर त्यांनी तो परिच्छेद वाचावा. संपूर्ण अधिवेशनादरम्यान स्वच्छता राखणे व लोकांमध्ये असताना आपल्या पेहरावाबाबत सावधगिरी बाळगणे का महत्त्वाचे आहे ते समजण्यास सर्वांना मदत करा.

गीत क्र. १७ (१८७) आणि समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर ३० ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ४ (४३)

५ मि: स्थानीय घोषणा. सर्व प्रचारकांना त्यांचा सप्टेंबरचा क्षेत्र सेवेचा अहवाल देण्याची आठवण करून द्या.

१५ मि: कोणत्या कारणांमुळे आपली नियतकालिके अनोखी ठरतात? भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. ऑक्टोबर दरम्यान आपण टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके सादर करणार आहोत. ही नियतकालिके ज्या कारणांमुळे अनोखी ठरतात त्यांची चर्चा करा: (१) ते यहोवाचे नाव उंचावतात. (२) ते येशूवर विश्‍वास ठेवण्यास प्रोत्साहन देतात. (३) ते देवाच्या राज्याची घोषणा करतात. (४) बायबलला अंतिम अधिकार म्हणून त्याकडे ते लक्ष आकर्षित करतात. (५) ते बायबल भविष्यवाणींच्या पूर्णतेचे स्पष्टीकरण देतात. (६) ते जागतिक घटनांमागच्या खऱ्‍या कारणांचे स्पष्टीकरण देतात. (७) आजच्या समस्यांना कसे तोंड द्यायचे हे ते दाखवतात. (८) सर्व प्रकारच्या लोकांची आस्था ते जागृत करतात. (९) ते राजनैतिक बाबतीत तटस्थ राहतात. दोन प्रात्यक्षिके दाखवा; आणि प्रत्येक प्रात्यक्षिकात, वरीलपैकी एका मुद्द्‌याचा उपयोग करून संभाषण कसे सुरू करता येते ते दाखवा.

२५ मि: “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा.” (प्रकटी. १४:७) भाषण व श्रोत्यांबरोबर चर्चा; गेल्या सेवा वर्षांत झालेल्या विभागीय संमेलन कार्यक्रमाची उजळणी करा. मंडळीतील बंधूभगिनींना, शिकलेल्या प्रमुख मुद्द्‌यांवर तसेच हे मुद्दे ते आपल्या व्यक्‍तिगत जीवनात आणि कुटुंब मिळून कशाप्रकारे लागू करू शकले त्यावर विवेचन मांडण्यास आमंत्रण द्या. (आधीच एकेक भाग नेमला जाऊ शकतो.) कार्यक्रमाच्या या भागांवर चर्चा करा: (१) “नवोदितांच्या मनात देवाची भीती निर्माण करण्यास मदत करा.” स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्या आस्थेवाईक लोकांना प्रगती करण्यास व यहोवाचे क्रियाशील सेवक होण्यास आपण कशी मदत करू शकतो? (२) “यहोवाची भीती बाळगणे म्हणजे वाईटाचा द्वेष करणे.” (w-MR८७ ८/१ २२-२५) गर्व, खोटे बोलणे, भौतिक गोष्टींच्या मागे लागणे, अहितकारक मनोरंजन, इंटरनेटचा गैरवापर—या ज्या गोष्टींचा यहोवा द्वेष करतो त्यांच्यापासून दूर राहण्यास नीतिसूत्रे ६:१६-१९ आपल्याला कशाप्रकारे मदत करते? (३) “आपल्या प्रियजनांसोबत जवळचा नातेसंबंध विकसित करा.” आपले यहोवावर, येशूवर, कुटुंबातील सदस्यांवर, मंडळीतील इतरांवर प्रेम आहे; पण यांच्या जवळ गेल्याने जगापासून आपले संरक्षण कसे होते? (४) “यहोवाची भीती बाळगा, मनुष्याची नव्हे.” यहोवाला असंतुष्ट करण्याच्या भयाने तुम्हाला, प्रचार कार्यात तुमच्या लाजऱ्‍या स्वभावावर मात करण्यास, नोकरीच्या ठिकाणी किंवा शाळेत ईश्‍वरी तत्त्वांनुसार जगण्यास, किंवा सभा, संमेलने, अधिवेशने चुकवण्यासाठी तुमच्या मालकाकडून येणाऱ्‍या दबावाचा प्रतिकार करण्यास कशाप्रकारे साहाय्य केले आहे? (५) “सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा.” (स्तो. ११९:३७; इब्री ४:१३) देवाचे भय आपल्याला बेलगाम पिणे, पोर्नोग्राफी पाहणे किंवा इतर गुप्त पापे करण्याचे टाळण्यास का प्रवृत्त करते? (६) “यहोवाची भीती बाळगून चालत राहा.” यहोवाच्या आत्म्याला तुम्ही तुमच्या जीवनावर कार्य करू दिल्याबद्दल यहोवाने तुम्हाला कशाप्रकारे आशीर्वादित केले आहे?—स्तो. ३१:१९; ३३:१८; ३४:९, १७; १४५:१९.

गीत क्र. ११ (८५) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर ७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १८ (१६२)

१० मि: स्थानीय घोषणा.

१५ मि: “ईश्‍वरशासित साधनसंपत्तीची कदर करा.”d वडिलांनी हा भाग हाताळावा. स्थानिकरीत्या कोणती गोष्ट पाहण्यात आली आहे आणि आपल्या प्रकाशनांचा सुज्ञ उपयोग करण्याकरता मंडळी काय करू शकते याबाबतीत विवेचन मांडा. आवश्‍यकता आहे तितकीच प्रकाशने मागवण्यास सर्वांना उत्तेजन द्या. जगव्याप्त कार्यासाठी आर्थिक दान देण्याच्या सुहक्काची सर्वांना आठवण करून द्या.

२० मि: “‘निरर्थक गोष्टींमागे’ लागू नका.” e परिच्छेद ४ ची चर्चा केल्यानंतर, आमची राज्य सेवा नोव्हेंबर १९९९ मधील पुरवणीच्या ३०-२ परिच्छेदातील काही मुद्द्‌यांचा समावेश करा. परिच्छेद ५ ची चर्चा करताना, टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, १९९४, पृष्ठ ८ वरील चौकोनातील माहितीचा समावेश करा. परिच्छेद ६ वर चर्चा होत असताना नोव्हेंबर १९९९ च्या पुरवणीतील परिच्छेद १८ चे वाचन करा.

गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा