प्रश्न पेटी
▪ मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक पेजर वापरताना आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?
या उपकरणांमुळे आपण इतरांशी जवळजवळ कुठूनही संपर्क साधू शकतो. ही उपकरणे उपयोगी असली तरीसुद्धा, सेवेपासून किंवा ख्रिस्ती सभांपासून आपले लक्ष विचलित होईल अशा वेळी आपण त्यांचा उपयोग न करण्याची सावधगिरी बाळगू शकतो. हे कसे शक्य आहे?
आपण क्षेत्र सेवेत साक्ष देत असतानाच आपला सेल्यूलर फोन वाजू लागतो किंवा आपल्या पेजरचा आवाज येऊ लागतो तेव्हा काय होऊ शकते याचा विचार करा. घरमालकाला आपल्याबद्दल काय वाटेल? आपण साक्ष अर्ध्यातच सोडून जर फोनवर बोलायला लागलो तर घरमालकावर कोणती छाप पडू शकते? आपण निश्चितच असे काही करू इच्छित नाही ज्यामुळे इतरांना राज्याचा संदेश ऐकण्यास अडखळण ठरेल. (२ करिंथ. ६:३) यास्तव, आपण जर मोबाईल फोन किंवा पेजर स्वतःबरोबर घेणारच असू तर तो अशाप्रकारे सेट करून ठेवावा जेणेकरून क्षेत्र सेवेत आपण भाग घेत असताना आपल्यासाठी किंवा इतरांसाठी व्यत्यय ठरणार नाही.
आपल्याबरोबरचा प्रचारक साक्ष देत असतो आणि आपण बाजूला थांबलेलो असतो, तेव्हा फोन वाजल्यास काय करावे? आपण क्षेत्र सेवेसाठी आलोय याचा अर्थ आपण पूर्ण मनाने ही सेवा करू नये का? कृपया, आपल्या पवित्र सेवेसाठी आदर म्हणून आपण आपली अनावश्यक व्यक्तिगत किंवा सामाजिक कामे इतर वेळी करावीत. (रोम. १२:७) याचा अर्थ असा होत नाही, की पुढे साक्ष देण्यासाठी किंवा पुनर्भेटीची व्यवस्था करण्यासाठी आपण फोनचा उपयोग करू शकत नाही.
गाडी चालवत असतानाही आपण मोबाईल फोनचा वापर करण्यासंबंधी सावधगिरी बाळगली पाहिजे; कारण काही अभ्यासांवरून असे दिसून आले आहे, की गाडी चालवताना मोबाईल फोनवर बोलल्याने अपघात होण्याची शक्यता बरीच वाढते. गाडी चालवत असताना मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालणारे नियम असल्यास आपण त्यांचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे.
आपण ख्रिस्ती सभांना, संमेलनांना व अधिवेशनांना येतो ते यहोवाची उपासना करायला व त्याच्याकडून शिकून घ्यायला. या प्रसंगांच्या पवित्रतेची कदर म्हणून व इतरांचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून आपण मोबाईल फोन व पेजर सेट करून ठेवू शकत नाही का? अगदी तातडीची बाब असेल तर आपण सभेच्या बाहेर जाऊन मग फोनवर बोलू शकतो. नाहीतर, आपण आपल्या सर्व व्यक्तिगत किंवा कामाच्या गोष्टी उपासनेसाठी ठरवलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त वेळेत करू शकतो.—१ करिंथ. १०:२४.
आपल्या मोबाईल फोनचा किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा उपयोग, इतरांचा विचार करून व आध्यात्मिक गोष्टींबद्दल गाढ आदर दाखवून आपण करू या.