प्रश्न पेटी
◼ ख्रिस्ती सभेत व क्षेत्र सेवेत असताना मोबाईल फोनच्या वापराबद्दल बायबलची कोणती तत्त्वे लागू होतात?
“सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो.” (उप. ३:१): मोबाईलमुळे आपण कधीही एकमेकांसोबत बोलू शकतो किंवा मेसेज करू शकतो. पण असे काही प्रसंग असतात जेव्हा ख्रिश्चनांनी मोबाईलमुळे आपले लक्ष विचलित करू नये. जसे की आपल्या सभांची वेळ देवाची उपासना करण्याकरता, त्याच्याकडून शिकून घेण्याकरता व प्रोत्साहन प्राप्त करण्याकरता असते. (अनु. ३१:१२; स्तो. २२:२२; रोम. १:११, १२) सभेच्या आधी आपण आपले मोबाईल बंद करून सभा झाल्यानंतर आलेले मेसेज पाहू शकतो का? काही तातडीच्या कारणामुळे जर आपण आपले मोबाईल बंद करू शकत नाही तर ते अशा प्रकारे सेट करू शकतो ज्यामुळे इतरांना त्रास होणार नाही.
“सर्व काही सुवार्तेकरता” करा. (१ करिंथ. ९:२३): कधीकधी क्षेत्र सेवेत मोबाईल फोनचा वापर करावाच लागतो. उदाहरणार्थ, पुढाकार घेणाऱ्या भावाला क्षेत्रात इतर ठिकाणी प्रचार करत असलेल्या भाऊबहिणींशी संपर्क ठेवावा लागतो. संवेदनशील क्षेत्रात जमावाचा हल्ला होण्याची शक्यता असते तेव्हा इतर प्रचारकांना सतर्क करण्यासाठी मोबाईल फोनचा वापर होतो; जमावाचा हल्ला होतो किंवा पोलीस येतात तेव्हाही मंडळीच्या वडिलांना सांगण्यासाठी मोबाईल फोनचा उपयोग होतो. आवड दाखवलेली व्यक्ती किंवा बायबल विद्यार्थी लांब राहत असेल तर त्यांची भेट घेण्यापूर्वी प्रचारकाला त्यांना फोन करावा लागतो. आपल्याकडे फोन असेल तर घरमालकाशी बोलत असताना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. (२ करिंथ. ६:३) क्षेत्रात इतर प्रचारकांची वाट पाहत असताना, आपल्या मित्राला फोन किंवा मेसेज पाठवण्याऐवजी आपण आपले लक्ष सेवेकडे आणि आपल्यासोबत काम करत असलेल्या प्रचारकांकडे ठेवू शकतो.
दुसऱ्यांचे हित पाहा. (१ करिंथ. १०:२४; फिलिप्पै. २:४): क्षेत्र सेवेचा गट कोठे प्रचार करत आहे हे जाणून घेण्यासाठी फोन किंवा मेसेज करता येईल असा विचार करून आपण क्षेत्र सेवेच्या सभेला वेळेवर उपस्थित राहण्याबद्दल निष्काळजीपणा दाखवू नये. आपण उशिरा जातो तेव्हा पुन्हा जोड्या लावाव्या लागतात. कदाचित टाळता न येणाऱ्या परिस्थितीमुळे आपल्याला एखाद्या वेळी उशीर होऊ शकतो. पण वेळेवर येऊन आपण यहोवा देवाने केलेली व्यवस्था, पुढाकार घेणारा बांधव आणि आपले सहप्रचारक यांच्याबद्दल कदर दाखवतो.