वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०२ पृ. २
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९८
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९०
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२००८
  • आपल्या पेहरावाकडे लक्ष देणं महत्त्वाचं का आहे?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ६/०२ पृ. २

प्रश्‍न पेटी

▪ बेथेल गृहांना किंवा शाखा दफ्तरांना आपण भेट द्यायला जातो तेव्हा आपला पेहराव व आपली केशभूषा कशी असली पाहिजे?

आपण बेथेल गृह पाहायला जातो किंवा बेथेल कुटुंबाच्या सदस्यांना भेटायला जातो तेव्हा “आपला पेहराव, केशरचना व वागणूक ही राज्य सभागृहात सभांना उपस्थित राहताना आपण जशी ठेवतो तशीच राखण्याची गरज आहे.” (om-MR १३१) परंतु असे दिसून आले आहे, की काही बंधू व भगिनी शाखा दफ्तराला भेट द्यायला येतात तेव्हा अगदीच कॅज्यूअल वेशात येतात. हे उचित नाही. यहोवा देवाच्या सेवकांना शोभेल असा आपला पेहराव उदाहरणीय, सुव्यवस्थित, शालीन, उचित व आदरणीय असला पाहिजे.—१ तीम. २:९, १०.

बेथेल गृहांना भेट द्यायला जाताना ही गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाची आहे कारण, येथे भेटी द्यायला येणाऱ्‍या लोकांना साक्षीदार नसलेले अनेक लोक पाहत असतात. ते जे काही पाहतात त्यावरून देवाच्या लोकांबद्दल आणि त्याच्या संघटनेबद्दल त्यांचे मत बनते. योग्य पेहराव व केशभूषा करण्याकडे लक्ष द्यावे म्हणून आपण, भेट द्यायला येणाऱ्‍या आपल्या बायबल विद्यार्थ्यांना किंवा इतरांना याची आठवण करून देणे उचित असेल. असे केल्यास बेथेल कुटुंब तुमचे आभार मानील.

ख्रिस्ती सेवक या नात्याने आपल्या पेहरावामुळे कोणी अडखळणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. (२ करिंथ. ६:३, ४) उलट आपल्या उचित पेहरावाद्वारे आपण ‘सर्व गोष्टींत आपला तारणारा देव ह्‍याच्या शिक्षणास शोभा आणू या.’—तीत २:१०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा