वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०२ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००२
  • उपशिर्षक
  • जून १० ने सुरू होणारा सप्ताह
  • जून १७ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून २४ ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै १ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००२
km ६/०२ पृ. २

सेवा सभा आराखडा

जून १० ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २६ (२१२)

१५ मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. जून २४ च्या सेवा सभेत होणाऱ्‍या चर्चेच्या तयारीसाठी म्हणून आपला विश्‍वव्यापी बंधूसमाज (इंग्रजी) हा व्हिडिओ पाहायला सर्वांना उत्तेजन द्या. पृष्ठ ४ वरील सूचनांचा उपयोग करून एप्रिल-जूनचे सावध राहा! (मासिक सादरतांच्या रकान्यातील पहिले.) आणि जून १५ चे टेहळणी बुरूज कसे सादर करावे याची दोन वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवा. दोन्ही प्रात्यक्षिकांमध्ये, “मला धर्मामध्ये आस्था नाही,” या संभाषणाला खीळ घालणाऱ्‍या प्रतिक्रियेला कसे हाताळायचे ते वेगळ्या प्रकारे दाखवा.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पुस्तिका, पृष्ठे ९.

१० मि: प्रश्‍न पेटी. संपूर्ण लेख आणि दिलेली शास्त्रवचने वाचावीत. मग, मार्च १९९८, आमची राज्य सेवा यातील प्रश्‍न पेटीवर आधारित इतर मुद्द्‌यांचे स्पष्टीकरण करताना अतिरिक्‍त विवेचन करा.

२० मि: “सढळ हाताने पेरणी केल्यास त्याच मानाने कापणी करू.”a टेहळणी बुरूज मार्च १, १९९३, पृष्ठे १६-१७, परिच्छेद १४-१७ वरील विवेचनांचा समावेश करा.

गीत क्र. २९ (२२२) आणि समाप्तीची प्रार्थना.

जून १७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र.  ७ (५१)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.

१५ मि: स्थानीय गरजा.

२० मि: “आहे त्यात तृप्त राहा.”b दिला जाणारा सल्ला शास्त्रवचनांवर आधारित आहे यावर जोर द्या आणि वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे होता होईल तितकी शास्त्रवचने वाचून त्यांची चर्चा करा.

गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.

जून २४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १५ (१२७)

८ मि: स्थानीय घोषणा. एक विवाहित जोडपे, सेवेत सोबत काम करताना एप्रिल-जूनचे सावध राहा! (मासिक सादरतांच्या रकान्यातील तिसरे.) आणि जुलै १ चे टेहळणी बुरूज नियतकालिक सादर करण्यासाठी पृष्ठ ४ वरील सूचनांचा उपयोग कसा करावा ते दाखवते. पती सावध राहा! सादर करतो आणि पत्नी टेहळणी बुरूज सादर करते.

१२ मि: स्थानीय मंडळीतल्या प्रचारकांना, (१) दुसऱ्‍या भाषेच्या लोकांना साक्ष दिल्याचे किंवा (२) घरोघरचे व रस्त्यावरचे साक्ष कार्य याव्यतिरिक्‍त इतर ठिकाणी साक्ष दिल्याचे अनुभव सांगण्यास अथवा त्यांनी ते कसे केले त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगा. पुढील आठवड्याच्या सेवा सभेची तयारी करताना सर्वांना, जुलै व ऑगस्ट महिन्यात सादर केल्या जाणाऱ्‍या माहितीपत्रकांसाठी एखादी सादरता निवडण्याचे उत्तेजन द्या.—जानेवारी २००२, आमची राज्य सेवा, पुरवणीतील “इतर प्रकाशने” ही पेटी पाहा.

२५ मि: “आपला विश्‍वव्यापी बंधूसमाज आपल्याला का प्रिय आहे.” दिलेल्या प्रश्‍नांनी, बंधूसमाज व्हिडिओची श्रोत्यांबरोबर थेट चर्चा सुरू करा.

गीत क्र. २८ (२२४) आणि समाप्तीची प्रार्थना.

जुलै १ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १७ (१८७)

१५ मि: स्थानीय घोषणा. जून महिन्याचा क्षेत्र सेवेचे अहवाल देण्यास प्रचारकांना आठवण करून द्या. प्रचारकांना विचारा, की ते जुलैदरम्यान कोणती माहितीपत्रके सादर करू इच्छितात आणि ते कोणत्या सादरतेचा उपयोग करणार आहेत.

१५ मि: भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा! भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. मुलांना तसेच कमी शिक्षण झालेल्यांना अथवा कमी वाचता येणाऱ्‍यांना यहोवाविषयी शिकण्यासाठी हे माहितीपत्रक ज्यांमुळे प्रभावशाली साधन ठरले आहे अशी काही वैशिष्ट्ये सांगा. माहितीपत्रकातील साध्या आणि बुद्धीला पटतील अशा स्पष्टीकरणांची चर्चा करा. विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत जाण्याकरता चित्रांचा उपयोग कशाप्रकारे करता येऊ शकतो ते दाखवा. पुरेपूर लाभ मिळेल अशाप्रकारे हे माहितीपत्रक कसे वापरता येईल त्याचे मार्ग सुचवा. पालकांनी आपल्या मुलांबरोबर या माहितीपत्रकाचा अभ्यास केला पाहिजे. उचित संधी येते तेव्हा क्षेत्र सेवेत ते सादर करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.

१५ मि: “तुम्हाला इतरांना मदत करायची ‘इच्छा’ आहे का?”c मदत करण्याची प्रवृत्ती बाळगण्यास मंडळीतील सर्वांना प्रोत्साहन द्या.

गीत क्र. २३ (२००) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा