वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०२ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००२
आमची राज्य सेवा—२००२
km ६/०२ पृ. ३

घोषणा

▪ साहित्य सादरता जून: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. या प्रकाशनांचा साठा नसेल तर, आणखी प्रकाशनांसाठी संस्थेला नवीन मागणी पाठवण्याऐवजी मंडळीकडे साठून राहिलेल्या नियतकालिकांचे जुने अंक व प्रकाशने सादर करावीत. जुलै व ऑगस्ट: कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक: जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी), तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखरी आपली काळजी करतो का? नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करतो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी), आणि सर्वकाळ टिकणारे ईश्‍वरी नाव (इंग्रजी). उचित असेल तेथे पुढील माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—ते तुम्हाला मदत करू शकतात किंवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी), युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी) आणि सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक. सप्टेंबर: जीवन अस्तित्वात कसे आले—उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी) पर्यायी सादरता म्हणून, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे, ही प्रकाशने तुम्ही देऊ शकता.

◼ प्रांतीय अधिवेशनांची अद्यावत माहिती: मे २००२ च्या आमची राज्य सेवा यातील यादीनुसार सिकंदराबाद येथे होणाऱ्‍या २००२ “आवेशी राज्य उद्‌घोषक” या प्रांतीय अधिवेशनांच्या तारखेत काही फेरबदल करण्यात आले आहेत. सुधारित तारखा याप्रमाणे आहेत: १) सिकंदराबाद (इंग्रजी) नोव्हेंबर ८-१०, व २) सिकंदराबाद (तेलगू) नोव्हेंबर १५-१७.

◼ बंगळूर येथील नवीन शाखा दफ्तराला भेट देऊ इच्छिणाऱ्‍या १० किंवा त्याहूनही अधिक लोकांच्या गटाने, येण्याआधी Bethel Office, Post Box No. 6441, Yelahanka, Bangalore 560 064, Karnataka या पत्त्यावर संपर्क साधावा. अड्डेविश्‍वनाथपुरा, बंगळूर येथील बेथेल संकुलाला भेटी द्यायला येणाऱ्‍या गटांची सोय बेथेल कार्यालय करील. तुमच्या येण्याची, अर्थात किती लोक येणार आणि कोणत्या तारखेला व किती वाजता भेट देणार आहात याविषयी आम्हाला आधीच कळवावे. ऑगस्ट १, २००२ च्या आधी कोणत्याही प्रकारच्या टूरची व्यवस्था केली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. बेथेल गृहांना भेटी द्यायला येण्याआधी, उचित पेहराव व केशभूषा यांविषयी आमची राज्य सेवा च्या याच अंकातील प्रश्‍न पेटीची उजळणी करावी.

◼ उर्दू भाषेतील सावध राहा! एप्रिल-जून २००२ च्या अंकापासून मासिक नव्हे तर त्रैमासिक आवृत्ती होणार आहे.

◼ सर्व मंडळ्यांनी याची नोंद घ्यावी की, FAB:FAC जानेवारी २४, २००१ या तारखेच्या आमच्या पत्रातील सूचनांनुसार मंडळ्या, आपल्या पुस्तकालयासाठी व्हिडिओ कॅसेट्‌सचा केवळ एकच संच मागवू शकतात. हे त्यांनी, प्रकाशन मागणी अर्ज (S-14) यात, “For Cong. Use.” या मथळ्याखाली सूचित करावे.

◼ सर्व मंडळ्यांना एक त्रैमासिक यादी मिळेल; त्यात, शाखा दफ्तराजवळच्या साठ्यात कोणकोणती प्रकाशने उपलब्ध आहेत हे सूचित केले जाईल. तीन महिन्यांतून एकदा सर्व मंडळ्यांना या यादीची सुधारित प्रत पाठवली जाईल. ही पुरवणी एखाद्या प्लास्टिक फोल्डरमध्ये घालून ती लिटरेचर काऊंटरजवळ ठेवावी. सेवा पर्यवेक्षक आणि सचिव यांनी, सुधारित प्रकाशनांच्या यादीतील प्रकाशनांचीच केवळ मागणी करावी. शाखा दफ्तराकडून मिळणाऱ्‍या पत्रात किंवा आमची राज्य सेवा यात घोषणा केली जात नाही तोपर्यंत कृपया इतर प्रकाशनांची मागणी करू नये.

◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीकरता प्रकाश २ —हिंदी, तेलगू

◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित —इंग्रजी

सर्व लोकांसाठी एक पुस्तक —नेपाळी

यहोवा—कोण आहे? (पत्रिका क्र. २३) —उर्दू

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा