प्रश्न पेटी
● ब्रुकलिन बेथेल, वॉचटावर फार्म्स तसेच जगातील कोणत्याही शाखा दप्तराला भेट देतेवेळी आमचा पेहराव तसेच केशरचना याकडे खासपणे का लक्ष देण्यास हवे?
ख्रिश्चनांनी योग्य स्वरुपाची भूषा करावी असे अपेक्षिले जाते. आमचा पेहराव तसेच केशभूषा यांनी यहोवा देवाचे सेवकास साजेशी असणारी प्रतिष्ठा व सुंदरता प्रवर्तित करण्यास हवी. हे जेव्हा आम्ही ब्रुकलिन बेथेल, वॉचटावर फार्म्स तसेच जगातील इतर कोणत्याही शाखा दप्तरांना भेट देतो तेव्हा योग्यच आहे. योग्य स्वरुपाचा पेहराव व केशभूषा याविषयीची माहिती देताना ऑर्गनाइज्ड टू अकंप्लीश आवर मिनिस्ट्री हे पुस्तक म्हणते की, क्षेत्रकार्य करताना आणि ख्रिस्ती सभांना येताना शारीरिक स्वच्छता व सभ्यतेचा पेहराव करण्यास हवा. मग, पृष्ठ १३१ वरील २ऱ्या परिच्छेदात ते पुढे म्हणतेः “हीच गोष्ट ब्रुकलिन येथील बेथेल गृह किंवा संस्थेच्या कोणाही शाखा दप्तराला भेट देताना खरी आहे. बेथेल या शब्दाचा अर्थ ‘देवाचे घर’ असा आहे हे लक्षात ठेवा. या कारणास्तव आम्ही राज्य सभागृहातील उपासनेच्या सभांना येतो तेव्हा आमचा पेहराव, केशभूषा व वागणूक या बाबतीत जे अपेक्षित आहे तशाच प्रकारे येथेही असावे.”
प्रेषित पौलाने म्हटले की, आम्ही “जगाला म्हणजे देवदूतांना व माणसांना जणू तमाशा असे” आहोत. (१ करिंथ ४:९) या कारणास्तव, यहोवाचे खरे उपासक जसे असण्याची धारणा लोकांनी बाळगलेली आहे त्यानुरुप आमचा पेहराव व केशभूषा यांनी त्यांच्यावर चांगला प्रभाव पाडला पाहिजे. तथापि, असे दिसण्यात आले आहे की, काही बांधव संस्थेच्या शाखा दप्तराला भेट देताना अगदीच गबाळ्या पद्धतीने आले होते. असा हा पेहराव शाखा दप्तराला भेट देताना उचित नाही. या बाबतीत तसेच आमच्या ख्रिस्ती जीवनाच्या इतर प्रकारात आम्ही तोच उच्च दर्जा राखला पाहिजे जो देवाच्या लोकांना जगापासून वेगळे असल्याचे दाखवील व देवाचे गौरव करील. (रोम. १२:२; १ करिंथ. १०:३१) हीच गोष्ट, आम्ही आमच्याकडून पवित्र शास्त्र अभ्यास घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, जेव्हा ते प्रथमच ब्रुकलिन बेथेलला किंवा संस्थेच्या इतर कोणाही शाखा दप्तराला भेट देतील तेव्हा त्यांना सांगावी आणि योग्य पेहराव घालावा व चांगली केशभूषा करावी याचे त्यांना स्मरण द्यावे.
तद्वत, संस्थेच्या कार्यालयांना भेटी देताना स्वतःला हे विचाराः ‘माझा पेहराव व केशभूषा सभ्यतेचा आहे का? (मीखा ६:८) मी ज्या देवाची भक्ती करतो त्याजवर हे चांगला परिणाम आणते का? माझ्या स्वरुपामुळे बाकीचे लोक विचलित होतील किंवा अडखळतील का? जे पहिल्याच वेळी भेट देत आहेत अशांना मी योग्य तऱ्हेचे उदाहरण मांडत आहे का?’ आपण नेहमी, आपला पेहराव व केशभूषा याकरवी “आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा” आणू या.—तीत. २:१०.