वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०२ पृ. ५
  • आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करा
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • ‘ऐकून ज्ञान वाढवा’
    आमची राज्य सेवा—२००१
  • ऐका आणि शिका
    आमची राज्य सेवा—२०१३
  • सन १९९९ “देवाचे भविष्यसूचक वचन” प्रांतीय अधिवेशने
    आमची राज्य सेवा—१९९९
  • १९९१ च्या “स्वातंत्र्याचे चाहते” प्रांतिय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आत्ताच योजना आखा
    आमची राज्य सेवा—१९९१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ९/०२ पृ. ५

आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करा

१ आपल्या आगामी “आवेशी राज्य उद्‌घोषक” प्रांतीय अधिवेशनामुळे आपल्याला, आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्याची सुरेख संधी मिळणार आहे. पौष्टिक शारीरिक भोजनाप्रमाणे, अधिवेशन कार्यक्रम “विश्‍वासाच्या वचनांनी” नक्कीच आपले पोषण करील. (१ तीम. ४:६) यामुळे आपण यहोवाच्या आणखी समीप येऊ. शिवाय, आपल्या जीवनात आपल्याला परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा धीर धरून राहण्यास मदत मिळावी म्हणून सल्ल्याची व प्रोत्साहनाची अपेक्षा आपण करू शकतो. “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन,” अशी हमी यहोवा आपल्याला देतो. (स्तोत्र ३२:८) त्याचे प्रेमळ मार्गदर्शन आपल्या जीवनात असल्यामुळे आपण किती धन्य आहोत! अधिवेशनाच्या कार्यक्रमातून होता होईल तितका फायदा घेण्यासाठी आपण काही व्यावहारिक गोष्टींचा विचार करू या.

२ आपण आपले अंतःकरण तयार केले पाहिजे: आपल्यातील प्रत्येकाला आपल्या लाक्षणिक अंतःकरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. (नीति. ४:२३) त्यासाठी आत्मानुशासनाची गरज आहे आणि स्वतःशी प्रामाणिक असण्याची गरज आहे. अधिवेशनाच्या वेळी आपण, यहोवाबरोबरील आपल्या नातेसंबंधाबाबत मनन करू शकतो, “स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण” करू शकतो. ‘वचन मुळावण्याकरता’ आपले अंतःकरण तयार करण्यासाठी आपण यहोवाला, आपल्या अंतःकरणाचे परीक्षण करून, आपल्यामध्ये “दुष्टपणाकडे काही प्रवृत्ति” आहे का ज्यासाठी आपल्याला सुधारणा करावी लागेल तर ती आपल्याला दाखवून देण्याची व “सनातन मार्गाने” आपल्याला नेण्याची आपण विनंती करू शकतो.—याको. १:२१, २५; स्तोत्र १३९:२३, २४.

३ ऐका व मनन करा: आपल्या बोलण्याकडे एकाग्रतेने लक्ष दिल्याबद्दल येशूने मरीयेची प्रशंसा करीत असे म्हटले: “मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.” (लूक १०:३९, ४२) आपली देखील अशी भावप्रवृत्ती असेल तर आपण लहानसहान गोष्टींमुळे आपले मन विचलित होऊ देणार नाही. आपण आपल्या जागेवर बसून राहू आणि संपूर्ण कार्यक्रमादरम्यान एकाग्रतेने ऐकू. आपण विनाकारण बोलण्याचे किंवा इकडेतिकडे फिरण्याचे टाळू आणि सेल्युलर फोन, पेजर, कॅमेरा व कॅमकॉर्डर्सने इतरांचे मन विचलित न करण्याची खबरदारी बाळगू.

४ भाषणे ऐकताना संक्षिप्त टिपणी घेणे अतिशय चांगले आहे; यामुळे हा विषय कशाप्रकारे साकारला जात आहे त्याचे परीक्षण करायला आपल्याला मदत होईल. आपण जे काही ऐकतो त्याचा संबंध आपल्याला आधीपासून जे माहीत आहे त्याच्याशी लावला पाहिजे. यामुळे आपल्याला भाषणात मांडल्या जाणाऱ्‍या गोष्टी समजतील आणि त्या आपल्या लक्षात राहतील. आणि मग, आपण लिहून घेतलेल्या टिपणीची उजळणी, ती माहिती आपण आपल्या जीवनात कशाप्रकारे लागू करू शकतो या हेतूने केली पाहिजे. आपण स्वतःला विचारू शकतो: ‘या माहितीमुळे यहोवाबरोबरील माझ्या नातेसंबंधावर कसा परिणाम पडतो? मला माझ्या जीवनात कोणते बदल करण्याची गरज आहे? इतरांबरोबरच्या माझ्या व्यवहाराच्या वेळी मी ही माहिती कशाप्रकारे लागू करू शकतो? मी या माहितीचा उपयोग क्षेत्र सेवेत कशाप्रकारे करू शकतो?’ आपल्याला आवडलेल्या मुद्द्‌यांची इतरांबरोबर चर्चा करा. असे केल्याने आपल्याला यहोवाची वचने “आपल्या अंतःकरणांत” ठेवण्यास मदत होईल.—नीति. ४:२०, २१.

५ शिकत असलेल्या गोष्टी लागू करू या: एका प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहिल्यानंतर, एका बांधवाने म्हटले: “अधिवेशन कार्यक्रम जणू प्रत्येकासाठीच बनवण्यात आला होता; प्रत्येकाला स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या अंतःकरणाचे परीक्षण करायला त्याने प्रवृत्त केले व लागणारी शास्त्रवचनीय मदत प्रेमळपणे दिली. या कार्यक्रमाने मला, मंडळीला अधिक साहाय्य देण्याचे माझे कर्तव्य आहे याची आणखी जाणीव करून दिली.” आपल्यातील बहुतेकांना कदाचित असेच वाटले असेल. पण, फक्‍त तेवढ्यापुरतेच प्रोत्साहित होणे, ताजेतवाने वाटणे पुरेसे नाही. येशू म्हणाला: “जर ह्‍या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहा.” (तिरपे वळण आमचे.) (योहा. १३:१७) जे मुद्दे आपल्या स्वतःला लागू होतात ते लगेच व्यवहारात आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. (फिलिप्पै. ४:९) आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्णपणे भागवण्याचा हाच एकमेव उपाय आहे.

[५ पानांवरील चौकट]

ऐकलेल्या गोष्टींवर मनन करा:

▪ या माहितीमुळे यहोवाबरोबरील माझ्या नातेसंबंधावर कसा परिणाम होतो?

▪ इतरांबरोबरच्या माझ्या व्यवहारावर याचा परिणाम कसा होतो?

▪ मी या माहितीचा उपयोग माझ्या जीवनात आणि क्षेत्र सेवेत कशाप्रकारे करू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा