वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०२ पृ. ६
  • स्वच्छतेमुळे यहोवाचे गौरव होते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्वच्छतेमुळे यहोवाचे गौरव होते
  • आमची राज्य सेवा—२००२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचे गौरव कसे करता येईल:
  • ▪ अधिवेशन होणाऱ्‍या ठिकाणच्या परिसराची स्वच्छता करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून पुढे या.
  • साजेल असा वेष देवाबद्दल आदर व्यक्‍त करतो
    आमची राज्य सेवा—२००३
  • यहोवाच्या नावाचा गौरव होईल असा तुमचा पेहराव आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • आपल्या पेहरावाकडे लक्ष देणं महत्त्वाचं का आहे?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ९/०२ पृ. ६

स्वच्छतेमुळे यहोवाचे गौरव होते

१ “सर्व पुरूषांनी व्यवस्थीत दाढी केली आहे, टाय लावला आहे. स्त्रियांचा पेहराव सभ्य आणि आदरणीय आहे.” आणखी एका सुरक्षा रक्षकाने म्हटले: “ते लोक, सभ्य, आदरणीय, स्वच्छ आणि नीटनेटके लोक आहेत. मला तर ते आनंदी दिसतात. या गलिच्छ जगात, तुम्ही घाण बाजूला काढू शकलात.” कोणत्या लोकांचे हे वर्णन आहे? राजकीय सभेतील लोकांचे? क्रिकेट मॅच पाहायला आलेल्या लोकांचे? लग्न समारंभातील लोकांचे? नाही! हे वर्णन मागच्या वर्षी झालेल्या एका मोठ्या प्रांतीय अधिवेशनासाठी जमलेल्या असंख्य बंधूभगिनींचे आहे.

२ आपल्यावतीने किती ही उत्तम साक्ष! आपल्या बंधूवर्गाची ही प्रशंसा ऐकून आपल्याला कृतज्ञ वाटत नाही का? अर्थात, समूहातील सर्वांच्या कार्यामुळे—स्टेडियम तयार करण्याचे व त्यांचे अनुकरणीय वर्तन—यांमुळे हा चांगला शेरा मारण्यात आला. आपली वागणूक इतरांपासून वेगळी असते हे जगभरातील लोकांना माहीत आहे. (मला. ३:१८) का? कारण आपण, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे,” या यहोवाच्या आज्ञेचे पालन करतो.—१ पेत्र १:१६.

३ जे “अपवित्र” ते पवित्र करणे? अधिवेशनांसाठी आपण भाड्याने वापरत असलेल्या ठिकाणांची, लोकांच्या गैरवापरामुळे, विध्वंसक कृत्यांमुळे, बाटल्या आणि केरकचरा फेकल्यामुळे पुष्कळ वर्षांपासून त्यांची दुरावस्था झालेली असते. प्रसाधनगृहे, ग्रीन रूम्स (कपडे बदलण्याची खोली) आणि सोबतच्या इमारती आपला पवित्र देव याच्या दर्जानुसार नसतात. उलट, त्या या युगाचे “अपवित्र” दैवत याचेच गुण दाखवतात. (२ करिंथ. ४:४) हे बदलण्यासाठी आपण काय करू शकतो?

४ चेन्‍नई, कोची, मुंबई येथे आपल्याला, कार्यक्रम सुरू व्हायच्या दोन किंवा तीन दिवस आधी अधिवेशने होणाऱ्‍या ठिकाणांची, या शहरांनी पूर्वी कधीही पाहिली नव्हती अशाप्रकारे साफसफाई करण्याकरता हजार पेक्षा अधिक स्वयंसेवकांची गरज लागेल. आणि अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी प्रसाधनगृहे स्वच्छ करण्यासाठी, गॅलरी झाडण्यासाठी, सीट धुण्यासाठी आणि इतर आवश्‍यक कामे करण्यासाठी आणखी शेकडो स्वयंसेवकांची आवश्‍यकता भासेल. तेव्हा, एका आगळ्यावेगळ्या मार्गाने यहोवाचा आदर करण्याच्या संधीत तुम्हालाही भाग घेता यावा म्हणून कामाचे कपडे आणायला विसरू नका.

५ पूर्वी आपली साफसफाईची कामे फक्‍त झाडू-पोचा मारणे आणि खुर्च्या पुसणे इतकीच कदाचित होती. पण या वर्षी, अधिवेशन होणाऱ्‍या ठिकाणाच्या कानाकोपऱ्‍यांतूनसुद्धा आपल्या शुद्ध देवाचे व्यक्‍तिमत्त्व प्रदर्शित झाले पाहिजे. यात सर्वजण भाग घेऊ शकतात. मुलांना कचरा, बाटल्या उचलून कचऱ्‍याच्या बॅगेत घालण्यास सांगितले जाऊ शकते. कुठे काही सांडलेले असेल किंवा फुटलेल्या वस्तू असतील तर त्याबद्दल स्वच्छता विभागाला सांगावे जेणेकरून ते येऊन ती जागा साफ करतील. इस्पितळात जशी स्वच्छता असते त्यासारखी आपल्या बांधवांनी प्रसाधनगृहांची स्वच्छता केल्यावर मात्र ही स्वच्छता कायम ठेवण्याचा अधिवेशनाला आलेल्या सर्वांनी प्रयत्न करावा.

६ वेशभूषा आणि केशभूषा: यातून काय स्पष्ट होते? अनेक वर्षांपासून आपल्या बंधूभगिनींनी सतत, साफसुथऱ्‍या वेशभूषेच्या व केशभूषेच्या बाबतीत उत्तम उदाहरण मांडले आहे. अधिवेशनाला येताना सर्वजण आपला उत्तम पोशाख घालतात आणि आपल्या भगिनींचा शालीन पेहराव मग ती साडी असो, सलवार-कमीझ असो, स्कर्ट असो, प्रशंसनीय आहे. युवकांची देखील प्रशंसा केली पाहिजे कारण ते जगात चाललेल्या अगदी नवीन फॅशनप्रमाणे किंवा फॅडप्रमाणे आपल्या पेहरावाची निवड करत नाहीत. (रोम. १२:२) या दर्जानुसार वागून आपण दाखवून देतो, की “देवाचे गौरव” करण्याची आपली इच्छा आहे.—१ पेत्र २:१२.

७ पेहरावाची गोष्ट चालली असताना, कृपया एक गोष्ट लक्षात ठेवा, की मुंबईच्या अधिवेशनात खुर्च्या पुरवल्या जाणार नाहीत; तेव्हा स्टेडियमच्या पायऱ्‍यांवर तुम्हाला आरामशीर बसता येईल अशाप्रकारचा पेहराव तुम्हाला करावा लागेल. तुम्ही बसायला एखादी चटई किंवा लहानशी उशी आणल्यास उत्तम. कोचीमध्ये, पुष्कळ लोकांना बंद सभागृहांमध्ये बसावे लागणार असल्यामुळे, सुटसुटीत पेहराव करणे सुज्ञपणाचे ठरेल.

८ आपण, “परमेश्‍वर आपला देव ह्‍याची पवित्र प्रजा” आहोत हे सिद्ध करून दाखवण्यासाठी सर्वजण, या वर्षाच्या “आवेशी राज्य उद्‌घोषक” प्रांतीय अधिवेशनात आपल्या परीने होता होईल तितका प्रयत्न करू या. यामुळे पडणारी चांगली छाप, यहोवाच्या ‘प्रशंसेत, नावलौकिकात आणि सन्मानात’ आणखी भर पाडील.—अनु. २६:१९.

[६ पानांवरील चित्रशीर्षक]

यहोवाचे गौरव कसे करता येईल:

[६ पानांवरील चित्रशीर्षक]

▪ अधिवेशन होणाऱ्‍या ठिकाणच्या परिसराची स्वच्छता करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून पुढे या.

▪ सर्व काही साफसुथरे ठेवण्यासाठी सहकार्य द्या.

▪ देवाच्या सेवकाला शोभत असलेला सुटसुटीत पेहराव करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा