वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०२ पृ. ४
  • ‘सर्वदा चांगले करीत राहा’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘सर्वदा चांगले करीत राहा’
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • चांगल्या कामात एक कित्ता व्हा
    आमची राज्य सेवा—२००३
  • २००८ यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन
    आमची राज्य सेवा—२००८
  • “तुम्ही जे काही करता ते सर्व प्रीतीने करावे”
    आमची राज्य सेवा—२०००
  • “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा”
    आमची राज्य सेवा—२०१४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ९/०२ पृ. ४

‘सर्वदा चांगले करीत राहा’

१ ख्रिस्ती जीवनशैलीत, ‘सर्वदा सर्वांचे चांगले करीत राहणे’ समाविष्ट आहे. (१ थेस्सलनी. ५:१५) प्रांतीय अधिवेशनांना उपस्थित राहताना आपल्याला इतरांचे चांगले करण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत. या वर्षी, आपण सर्वसामान्य जनतेच्या अधिकच नजरेत येणार आहोत. विशेषतः चेन्‍नई, कोची, मुंबई या शहरांमध्ये, पाच ते दहा हजारांची उपस्थिती अपेक्षित आहे. अधिवेशनासंबंधाने लोक जे ऐकतील व पाहतील त्यावरून ते आपल्याबद्दल मत बनवतील. यहोवाचे साक्षीदार म्हणून उत्तम नाव मिळवण्याची आपल्याला खूप चांगली संधी चालून आली आहे. आपली इच्छा आहे, की ज्या ज्या लोकांबरोबर आपला संपर्क येईल त्या सर्व लोकांना समजेल की बायबलच्या शिकवणुकींमुळेच आपण वेगळे लोक आहोत. आपली इच्छा आहे, की त्यांनी आपल्या नीटनेटकेपणाची, स्वच्छतेची, शिष्टाचाराची प्रशंसा करावी. आपल्यामध्ये निःस्वार्थ बंधूप्रेम आहे व आपण केवळ ‘आपलेच हित पाहत नाही तर दुसऱ्‍याचेहि पाहतो,’ हे त्यांनी प्रत्यक्ष पाहावे अशी आपली इच्छा आहे. (फिलिप्पै. २:४) कोणकोणत्या मार्गांद्वारे आपण या अधिवेशनांत असे करू शकतो, याचा आपण विचार करू या.

२ तुम्ही तुमच्या मुक्कामाची व्यवस्था केली आहे का? (१) आगाऊ बुकींग केल्यामुळे बांधवांना स्वस्त दरात लॉज व डॉरमेट्रींची सोय करता येते. एकदा बुकींग झाल्यावर आपण त्यात कोणत्याही परिस्थितीत फेरबदल करू नये; पूर्वीपेक्षा चांगल्या सोयीचे लॉज मिळाले तरीसुद्धा. आपले “बोलणे, होय तर होय,” असे असले पाहिजे. (मत्त. ५:३७) (२) तुम्ही उचित ॲडव्हान्स पाठवले नसले तरीसुद्धा तुमच्यासाठी खोलीचे बुकींग केले जाईल अशी अपेक्षा करू नका. (३) तुमची राहण्याची सोय करण्यात आलेल्या ठिकाणी काम करणाऱ्‍या सर्व हॉटेल कर्मचारी वर्गाबरोबर धीराने व आदराने वागा; ते आपल्या अपेक्षेप्रमाणे तत्परतेने कामे करत नसतील तरीसुद्धा. (४) हॉटेलचे कर्मचारी तुमची खोली साफ करत असले तरी, यहोवाने ठरवलेल्या स्वच्छतेच्या दर्जांनुसार तुम्ही राहत आहात हे दिसून येईल अशाच प्रकारे सर्व वेळी आपली खोली ठेवा. (५) हॉटेलच्या मालमत्तेसंबंधानी असलेल्या सर्व नियमांचे पालन करा. (६) वेटर आणि खोलीची झाडलोट करणाऱ्‍यांना काही बक्षिसी देण्याची पद्धत असेल तर तुम्हीही देऊ शकता.

३ चांगले कसे करायचे ते मुलांना शिकवणे: लोकांचे मुलांकडे निश्‍चितच लक्ष जाईल; आणि पुष्कळ वेळा मुलेच, लोकांवर जास्त प्रभाव पाडतात. पालकांनो, अधिवेशनाच्या आधी आपल्या मुलांबरोबर थोडा वेळ घालवून, सर्व वेळी व सर्व ठिकाणी त्यांच्याकडून कोणत्या प्रकारच्या ख्रिस्ती आचरणाची अपेक्षा केली जाते त्याची उजळणी केल्यास फायदेकारक होईल. (इफिस. ६:४) जसे की, त्यांना दाखवून द्या, की ख्रिस्ती प्रीती “गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही.” (१ करिंथ. १३:५) प्रौढांनी आधी सर्वांसमोर स्वतःचे उत्तम उदाहरण मांडल्यास वरील शब्द अधिक परिणामकारक ठरतील. मुलांनो, तुम्ही आपल्या पालकांच्या आज्ञा मानून, हॉटेलच्या मालमत्तेचा आदर करून व तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा विचार करून चांगले ते करू शकता. (कलस्सै. ३:२०) आपण ऐक्याने सर्वांचे चांगले करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ‘सर्व गोष्टींत आपला तारणारा देव ह्‍याच्या शिक्षणास शोभा आणतो.’—तीत २:१०.

४ आपल्या उत्तम आचरणाचा चांगला प्रभाव फक्‍त आपल्याला पाहणाऱ्‍या लोकांवर सर्वसामान्यपणे पडत नाही तर या नाही तर त्या कारणासाठी आपली टीका करणाऱ्‍या लोकांवर देखील पडतो. अधिवेशनात आणि अधिवेशन होणाऱ्‍या शहरात आपण जे काही करतो—रस्त्याने चालत असता, हॉटेलमध्ये जेवत असता, आपल्या खोलीत आराम करत असता किंवा अनौपचारिक साक्ष देण्याकरता संधीचा फायदा घेत असता—आपल्या ख्रिस्ती बोलण्यातून व कार्यातून हे सिद्ध झाले पाहिजे की सर्वांचे चांगले करण्याची आपली इच्छा आहे.

[४ पानांवरील चौकट]

आठवणीत ठेवा:

▪ तुम्ही राहता त्या ठिकाणच्या सर्व कर्मचाऱ्‍यांबरोबर धीराने व आदराने वागा.

▪ हॉटेलच्या किंवा डॉरमेट्रीच्या सर्व नियमांचे पालन करा, यामुळे सर्व पाहुण्यांना लाभ मिळेल.

▪ खोल्या शक्य तितक्या स्वच्छ व नीट ठेवा.

▪ तुमच्या मुलांच्या सर्व हालचालींवर योग्य लक्ष ठेवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा