वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०२ पृ. ३-६
  • “देवाचा संदेश पूर्णपणे गाजवावा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “देवाचा संदेश पूर्णपणे गाजवावा”
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • ‘सुवार्ता निश्‍चितार्थाने सांगा’
    आमची राज्य सेवा—२००८
  • आपण पुन्हा करणार का?—सहायक पायनियरांसाठी आणखीन एक आवाहन
    आमची राज्य सेवा—१९९८
  • यहोवाच्या अद्‌भुत कार्यांचे वर्णन करीत राहा
    आमची राज्य सेवा—२००४
  • पाहिजेत—४,००० सहायक पायनियर तुम्ही मार्च, एप्रिल वा मे महिन्यांत सहायक पायनियरींग करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—१९९७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km २/०२ पृ. ३-६

“देवाचा संदेश पूर्णपणे गाजवावा”

१ तुम्हाला एखादी गोष्ट मिळाल्यावर त्याविषयी मनापासून कृतज्ञता वाटते तेव्हा तुम्ही आपल्या वृत्तीतून आणि कृतींतून हे व्यक्‍त करत नाही का? साहजिकच करता! यहोवाने मानवजातीला दाखवलेला चांगुलपणा आणि प्रेमकृपा याविषयी प्रेषित पौलाने आपल्या भावना कशाप्रकारे व्यक्‍त केल्या याकडे लक्ष द्या. त्याने म्हटले: “देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुति होवो.” या ‘दानात’ कशाचा समावेश आहे? हे दान म्हणजे देवाने आपल्यावर केलेली “अपार कृपा.” या अपात्री कृपेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्याने आपल्या पापांच्या खंडणीकरता त्याच्या स्वतःच्या पुत्राला दिले.—२ करिंथ. ९:१४, १५; योहा. ३:१६.

२ पौलाने व्यक्‍त केलेली ही कृतज्ञता केवळ वरकरणी होती का? निश्‍चितच नाही! त्याने आपली ही मनःपूर्वक कृतज्ञता अनेक मार्गांनी दाखवली. त्याला सह ख्रिस्ती बांधवांच्या आध्यात्मिक कल्याणाची मनापासून काळजी होती आणि त्यांनी देवाच्या कृपेचा पुरेपूर फायदा करून घ्यावा म्हणून त्यांना हर तऱ्‍हेने मदत करण्यास तो उत्सुक होता. या बांधवांविषयी पौलाने म्हटले: “आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवहि देण्यास राजी होतो.” (१ थेस्सलनी. २:८) जे आधीच मंडळीत होते त्यांना आपले तारण अधिक पक्के करण्यास मदत करण्याव्यतिरिक्‍त पौलाने जमीन व समुद्रातून हजारो मैल प्रवास करून, सुवार्ता गाजवण्यासाठी व ‘सार्वकालिक जीवनाकरता योग्य मनोवृत्ती असलेल्यांना’ शोधण्यासाठी अथक परिश्रम घेतले. (प्रे. कृत्ये १३:४८, NW) यहोवाने आपल्याकरता जे काही केले होते त्याविषयी मनस्वी कृतज्ञता वाटत असल्यामुळे पौलाला ‘सुवार्ता पूर्णपणे गाजवण्याची’ प्रेरणा मिळाली.—कलस्सै. १:२५, इजी-टू-रीड व्हर्शन.

३ यहोवाने आपल्याकरता जे केले आहे त्याबद्दलची कृतज्ञता, मंडळीत ज्यांना आपल्या आध्यात्मिक मदतीची गरज आहे अशांना साहाय्य करण्याची आपल्यालाही प्रेरणा देत नाही का? (गलती. ६:१०) आणि आपल्या सबंध क्षेत्रात राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात पुरेपूर सहभाग घेण्याची आपल्याला प्रेरणा मिळत नाही का?—मत्त. २४:१४.

४ कृतज्ञता व्यक्‍त करण्याची सुसंधी: दर वर्षी ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीदरम्यान यहोवा व येशूने आपल्यावर केलेल्या अपार कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यास एक खास संधी आपल्याला मिळते. ही आपल्या इतर सभांप्रमाणे नाही किंवा केवळ एका घटनेच्या आठवणीदाखल नाही. येशूने म्हटले: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (तिरपे वळण आमचे.) (लूक २२:१९) ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी आपल्याला येशू कशाप्रकारची व्यक्‍ती आहे याची आठवण करून देतो. स्मारकविधीच्या काळात आपण हे ओळखले पाहिजे की येशू जिवंत आहे आणि त्याच्या विश्‍वासू जीवनाबद्दल आणि बलिदानाबद्दल त्याला देण्यात आलेल्या गौरवात व राज्यत्वात तो आज क्रियाशील आहे. तसेच, हा विधी आपल्याला ख्रिस्ती मंडळीच्या सर्व कारभारांचे व कार्यहाचालींचे नेतृत्व करणाऱ्‍या ख्रिस्ताच्या मस्तकपदाला अधीनता दाखवण्याचीही संधी देतो. (कलस्सै. १:१७-२०) देवाच्या सर्व सेवकांनी ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीकरता आदरपूर्वक उपस्थित राहिले पाहिजे. या वर्षी हा विधी गुरूवार, मार्च २८, २००२ रोजी सूर्यास्तानंतर साजरा केला जाईल.

५ गत वर्षीच्या स्मारकविधीच्या आधी सर्वांनी केलेल्या प्रयत्नांमुळे भारतात ५२,७२५ ही अभूतपूर्व उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. या वर्षी उपस्थिती किती असेल? आपण अधिकाधिक लोकांना उपस्थित राहण्याकरता जे ‘श्रम व खटपट’ करू त्यावर हे अवलंबून आहे.—१ तीम. ४:१०.

६ प्रभूच्या सांज भोजनाला उपस्थित राहण्यासोबतच कदाचित आपल्याला आपल्या क्षेत्र सेवाकार्यातही वाढ करता येईल. हजारो बंधू व भगिनी यादरम्यान एक किंवा अधिक महिने सहायक पायनियरिंग करतील यात शंका नाही. मागील पाच वर्षांपासून दर वर्षी स्मारकविधीच्या काळात मार्चपासून मेपर्यंत सरासरी १,५१५ बांधव सहायक पायनियरिंग करतात. या वर्षी या खास सुसंधीचा फायदा घेता यावा म्हणून तुम्हाला आपल्या कार्यांत थोडाफार बदल करता येईल का? हा ख्रिस्ताच्या बलिदानाच्या देवाने केलेल्या प्रेमळ तरतुदीबद्दल मनस्वी कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. खालील अनुभवांप्रमाणे यहोवा तुम्हालाही या कार्यात विपुल आशीर्वाद देईल याची तुम्ही खात्री बाळगू शकता.

७ पूर्ण वेळेची नोकरी करणाऱ्‍या एका बहिणीने मागच्या मार्च महिन्यात सहायक पायनियरिंग केल्यानंतर आपल्या अनुभवाविषयी लिहिले: “फेब्रुवारी २००१ ची आमची राज्य सेवा यात स्मारकविधीच्या काळात अनुकूल परिस्थिती असलेल्या सर्वांना सहायक पायनियरिंग करण्याचे प्रोत्साहन देण्यात आले होते. मार्च महिन्यात पाच शनिवार असल्यामुळे माझ्या वेळापत्रकाला हे अगदीच अनुकूल ठरले. मी लगेच अर्ज भरण्याचे ठरवले.” महिन्याच्या सुरवातीलाच तिने एक बायबल अभ्यास सुरू करण्याचे ध्येय ठेवले. तिला यश आले का? होय, त्या महिन्यात साक्षकार्य करताना ५२ व्या तासात तिला बायबल अभ्यास सुरू करता आला! तिचा निष्कर्ष? “आपण अधिक प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला विलक्षण आशीर्वाद मिळतात.”

८ सबंध कुटुंब मिळून पायनियरिंग करणाऱ्‍यांना कोणते आशीर्वाद मिळतात? चार जणांच्या एका कुटुंबाने मागच्या एप्रिल महिन्यात असे करून पाहिले आणि तो महिना त्यांच्याकरता अविस्मरणीय ठरला. आई सांगते: “आम्ही सर्व जण मिळून सेवाकार्य करत असल्यामुळे प्रत्येक दिवसाची आम्ही उत्कंठेने वाट पाहात होतो! सेवाकार्यात आलेल्या अनुभवांविषयी दररोज संध्याकाळी जेवायच्या वेळी चर्चा करताना खूप मजा यायची.” मुलगा म्हणतो: “एरवी बाबा कामावर जात असल्यामुळे या महिन्यात त्यांच्यासोबत आठवडाभर क्षेत्र सेवा करायला खूप मजा आली.” वडील सांगतात: “कुटुंब प्रमुख या नात्याने सध्याच्या काळातील सर्वात महत्त्वाचे कार्य आम्ही सर्व मिळून करत होतो याचे मला मनस्वी समाधान वाटले.” तुम्हीही सबंध कुटुंब मिळून पायनियरिंग करू शकता का? या स्मारकविधीच्या काळात सबंध कुटुंब मिळून साहाय्यक पायनियरिंग करण्यासंबंधी तुम्हाला कुटुंब या नात्याने चर्चा करता येईल का?

९ मार्च महिना आजवरचा सर्वोत्कृष्ठ महिना बनवता येईल का? २००० वर्षाच्या सुरवातीला आमची राज्य सेवा यात असे आवाहन करण्यात आले होते: “एप्रिल २०००—आपल्यासाठी आजवरचा खास महिना ठरो.” या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळाला? अनेक नवीन उच्चांक या महिन्यात गाठण्यात आले. सहायक पायनियरांच्या संख्येत ३,२८७ हा एकाच महिन्यात गाठलेला अभूतपूर्व उच्चांक होता. शिवाय, बायबल अभ्यास, तास, प्रचारकांची संख्या आणि पुनर्भेटी यांत देखील नवीन उच्चांक गाठण्यात आले. या खास महिन्यातील विशेष आध्यात्मिक कार्यामुळे तुमच्या मंडळीत निर्माण झालेले उत्साही वातावरण तुम्हाला आठवते का? यावर्षी आपल्याला तितकेच किंवा त्याहीपेक्षा अधिक कार्य करता येईल का? सर्वांनी मन लावून प्रयत्न केल्यास, मार्च २००२ आपला आजवरचा “सर्वोत्कृष्ट महिना” ठरू शकतो. मार्च का बरे?

१० मार्च एक खास महिना असण्यामागे दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे, मार्चच्या शेवटाला स्मारकविधी साजरा केला जाईल आणि त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त लोकांना या विधीकरता आमंत्रित करण्याच्या भरपूर संधी आपल्याला मिळतील. दुसरे म्हणजे, या वर्षी मार्च महिन्यात पाच सप्ताहांत आहेत आणि यामुळे जे नोकरी करतात किंवा शाळेला जातात त्यांना सहायक पायनियरिंग करणे सोपे जाईल. या पुरवणीत दिलेल्या दिनदर्शिकेनुसार सोयीस्कर पडणारा आराखडा तुम्हाला बनवता येईल का? सहायक पायनियरिंग करणे तुम्हाला वाटते तितके कठीण नाही. उदाहरणार्थ, पाचही आठवड्यांच्या शनिवार-रविवारी ८ तास क्षेत्र सेवा केल्यास, ५० तासांची आवश्‍यकता पूर्ण करण्यासाठी राहिलेल्या महिन्यादरम्यान केवळ आणखी १० तास तुम्हाला करावे लागतील.

११ मंडळीतल्या सर्वांना ‘पूर्णपणे सुवार्ता गाजवण्यास’ मदत करण्यासाठी वडील काय करू शकतात? सभेतील भागांतून आणि वैयक्‍तिक संभाषणांतून उत्साह निर्माण करा. पुस्तक अभ्यास घेणाऱ्‍यांनी आणि त्यांच्या सहाय्यकांनी स्वतः पुढाकार घेऊन आपापल्या गटातील प्रत्येकाशी बोलून त्यांना वैयक्‍तिक मदत द्यावी. केवळ थोडी प्रेमळ विचारपूस व प्रोत्साहन आणि काही व्यावहारिक सूचना यांचीच काही जणांना गरज असेल. (नीति. २५:११) बऱ्‍याच जणांना जाणीव होईल की त्यांच्या वेळापत्रकात केवळ काही जुजबी फेरबदल केल्यास त्यांना देखील सहायक पायनियर म्हणून सेवा करण्याचा बहुमान मिळवता येईल. बऱ्‍याच मंडळ्यांमध्ये, सर्व नाही तरी बहुतेक वडील व सेवा सेवक आणि त्यांच्या पत्नी स्मारक विधीच्या काळात सहायक पायनियरिंग करण्याद्वारे इतरांकरता उत्तम आदर्श मांडतात. यामुळे बऱ्‍याच प्रचारकांनाही त्यांच्यासोबत पायनियर सेवा करण्याचे प्रोत्साहन मिळते. शारीरिक अडचणींमुळे किंवा इतर परिस्थितींमुळे काही प्रचारकांना कदाचित पायनियर सेवा करणे शक्य नसेल, पण मंडळीसोबत सेवाकार्यात शक्य तितका सहभाग घेण्याद्वारे त्यांना देखील आपली कृतज्ञता व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन दिले जाऊ शकते.

१२ या सर्व योजना सफल होण्यासाठी वडिलांना विचारपूर्वक समायोजन करणे आवश्‍यक आहे. सबंध आठवड्यात सोयीस्कर वेळी क्षेत्र सेवेकरता सभा आयोजित केल्या जाव्यात. शक्य असल्यास, सेवा पर्यवेक्षकांनी सेवेच्या सर्व सभा चालवण्याकरता सुयोग्य बांधवांना आधीपासूनच नेमावे. या सभा, तसेच गटाची विभागणी, क्षेत्र वाटप आणि प्रार्थना हे सर्वकाही १० ते १५ मिनिटांत आटपावे म्हणून चांगली तयारी करावी लागेल. (सप्टेंबर २००१ ची आमची राज्य सेवा यातील प्रश्‍न पेटी पाहा.) सबंध महिन्यातील कार्यक्रमांची रूपरेषा मंडळीला समजावून सांगण्यात यावी आणि याची एक प्रत मंडळीच्या सूचना फलकावर देखील लावली जावी.

१३ पुरेसे क्षेत्र उपलब्ध करून दिले जावे. सेवा पर्यवेक्षकांनी क्षेत्रांची देखरेख करणाऱ्‍या बांधवांसोबत भेटून सहसा पूर्ण न केल्या जाणाऱ्‍या क्षेत्रांत कार्य करण्याकरता योजना आखाव्यात. घरी न भेटणाऱ्‍या लोकांकडे, रस्त्यावरील साक्षकार्य, दुकानांतील आणि संध्याकाळच्या साक्षकार्याकडे विशेष लक्ष दिले जावे. योग्य असल्यास काही प्रचारकांना टेलिफोन साक्षकार्य करण्यास मदत करता येईल.

१४ त्यांना पुन्हा सेवा करण्यास मदत करा: तुमच्या मंडळीतल्या क्षेत्रात असे काही लोक आहेत का ज्यांनी सुवार्तेचा प्रचार करण्याचे थांबवले आहे? हे लोक अद्यापही मंडळीचे भाग आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे. (स्तो. ११९:१७६) या जुन्या जगाचा अंत अतिशय जवळ आला असून नव्या जगाची पहाट लवकरच उजाडणार असल्यामुळे अक्रियाशील झालेल्यांना मदत करण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न करण्याचे चांगले कारण आपल्याजवळ आहे. (रोम. १३:११, १२) मागील पाच वर्षांत, दरवर्षी जवळजवळ ३०० लोक त्यांना दिल्या जाणाऱ्‍या मदतीला प्रतिसाद देऊन पुन्हा क्रियाशील झाले. आणखी अनेक जणांच्या मनात पूर्वीसारखेच प्रेम आणि विश्‍वास पुन्हा जागृत करण्यासाठी काय केले जाऊ शकते?—इब्री ३:१२-१४.

१५ वडील वर्ग, मागील काही वर्षांत अक्रियाशील झालेल्यांना कशी मदत करता येईल याविषयी चर्चा करू शकतात. (मत्त. १८:१२-१४) सचिवांनी मंडळीच्या प्रचारक अहवाल कार्डांचे परीक्षण करून अक्रियाशील झालेल्यांची नावे नोंदवावीत. मेंढपाळ भेटी देऊन अशा व्यक्‍तींना साहाय्य पुरवण्याची व्यवस्था करण्याचा खास प्रयत्न केला जावा. विशिष्ट व्यक्‍तीसोबत आधीपासून चांगली ओळख असल्यामुळे कदाचित वडील स्वतः त्या व्यक्‍तीला पुन्हा जाऊन भेटू शकतात, किंवा इतर प्रचारकांनाही यासंदर्भात मदत करण्याची विनंती केली जाऊ शकते. कदाचित या प्रचारकांनी त्या अक्रियाशील झालेल्या व्यक्‍तीसोबत बायबल अभ्यास केला असेल आणि आता तिला मदतीची गरज असल्यामुळे ते आनंदाने मदत करण्यास तयार होतील. अक्रियाशील झालेल्यांपैकी बरेच जण देवाच्या वचनाचा पुन्हा एकदा प्रचार करण्यास सुरवात करण्यासाठी प्रेरित होतील अशी आशा आपण करू शकतो. ते प्रचार करण्यास योग्य असल्यास, स्मारकविधीचा काळच त्यांना पुन्हा सुरवात करण्यासाठी उत्तम ठरणार नाही का?—सविस्तर माहितीकरता आमची राज्य सेवा याच्या नोव्हेंबर २००० अंकातील प्रश्‍न पेटी पाहा.

१६ प्रचार करण्याकरता आणखी कोण योग्य आहेत? यहोवा “राष्ट्रांतील निवडक वस्तु” आपल्या संघटनेत आणून त्याच्या लोकांना सातत्याने आशीर्वादित करत आहे. (हाग्ग. २:७) दरवर्षी हजारो जण बाप्तिस्मा न झालेले प्रचारक होण्यास योग्य ठरतात. हे कोण आहेत? यहोवाच्या साक्षीदारांची मुले आणि प्रगतीशील बायबल विद्यार्थी. ते सुवार्तेचा प्रचार करण्याकरता योग्य आहेत हे आपण कसे ठरवू शकतो?

१७ यहोवाच्या साक्षीदारांची मुले: अनेक मुले कित्येक वर्षांपासून आपल्या आईवडिलांसोबत घरोघरच्या कार्यात सहभागी झाली आहेत. पण अद्याप या मुलांनी बाप्तिस्मा न झालेले प्रचारक म्हणून सेवा करण्यास सुरवात केलेली नाही. सुरवात करण्याची एक उत्तम वेळ म्हणजे येता मार्च महिना. तुमचे मूल प्रचारक होण्यास योग्य आहे असे केव्हा म्हणता येईल? आपली सेवा पूर्ण करण्यास संघटित यातील पृष्ठ १०० वर असे म्हटले आहे, की ‘मुलाची वागणूक आदर्श असून त्याला इतरांशी सुवार्तेबद्दल मनापासून प्रेरित होऊन बोलण्याद्वारे आपला विश्‍वास व्यक्‍त करता आला पाहिजे.’ या आवश्‍यकतेनुसार जर तुमचे मूल तयार आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मंडळीच्या सेवा समितीतील एका वडिलाशी यासंबंधी बोलू शकता.

१८ पात्र बायबल विद्यार्थी: एखाद्या बायबल विद्यार्थ्याने काही काळापर्यंत ज्ञान घेऊन सभांना यायला सुरवात केली असेल तर तो राज्य प्रचारक होण्याची इच्छा व्यक्‍त करू शकतो. अशा विद्यार्थ्यासोबत तुम्ही अभ्यास करत असल्यास हे प्रश्‍न विचारात घ्या: तो आपल्या वयानुसार आणि क्षमतेनुसार प्रगती करत आहे का? त्याने आपला विश्‍वास अनौपचारिकपणे सांगण्यास सुरवात केली आहे का? तो ‘नवा मनुष्य’ धारण करत आहे का? (कलस्सै. ३:१०) आपली सेवा पुस्तकातील ९७-९ पृष्ठांवर बाप्तिस्मा न घेतलेल्या प्रचारकांसाठी दिलेल्या आवश्‍यकता तो पूर्ण करतो का? करत असल्यास, तुम्ही मंडळीच्या सेवा समितीशी संपर्क साधावा जेणेकरून तुमच्यासोबत त्या विद्यार्थ्याची भेट घेण्यासाठी दोन वडिलांची व्यवस्था केली जाऊ शकेल. तो योग्य असल्यास, ते दोन वडील त्याला याची सूचना देतील आणि यानंतर तो सार्वजनिक सेवेत सहभाग घेण्यास सुरवात करू शकतो.

१९ एप्रिल व मेविषयी काय? हे देखील अधिक क्षेत्र सेवेचे खास महिने असतील. मार्च महिन्यात पायनियरिंग करणाऱ्‍यांपैकी बरेच जण एप्रिल व/किंवा मेमध्येही पुन्हा पायनियरींग करू शकतील. एप्रिल व मे दरम्यान आपण विशेषतः टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके सादर करू. ही नियतकालिके वाचणाऱ्‍या कित्येकांना याचे उत्तम फायदेकारक परिणाम अनुभवायला मिळाले आहेत! या नियतकालिकांनी जगभरात झालेल्या अद्‌भुत वाढीत मोठा हातभार लावला आहे. एप्रिल व मे महिन्यांदरम्यान शक्य तितक्या लोकांना ही नियतकालिके देण्याचा खास प्रयत्न केला जाईल. या कार्यात पुरेपूर सहभाग घेण्याकरता आतापासूनच तयारी करा.

२० अधिक प्रचार कार्याची योजना केल्यामुळे मंडळीद्वारे तुम्हाला प्राप्त होणाऱ्‍या नियतकालिकांची संख्या वाढवावी लागले का? सबंध सेवा वर्षात आपण दर शनिवारी अर्थात आपला नियतकालिक दिवस असतो तेव्हा आपण टेहळणी बुरूज व सावध राहा! सादर करतो. पण या महिन्यांत अनेक जण सहायक पायनियर सेवा करत असल्यामुळे, आणि दोन महिने आपण सर्वजण नियतकालिके सादर करणार असल्यामुळे तुम्हाला मंडळीमधून अधिक नियतकालिके मागवावी लागतील. यासाठी लवकरात लवकर तुमच्या मंडळीच्या नियतकालिक सेवकाला याविषयी सांगावे. तसेच तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? या पत्रिकेच्या पुरेशा प्रती सर्वांकरता उपलब्ध असतील याची साहित्य सेवकाने दखल घ्यावी.

२१ आमची राज्य सेवा यातील “मासिके कशी सादर कराल” या सदराविषयी बऱ्‍याच जणांनी आभार व्यक्‍त केले आहेत. तुम्ही या सदराचा फायदा करून घेण्यासाठी यात दिलेल्या नियतकालिक सादरतांचा उपयोग करून पाहिला आहे का? दर आठवड्यात तुमच्या कौटुंबिक बायबल अभ्यासातला काही वेळ या सादरतांचा सराव करण्यासाठी तुम्हाला वापरता येईल का?

२२ स्मारकविधीच्या काळाचा पुरेपूर उपयोग करा: प्रेषित पौलाप्रमाणेच आपणही या स्मारकविधीच्या काळात आयोजित केलेल्या आध्यात्मिक कार्यक्रमांत पुरेपूर सहभाग घेण्याद्वारे यहोवाने दिलेल्या ‘अवर्णनीय दानाबद्दल’ किती कृतज्ञ आहोत हे त्याला दाखवू. या महिन्यांतील विशेष कार्ये पुढीलप्रमाणे असतील: (१) वर्षातील सर्वात महत्त्वाची घटना अर्थात गुरुवार, मार्च २८, २००२ रोजी प्रभूचे सांज भोजन या विधीला उपस्थित राहणे; (२) अक्रियाशील झालेल्यांना “पहिली प्रीति” पुन्हा जागृत करण्यास मदत करणे (प्रकटी. २:४; रोम. १२:११); (३) बाप्तिस्मा न झालेले प्रचारक होण्यास आपल्या मुलांना व पात्र असलेल्या बायबल विद्यार्थ्यांना मदत करणे; आणि (४) सुवार्ता प्रचाराच्या कार्यात पूर्णपणे सहभागी होणे, मार्च महिन्यात आणि त्यानंतरही सहायक पायनियर सेवा करणे.—२ तीम. ४:५.

२३ आमची मनःपूर्वक प्रार्थना आहे की सर्वांनी या स्मारकविधीच्या काळात राज्याच्या सुवार्तेच्या प्रचारात पुरेपूर सहभाग घ्यावा आणि त्याद्वारे यहोवाने आपल्याकरता जे काही केले आहे त्याविषयी आपली मनस्वी कृतज्ञता व्यक्‍त करावी.

[६ पानांवरील चौकट]

मार्च २००२ करता वैयक्‍तिक क्षेत्र सेवा आराखडा

रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरूवार शुक्रवार शनिवार

१ २

नियतकालिक दिन

३ ४ ५ ६ ७ ८ ९

नियतकालिक दिन

१० ११ १२ १३ १४ १५ १६

नियतकालिक दिन

१७ १८ १९ २० २१ २२ २३

नियतकालिक दिन

२४ २५ २६ २७ २८ २९ ३०

स्मारकविधी नियतकालिक दिन

सूर्यास्तानंतर

३१

तुम्ही मार्च महिन्यात सहायक पायनियरिंग करण्याकरता ५० तास काढू शकता का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा