वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०२ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००२
आमची राज्य सेवा—२००२
km २/०२ पृ. ७

घोषणा

◼ साहित्य सादरता फेब्रुवारी: जीवन—अस्तित्वात कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी), प्रकटीकरण—त्याचा भव्य कळस जवळ आहे!, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य, किंवा कोणतेही १९२ पानी जुने पुस्तक. मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न केला जाईल. एप्रिल व मे: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके. आवड दाखवणाऱ्‍या लोकांकडे मॅग्झीन रुट सुरू करण्यासाठी पुनर्भेटी द्या. मॅगझीन रूट जेथे सुरू करणे शक्य नाही फक्‍त तेथेच वर्गणी दिली जाऊ शकते. बायबल अभ्यास सुरू करण्याच्या दृष्टीने अपेक्षा माहितीपत्रक द्यावे.

◼ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने मार्च १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. त्यानंतर मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.

◼ मंडळीचे सचिव आणि सेवा पर्यवेक्षकांनी सर्व सामान्य पायनियरांच्या कार्याची उजळणी करावी. जर कोणाला तास भरायला त्रास होत असेल तर वडिलांनी त्यांना हव्या त्या मदतीची व्यवस्था करावी. अधिक सूचना हव्या असतील तर संस्थेच्या वार्षिक पत्रांची (S-201) उजळणी करा. तसेच, ऑक्टोबर १९८६ च्या आमची राज्य सेवा (इंग्रजी) यातील पुरवणीचे १२-२० परिच्छेद पाहा.

◼ सन २००२ च्या स्मारक विधीच्या काळात खास जाहीर भाषण रविवार, एप्रिल १४ रोजी दिले जाईल. त्या भाषणाचा विषय असेल, “यहोवाचा ‘भयंकर दिवस’ डोळ्यांपुढे ठेवा!” त्यासाठी एक रूपरेषा पुरवली जाईल. त्या सप्ताहांती ज्या मंडळ्यांमध्ये विभागीय पर्यवेक्षकांची भेट किंवा संमेलन असेल त्यांच्याकरता हे खास भाषण पुढील आठवडी असेल. कोणत्याही मंडळीत एप्रिल १४ २००२ च्या आधी हे खास भाषण दिले जाऊ नये.

◼ टेहळणी बुरूज प्रकाशन सूची १९८६-२००० या प्रकाशनाच्या मर्यादित प्रती इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. प्रत्येक मंडळी आपल्या मंडळीच्या लायब्ररीकरता केवळ एक प्रत मागवू शकते.

◼ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:

टेहळणी बुरूज प्रकाशन सूची १९८६-२००० —इंग्रजी

मृत लोकांकरता कोणती आशा? (पत्रिका क्र. १६) —निकोबारी

तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? (पत्रिका क्र. २६) —उर्दू

◼ पुन्हा उपलब्ध झालेली प्रकाशने:

मृत प्रिय जनांकरता कोणती आशा? (पत्रिका क्र. १६) —आसामी, इंग्रजी, उडीया, कन्‍नड, गुजराती, तामीळ, तेलगू, नेपाळी, बंगाली, मराठी, मल्याळम, हिंदी

या जगाचा बचाव होईल का? (पत्रिका क्र. १९) —इंग्रजी, कन्‍नड, गुजराती, तामीळ, तेलगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, मराठी, मल्याळम, हिंदी

खिन्‍न झालेल्यांकरता सांत्वन (पत्रिका क्र. २०) —इंग्रजी, कन्‍नड, गुजराती, तामीळ, तेलगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, मराठी, मल्याळम, हिंदी

यहोवाचे साक्षीदार कोण आहेत? (पत्रिका क्र. ७३) —तेलगू

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा