नोहा—तो देवासमागमे चालला सर्वांकरता उद्बोधक
उत्पत्ति ६:१ ते ९:१९ वाचा किंवा त्याची उजळणी करा. यानंतर नोहा व्हिडिओ पाहा आणि पुढील प्रश्नांची तुम्ही कशी उत्तरे द्याल यावर विचार करा: (१) नोहाच्या काळात जगात कशी परिस्थिती होती आणि अशी परिस्थिती का निर्माण झाली? (२) नोहाचे काय वैशिष्ट्य होते, देवाने त्याला काय काम दिले होते आणि का? (३) तारू कदाचित कोठे बांधण्यात आले असावे, ते बांधायला किती काळ लागला आणि ते किती मोठे होते? (४) तारू बांधण्याव्यतिरिक्त नोहाला व त्याच्या कुटुंबाला आणखी कोणते काम करायचे होते? (५) तारवाचे दार बंद केल्यानंतर तुमच्या मते आतल्या लोकांना कसे वाटले असावे? (६) प्रलयातून बचावल्यानंतर तुम्हाला कसे वाटले असते? (७) जलप्रलयाची आठवण करून देणारी कोणती गोष्ट आपल्याला अधूनमधून पाहायला मिळते आणि त्याचा काय अर्थ होतो? (८) नोहाच्या बायबल वृत्तान्ताने तुम्हाला स्वतःविषयी, आपल्या कुटुंबाविषयी आणि देवाने आपल्याला जे काम सोपवले आहे त्याविषयी काय शिकवले आहे? (९) नोहा व त्याचे कुटुंब परादीसमध्ये भेटतील तेव्हा तुम्हाला त्यांना कोणते प्रश्न विचारायला आवडतील? (१०) नोहा या व्हिडिओचा कशाप्रकारे उपयोग करण्याचे तुम्ही ठरवले आहे?