वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०२ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००२
  • उपशिर्षक
  • फेब्रुवारी ११ ने सुरू होणारा सप्ताह
  • फेब्रुवारी १८ ने सुरू होणारा सप्ताह
  • फेब्रुवारी २५ ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च ४ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००२
km २/०२ पृ. २

सेवा सभा आराखडा

फेब्रुवारी ११ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र.  १६ (१४३)

१२ मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. फेब्रुवारी २५ च्या सेवा सभेच्या कार्यक्रमात होणार असलेल्या चर्चेची तयारी करण्यासाठी सर्वांना उत्पत्ति ६:१ ते ९:१९ वाचण्याची किंवा त्याची उजळणी करून नोहा—तो देवासमागमे चालला हा व्हिडिओ पाहण्याचे प्रोत्साहन द्या.

२० मि: “देवाचा संदेश पूर्णपणे गाजवावा.”a (परिच्छेद १-१३) अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी हा भाग हाताळावा. मार्च महिन्यात व त्यानंतरही आपण काय साध्य करू इच्छितो याविषयी उत्साही चर्चा. मार्च महिन्यात सेवाकार्यात शक्य तितका सहभाग घेण्यासाठी उपयोगी पडेल असा आराखडा तयार करण्यासाठी सर्वांनी पुरवणीत दिलेल्या कॅलेंडरचा उपयोग करावा. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना त्यांना सहायक पायनियरिंग करण्याचे उत्तेजन द्या. ७-८ परिच्छेदांची चर्चा करताना, मागील स्मारकविधीदरम्यान पायनियरिंग केलेल्यांना कोणते आशीर्वाद मिळाले याविषयी सांगण्याचे निमंत्रण द्या. या सभेनंतर सहायक पायनियरिंगकरता अर्ज मिळू शकतील अशी घोषणा करा.

१३ मि: “मासिके कशी सादर कराल.” आमची राज्य सेवा यातील या सदरामुळे प्रचारकांना, नियतकालिकांतील लेखांचा संबंध आजच्या या कठीण काळातील बिकट परिस्थितींशी जोडून सांगण्यास कशाप्रकारे मदत मिळाली याविषयी विचारा. लोकांना सांत्वन देण्यास आणि त्यांना अस्वस्थ करणाऱ्‍या प्रश्‍नांची बायबलमधून उत्तरे मिळवण्यास मदत करण्यासंदर्भात कोणते अनुभव आले? दोन संक्षिप्त प्रात्यक्षिकांतून जानेवारी-मार्च सावध राहा! आणि मग फेब्रुवारी १५ चे टेहळणी बुरूज कसे सादर करावे हे दाखवा.

गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.

फेब्रुवारी १८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र.  २८ (२२४)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.

१० मि:“काही रक्कम बाजूला काढून ठेवावी.” श्रोत्यांसोबत चर्चा. जागतिक कार्याला हातभार लावण्यासंबंधी मंडळीने दाखवलेल्या उदारतेबद्दल त्यांची प्रशंसा करा.

२५ मि: “देवाचा संदेश पूर्णपणे गाजवावा.”b (परिच्छेद १४-२३) सेवा पर्यवेक्षकांनी हा भाग हाताळावा. स्थानिक मंडळीने मार्च महिन्यात अधिक कार्यासाठी कोणत्या खास योजना आखल्या आहेत याची रूपरेषा द्या. सबंध महिन्यातील क्षेत्र सेवेच्या सभांच्या वेळा सांगा. अक्रियाशील झालेल्यांना पुन्हा क्रियाशील बनवण्यावर आणि मुलांना व बायबल विद्यार्थ्यांना बाप्तिस्मा न झालेले प्रचारक होण्यास पात्र होण्याकरता मदत देण्यावर लक्ष केंद्रित करा. मार्च महिन्यात सहायक पायनियरिंग करण्याकरता अर्ज भरलेल्यांची नावे घोषित करा आणि या सर्वांसोबत पायनियर सेवा करण्याविषयी इतरांना प्रार्थनापूर्वक विचार करण्याचे प्रोत्साहन द्या.

गीत क्र. १६ (१४३) आणि समाप्तीची प्रार्थना.

फेब्रुवारी २५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र.  २३ (२००)

१५ मि: स्थानीय घोषणा. जानेवारी-मार्च सावध राहा! आणि टेहळणी बुरूज मार्च १ अंकांचा उपयोग करून दोन संक्षिप्त नियतकालिक सादरतांची प्रात्यक्षिके दाखवा. यांपैकी एक प्रात्यक्षिक तरुण सदस्याकडून करून घ्या. प्रचारकांना फेब्रुवारीचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या.

१५ मि: “साक्ष देणाऱ्‍या व्हिडिओंमुळे पडणारी छाप.” श्रोत्यांसोबत चर्चा. आतापर्यंत आपण सेवा सभेच्या कार्यक्रमांत आठ व्हिडिओंची चर्चा केली आहे. लेखातील अनुभवांची उदाहरणे देऊन प्रचारकांना हे व्हिडिओ इतरांना दाखवण्यात कितपत यश आले याविषयी काही सांगण्याचे आमंत्रण द्या.

१५ मि: “नोहा—तो देवासमागमे चालला सर्वांकरता उद्‌बोधक.” थेट या व्हिडिओविषयी श्रोत्यांशी चर्चा सुरू करा. केवळ या पृष्ठावरील पेटीत दिलेल्या प्रश्‍नांचा उपयोग करावा. एप्रिल महिन्यात, तरुण लोक विचारतात—मला खरे मित्र कसे बनवता येतील? (इंग्रजी) या व्हिडिओची उजळणी करणार आहोत.

गीत क्र. २२ (१२४) आणि समाप्तीची प्रार्थना.

मार्च ४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १ (१३)

५ मि: स्थानीय घोषणा.

१२ मि: “पृथ्वीवरील सर्वात आनंदी लोक.”c टेहळणी बुरूज ऑक्टोबर १५, १९९७ अंकातील पृष्ठ ६ वरील “सौख्य मिळवण्याच्या योजना” यांतील मुद्द्‌यांचाही समावेश करा.

१२ मि: ज्ञान पुस्तकाचा बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी उपयोग करा. मार्च महिन्यात आपण गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करू. आमची राज्य सेवा यातील ऑगस्ट १९९८ अंकात पृष्ठ ४ वरील ८ व्या परिच्छेदातील अनुभव थोडक्यात सांगा. अलीकडे कोणी ज्ञान पुस्तकाच्या साहाय्याने बायबल अभ्यास सुरू केला असल्यास, अभ्यास कसा सुरू केला हे प्रात्यक्षिक रूपात दाखवा. आमची राज्य सेवा जानेवारी २००२ अंकातील पुरवणीत दिलेल्या “ज्ञान पुस्तकासाठी सुचवलेल्या सादरता” याचा उपयोग करण्याची सर्वांना आठवण करून द्या. पुस्तकाचा उपयोग करून याच पुरवणीतील पृष्ठ  ६ वर “थेट पद्धत” या शीर्षकाखाली दिलेल्या एखाद्या सूचनेचा उपयोग करून एक प्रात्यक्षिक दाखवा.

१६ मि: “प्रचार का करत राहावा?”d चर्चेच्या शेवटी अनेक वर्षांपासून प्रचार कार्यात टिकून राहिलेल्या एक किंवा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या. त्यांनी या कार्यात का सातत्याने सहभाग घेतला आणि यामुळे त्यांना कोणता फायदा झाला याविषयी त्यांना आपल्या भावना व्यक्‍त करण्यास सांगा.

गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा