साक्ष देणाऱ्या व्हिडिओंमुळे पडणारी छाप
१ “आमच्या मुलाला चालताही येत नव्हते तेव्हापासून तो ही व्हिडिओ फिल्म पाहत आहे. तो ती पुन्हा पुन्हा पाहतो. मुलांच्या मनांत यहोवाबद्दल प्रेम जागृत करणारी अशी साधने आपल्याला उपलब्ध आहेत याचा आम्हाला खरोखर आनंद वाटतो!” या ख्रिस्ती पालकाचा रोख कोणत्या व्हिडिओकडे होता? नोहा—तो देवासमागमे चालला (इंग्रजी) या व्हिडिओकडे. साक्षीदारांपैकी नसलेल्या एका स्त्रीच्या मुलाने हाच व्हिडिओ दुसऱ्या कोणाच्या घरी पाहिला होता. या स्त्रीने संस्थेच्या शाखा दफ्तराला ४,००० रूपयांपेक्षा अधिक रक्कम देणगी म्हणून पाठवली आणि मुलांसाठी अशाप्रकारचे इतर व्हिडिओ आहेत का असे विचारले. यहोवाच्या संस्थेने निर्माण केलेल्या व्हिडिओंचा तरुण व वृद्धांवर उत्तम प्रभाव पडत आहे.
२ कुटुंबात: एका साक्षीदार कुटुंबाने यहोवाचे साक्षीदार नात्झी छळातही खंबीर (इंग्रजी) हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, आईने असे म्हटले: “यहोवाने अगदी सर्वसामान्य लोकांना किती असामान्य गोष्टी सहन करण्याची ताकद दिली याविषयी मी दिवसभर विचार करत होते. आणि यामुळे, माझ्या स्वतःच्या समस्या किती क्षुल्लक आहेत याची मला जाणीव झाली. आम्ही मुलांसोबत हा व्हिडिओ पाहिल्यामुळे त्यांनाही यहोवावर पूर्णपणे विसंबून राहणे किती आवश्यक आहे हे स्पष्टपणे समजले आहे. नंतर चर्चा करताना आम्ही आमच्या मुलींना कोणत्याही प्रकारचे दबाव किंवा छळ आला तरीसुद्धा त्याला तोंड देण्याकरता सज्ज राहण्यास मदत केली.”
३ शाळेत: शाळेत एक रिपोर्ट तयार करण्यास सांगण्यात आले तेव्हा एका किशोरवयीन साक्षीदार मुलाला खंबीर व्हिडिओचा काही भाग आपल्या वर्गाला दाखवण्याची संधी मिळाली. त्याच्या शिक्षिकेने कबूल केले की सुरवातीला तिला साक्षीदारांविषयी मनात राग होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिने म्हटले: “यहोवाच्या साक्षीदारांविषयी माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. पुढच्या वेळी ते माझ्याकडे येतील तेव्हा मी अवश्य त्यांचे ऐकून घेईन आणि त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास सुरू करेन!” आपल्याविषयी तिच्या दृष्टिकोनात कशामुळे असा बदल झाला? ती म्हणते की आपले “खरे प्रेम आणि निष्ठा” पाहून हा बदल झाला.
४ सेवाकार्यात: एका बहिणीला एक स्त्री भेटली, जिने साहित्य घेतले नाही पण आपल्याविषयी आणि आपल्या विश्वासांविषयी तिला काही शंका होत्या. बहिणीने दुसऱ्यांदा तिच्याकडे जाताना यहोवाचे साक्षीदार—नावामागील संघटना (इंग्रजी) हा व्हिडिओ नेला आणि त्या स्त्रीला व तिच्या पतीला तो दाखवला. दोघेही खूपच प्रभावित झाले आणि त्यांनी बायबलचा अभ्यास करण्याची इच्छा दाखवली. त्यांना देण्यात आलेल्या उत्तम साक्षीमुळे ते देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्या जीवनात बदल करण्यास प्रवृत्त झाले.
५ तुम्ही या व्हिडिओंचा पुरेपूर उपयोग करत आहात का?