वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०२ पृ. १
  • पृथ्वीवरील सर्वात आनंदी लोक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पृथ्वीवरील सर्वात आनंदी लोक
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • आनंदी देवाची सेवा करणारे आनंदी असतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • खरा आनंद कसा मिळवता येईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • यहोवाची सेवा करण्यामधील खरा आनंद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • सुखी होणे शेवटी कशावर अवलंबून आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km २/०२ पृ. १

पृथ्वीवरील सर्वात आनंदी लोक

१ “ज्या लोकांचा देव परमेश्‍वर आहे ते धन्य [“आनंदी,” इजी-टू-रीड व्हर्शन]!” (स्तो. १४४:१५) त्याअर्थी, यहोवाचे साक्षीदार पृथ्वीवरील सर्वात आनंदी लोक आहेत. एकच खरा आणि जिवंत परमेश्‍वर यहोवा याची सेवा करण्यापरी दुसरा आनंद नाही. तो स्वतः “आनंदी देव” असल्यामुळे जे त्याची उपासना करतात ते देखील आपोआपच तो आनंद प्रदर्शित करतात. (१ तीम. १:११, NW) आपल्या उपासनेचे कोणते पैलू आपल्या आनंदात भर पाडतात?

२ आनंदी असण्याची कारणे: ‘आध्यात्मिक गरजांप्रती जागरूक’ राहणारा मनुष्य आनंदी असतो असे येशूने आपल्याला आश्‍वासन दिले. (मत्त. ५:३, NW) बायबलचा सतत अभ्यास केल्यामुळे आणि सर्व ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिल्यामुळे आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण होतात. देवाच्या वचनातील सत्य शिकल्यामुळे आपण खोट्या धार्मिक शिकवणुकींपासून आणि चुकीच्या चालीरितींपासून मुक्‍त झालो आहोत. (योहा. ८:३२) त्याचप्रकारे बायबलने आपल्याला जीवनाचा सर्वोत्तम मार्ग शिकवला आहे. (यश. ४८:१७) यामुळे आपण आपल्या आनंदी बंधूसमाजात ख्रिस्ती बंधूभगिनींच्या उभारणीकारक सहवासाचा उपभोग घेतो.—१ थेस्सलनी. २:१९, २०; १ पेत्र २:१७.

३ देवाच्या उदात्त नैतिक आदर्शांचे पालन केल्यामुळेही आपल्याला असाधारण समाधान प्राप्त होते कारण हे आपल्या संरक्षणासाठी आहे आणि यामुळे यहोवाला आनंद होतो याची आपल्याला जाणीव आहे. (नीति. २७:११) एका वर्तमानपत्राच्या वार्ताहराने असे म्हटले: “यहोवाच्या साक्षीदारांत अतिशय कडक नियम असूनही ते लोक असमाधानी दिसत नाहीत. उलट, त्यांच्यातील तरुण आणि वयस्क सहसा फारच आनंदी आणि सुसंतुलित वाटतात.” आपल्या या आनंदी जीवनात आपण इतरांनाही कशाप्रकारे सामील करू शकतो?

४ इतरांनाही आनंदी होण्यास मदत करणे: हे जग दुःखाने भरले आहे आणि लोकांना भविष्याविषयी काहीच आशा नाही. पण आपण एका उज्ज्वल भविष्याची आस धरून आहोत कारण सर्व प्रकारचे दुःख कायमचे नाहीसे होईल असा दिवस लवकरच येत आहे हे आपल्याला माहीत आहे. (प्रकटी. २१:३, ४) म्हणूनच आपण सेवाकार्यात उत्साहाने सहभाग घेतो, जेणेकरून आपल्याला प्रामाणिक हृदयाच्या लोकांना भेटून त्यांना आपल्या आशेसंबंधी आणि यहोवा देवासंबंधीच्या आपल्या विश्‍वासांविषयी सांगता येईल.—यहे. ९:४.

५ एका पायनियर बहिणीने म्हटले: “यहोवाविषयी व त्याच्या सत्याविषयी जाणून घेण्यास लोकांना मदत करण्यासारखे समाधान आणखी कशातच नाही.” तेव्हा, अधिकाधिक लोकांना बायबल अभ्यास करण्याचे प्रोत्साहन देण्याचा आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करू या. यहोवाची सेवा करण्याद्वारे आणि त्याची सेवा करण्याकरता इतरांना मदत करण्यासाठी आपली शक्‍ती खर्च केल्यामुळेच आपल्याला सर्वाधिक आनंद मिळू शकतो.—प्रे. कृत्ये २०:३५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा