वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०२ पृ. ८
  • नवीन विभागीय संमेलनाचा कार्यक्रम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नवीन विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचे भय मानणारे हृदय उत्पन्‍न करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यहोवाचे भय बाळगण्यात आनंद मिळवण्याचे शिकणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • देव-भिरू लोकांबरोबर एकत्रित होणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मानवाचे नव्हे तर देवाचे भय का धरावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km १/०२ पृ. ८

नवीन विभागीय संमेलनाचा कार्यक्रम

भयाची एक व्याख्या, “खासकरून देवाबद्दल, मनस्वी श्रद्धेची आणि विस्मयाची भावना” अशी आहे. हे सुदृढ भय असून शास्त्रवचनांत या भयाला “बुद्धीचा प्रारंभ” म्हटले आहे. (स्तो. १११:१०) दुसरीकडे पाहता, सैतानाच्या या जगात एका वेगळ्या प्रकारच्या भयाचे राज्य आहे. यहोवाबद्दल श्रद्धापूर्ण भय विकसित करत असताना आपण या जगात दिसणारे विकृत भय कसे टाळू शकतो? २००२ सेवा वर्षातील नवीन विभागीय संमेलन कार्यक्रमात या प्रश्‍नावर चर्चा केली जाईल. संमेलनाचा विषय आहे, “देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा.” (प्रक. १४:७) वैयक्‍तिकरित्या व एक संघटना या नात्याने यहोवाची भीती बाळगल्यामुळे आपल्याला कोणत्या निरनिराळ्या मार्गांनी फायदा होतो हे आपल्याला या कार्यक्रमातून समजून येईल.

भीती म्हटल्याबरोबर आपल्याला अस्वस्थतेची भावना किंवा धैर्य नसल्याची स्थिती लक्षात येते, पण बायबल म्हणते: “जो पुरुष परमेश्‍वराचे भय धरितो . . . तो धन्य!” (स्तो. १२८:१) खऱ्‍या उपासनेत सामील असलेली आव्हाने आपल्याला यशस्वीरित्या कशी पेलता येतील हे या संमेलन कार्यक्रमातून आपल्याला दिसून येईल. तसेच आपण हे देखील पाहू की देवाचे सुदृढ भय विकसित करण्यासाठी आपण नवीन लोकांना कशी मदत करू शकतो जेणेकरून त्यांनाही पूर्ण मनाने, जिवाने, बुद्धीने व शक्‍तीने त्याची सेवा करण्याची प्रेरणा मिळेल. (मार्क १२:३०) पहिल्या दिवसाच्या शेवटी “आपल्या प्रिय जनांच्या अधिकाधिक समीप या” या विषयावर प्रांतीय पर्यवेक्षकांचे भाषण होईल. यहोवापासून, आपल्या कुटुंबियांपासून आणि आपल्या ख्रिस्ती बांधवांपासून आपल्याला दुरावण्याचा दियाबल कशाप्रकारे प्रयत्न करतो आणि यासंदर्भात आपण कशाप्रकारे सावध राहू शकतो हे या भाषणात समजवले जाईल.

दुसऱ्‍या दिवशी होणाऱ्‍या चार भागांच्या एका परिचर्चेचा विषय “यहोवाची भीती बाळगा मनुष्याची नव्हे” असा असेल. आपल्याला आपली सेवा पूर्ण करण्यापासून किंवा शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी आपला विश्‍वासूपणा व चांगला विवेक राखण्यापासून परावृत्त करणारे कोणतेही भय आपण का घालवले पाहिजे आणि हे कसे करता येईल हे या परिचर्चेत स्पष्ट केले जाईल. “देवाची भीती बाळगा व त्याच्या आज्ञा पाळा” असे शीर्षक असलेले जाहीर भाषण प्रकटीकरण १४ व्या अध्यायातील एकापाठोपाठ एक होणाऱ्‍या घटनांवर आधारित असेल. “यहोवाची भीती बाळगून चालत राहा” या विषयावरील प्रोत्साहनदायक मार्गदर्शनाने विभागीय संमेलनाचा समारोप करण्यात येईल.

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला, आदर्श सेवा सभा, बाप्तिस्म्याचे भाषण आणि टेहळणी बुरूज लेखाचा सारांश हे कार्यक्रमातील इतर ठळक भाग आहेत जे तुम्ही चुकवू नयेत. तुमच्यासोबत बायबल अभ्यास करणाऱ्‍यांनाही उपस्थित राहण्याचे आमंत्रण द्या. ज्यांना बाप्तिस्मा घेण्याची इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर अध्यक्षीय पर्यवेक्षकांना सांगावे. आपण सर्वजण या विशेष कार्यक्रमातील कोणताही भाग न चुकवण्याद्वारे यहोवा देवाबद्दल असलेले सुदृढ भय दाखवू शकतो व त्याचे गौरव करू शकतो!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा