वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०१ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००१
  • उपशिर्षक
  • डिसेंबर १० ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर १७ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर २४ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर ३१ ने सुरू होणारा सप्ताह
  • जानेवारी ७ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००१
km १२/०१ पृ. २

सेवा सभा आराखडा

डिसेंबर १० ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २८ (२२४)

१३ मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. सर्वांना टू दी एन्ड्‌स ऑफ दी अर्थ हा व्हिडिओ पाहण्याचे प्रोत्साहन द्या म्हणजे डिसेंबर २४ च्या सप्ताहात होणाऱ्‍या सेवा सभेतील चर्चेची त्यांना तयारी करता येईल. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून (१) नियतकालिके स्वीकारणाऱ्‍या व्यक्‍तीला ऑक्टोबर-डिसेंबर सावध राहा! आणि (२) डिसेंबर १५ चा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करावा याची प्रात्यक्षिके दाखवा.

१२ मि: वडिलांना मान द्या कारण ते यास पात्र आहेत. दोन किंवा तीन सेवा सेवक जून १, १९९९ टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठे १८-१९ ची चर्चा करतात. वडिलांना त्यांची नोकरी, कौटुंबिक जबाबदाऱ्‍या आणि ईश्‍वरशासित नेमणुका यांसारखी कितीतरी कामे बघावी लागतात याविषयी ते उल्लेख करतात. सर्वजण कोणकोणत्या मार्गांनी वडिलांना प्रोत्साहन देऊ शकतात, त्यांचे ओझे काहीसे हलके करू शकतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करू शकतात हे विचारात घ्या. सेवा सेवक कबूल करतात की खरोखर वडील अतिशय मोलवान सेवा करत आहेत आणि यामुळे आपण “त्यांना . . . अत्यंत मान द्यावा.”—१ थेस्सलनी. ५:१२, १३.

२० मि: “यहोवाच्या प्रीतीबद्दल कृतज्ञता दाखवल्याने मिळणारे आशीर्वाद—भाग २.”a परिच्छेद २-६ वर चर्चा करताना, अलीकडील संकटामुळे दुःखी किंवा चिंतित झालेल्यांना कशाप्रकारे सांत्वना व आशा दिली याविषयीचे प्रोत्साहनदायक अनुभव सांगण्याचे निमंत्रण द्या. यांपैकी एक किंवा दोन अनुभव आधीच सराव करून प्रात्यक्षिकाच्या रूपात दाखवा.

गीत क्र. २९ (२२२) आणि समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर १७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २२ (१३०)

८ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. डिसेंबर २५ व जानेवारी १ रोजी सेवा कार्याकरता केलेल्या खास व्यवस्थेविषयी माहिती द्या.

२० मि: “देवाचे वचन नीट हाताळा.”b ४ थ्या परिच्छेदातील सादरता एका वास्तविक प्रात्यक्षिकाच्या रूपात दाखवा. तसेच, सध्याच्या जागतिक घडामोडींमुळे दुःखी झालेल्यांना प्रोत्साहन किंवा सांत्वन देण्याकरता स्थानिकरित्या उपयोगी ठरलेली एखादी सादरता प्रात्यक्षिक रूपात दाखवावी. एखादा अनुभव देखील थोडक्यात सांगता येईल. बायबलचा उपयोग करून दिलेली साक्ष अधिक परिणामकारक का होईल याविषयी आपले मत व्यक्‍त करण्यास श्रोत्यांना विनंती करा.

१७ मि: “बायबलचे कोणते भाषांतर वापरावे?” भाषण व श्रोत्यांशी चर्चा. स्थानिक क्षेत्रात बोलल्या जाणाऱ्‍या भाषांतील संपूर्ण बायबलचा वापर करण्याच्या महत्त्वावर जोर द्या.

गीत क्र. ९ (३७) आणि समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर २४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २९ (२२२)

१० मि: स्थानीय घोषणा. जानेवारीची साहित्य सादरता कोणती व मंडळीजवळ कोणती पुस्तके आहेत हे सांगा. पृष्ठ ८ वरील सुचनांचा उपयोग करून नियतकालिके सादर करण्याची दोन प्रात्यक्षिके दाखवा; ऑक्टोबर-डिसेंबर सावध राहा! अंकाचे एक व दुसरे जानेवारी १, टेहळणी बुरूज अंकाचे दाखवा. यांपैकी एक प्रात्यक्षिक तरुण प्रचारकाकडून करून घ्या.

१० मि: “सन २००२ करता ईश्‍वरशासित सेवा प्रशाला.” प्रशाला पर्यवेक्षकांचे भाषण. सर्वांना आपापले भाग सादर करण्यासाठी परिश्रमाने प्रयत्न करण्याचे प्रोत्साहन द्या.

२५ मि: “पृथ्वीच्या दिगंतापर्यंत—साक्ष देणे.” श्रोत्यांसोबत चर्चा. आपल्या राहत्या ठिकाणी किंवा जेथे अधिक गरज आहे अशा ठिकाणी लोकांपर्यंत सुवार्ता पोचवण्याकरता आपल्याला अधिक काय करता येईल याविषयी गांभिर्याने विचार करण्याचे सर्वांना प्रोत्साहन द्या. आमची राज्य सेवा जुलै २००१ अंकातील पृष्ठ ८ वरील माहितीचा उपयोग करा. फेब्रुवारीत आपण नोहा—तो देवाबरोबर चालला (इंग्रजी) या व्हिडिओवर चर्चा करणार आहोत.

गीत क्र. १३ (१२४) आणि समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर ३१ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २ (१५)

१० मि: स्थानीय घोषणा. सर्व प्रचारकांना डिसेंबर महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. नवीन वर्षात तुमच्या मंडळीच्या सभांच्या वेळात बदल होणार असल्यास सर्वांना नवीन वेळेप्रमाणे नियमित उपस्थित राहण्याचे प्रोत्साहन द्या. सर्व आस्थेवाईक लोकांना आणि अक्रियाशील झालेल्या प्रचारकांनाही वेळेत झालेल्या बदलाची माहिती देण्याची खात्री करा.

३५ मि: “‘देवाच्या वचनाचे शिक्षक’ प्रांतीय अधिवेशनात शिकलेल्या गोष्टींचे तुम्ही पालन करत आहात का?” अधिवेशनाच्या कार्यक्रमावर श्रोत्यांसोबत चर्चा. हा भाग टेहळणी बुरूज अभ्यास घेणाऱ्‍याने हाताळावा. एका मिनिटाची प्रस्तावना दिल्यानंतर प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाच्या चर्चेसाठी १०-१२ मिनिटे द्या. प्रत्येक उपशीर्षकाखालील मुख्य मुद्द्‌यांचा उल्लेख केल्यावर, श्रोत्यांना विचारा की (१) मिळालेल्या मार्गदर्शनाचे पालन करण्याचा त्यांनी कशाप्रकारे प्रयत्न केला, (२) असे केल्यामुळे त्यांना कोणता फायदा झाला आणि (३) आणखी काय करता येईल असे त्यांना वाटते. विचारप्रवर्तक प्रश्‍न विचारून उत्साही चर्चा करा. शिकलेल्या गोष्टींचे पालन करणे किती गरजेचे आहे हे समजून घेण्यास सर्वांना साहाय्य करा.

गीत क्र. १८ (१६२) आणि समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी ७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ८ (५३)

१० मि: स्थानीय घोषणा.

२० मि: आपल्या जीवनाचा चांगला उपयोग करा. एक कुटुंब टेहळणी बुरूज ऑगस्ट १५, १९९८ अंकातील पृष्ठे ८-९ वर चर्चा करतात. निराशेऐवजी आनंद मिळेल अशाप्रकारचे आचरण कुटुंबाने करावे अशी इच्छा पिता व्यक्‍त करतो. जीवनात आनंद मिळण्याची खात्री कशी करता येईल, चांगल्यावाईटाची पारख करण्याची गरज, कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे आणि यहोवावर भरवसा ठेवणे याविषयी लेखात दिलेल्या शास्त्रवचनीय मार्गदर्शनाची सर्व मिळून उजळणी करतात. कुटुंब या नात्याने कोणते फेरबदल केले पाहिजेत हे ते ठरवतात.

१५ मि: आपल्या राज्य सभागृहावर एक नजर. वडिलांचे भाषण. राज्य सभागृहाच्या स्थितीकडे लक्ष वेधा. तो नेहमी स्वच्छ, नीटनेटका आणि आकर्षक असतो का? बसण्याची व्यवस्था, माईक इत्यादी, आणि हवा खेळती ठेवण्याकरता केलेली व्यवस्था सुस्थितीत असून सभांचा आरामात बसून आनंद लुटणे सर्वांना शक्य होते का? प्रसाधनगृहे स्वच्छ आहेत का? इमारतीच्या आतील व बाहेरील भिंती सुस्थितीत ठेवण्यात आल्या आहेत का? सभागृहाच्या अवतीभवतीच्या परिसराविषयी काय? राज्य सभागृहाच्या नियमित स्वच्छतेकरता बनवण्यात आलेल्या आराखड्याचे पालन केले जात आहे का? लक्ष देण्याजोग्या किंवा सुधारणा करण्याजोग्या गोष्टींविषयी सूचना द्या. स्मारक विधीच्या आधी सभागृहाची पूर्ण स्वच्छता करण्यासाठी काय योजना आखल्या आहेत? त्याआधी कोणती दुरुस्तीची कामे करावी लागतील? मंडळी याबाबतीत कशाप्रकारे मदत करू शकते हे स्पष्ट करा. यहोवाचे मंदिर एक सुंदर, व आदरणीय स्थान होते असे आपण मानतो, त्याचप्रकारे आपल्या उपासनेचे स्थानही सुंदर व आदरणीय असणे किती आवश्‍यक आहे यावर जोर द्या.—स्तो. ८४:१.

गीत क्र. ३ (३२) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा