वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०१ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००१
  • उपशिर्षक
  • एप्रिल ९ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल १६ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल २३ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल ३० ने सुरू होणारा सप्ताह
  • मे ७ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००१
km ४/०१ पृ. २

सेवा सभा आराखडा

एप्रिल ९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २० (९३)

१५ मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यांतून निवडक घोषणा. मंडळीच्या स्मारक विधीच्या उपस्थितीची घोषणा करा. स्मारकविधीला पहिल्यांदाच उपस्थित राहिलेल्यांनी काढलेल्या प्रशंसोद्‌गारांचे अनुभव सांगा. एप्रिल २३ च्या आठवड्यात होणाऱ्‍या सेवा सभेतील द बायबल—इट्‌स पावर इन युअर लाईफ या भागावर होणाऱ्‍या चर्चेच्या तयारी निमित्ताने सर्वांना तो व्हिडिओ आधीच पाहून यायला उत्तेजन द्या.

१० मि: स्थानिक गरजा.

२० मि: “सेवेत ‘गढून’ जा.”a परिच्छेद ३-५ मध्ये दिलेल्या सूचनांचा इतरांना मदत करण्यासाठी अवलंब केल्यामुळे कोणते चांगले अनुभव आले हे सांगण्यासाठी दोन किंवा तीन प्रचारकांना सांगा.

गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल १६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १३ (१२४)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. एप्रिल महिन्याचे फक्‍त दोन सप्ताहांत उरले असल्यामुळे महिना संपण्याआधी सेवेमध्ये भाग घेण्यास सर्वांना उत्तेजन द्या.

१५ मि: “‘देवाच्या वचनाचे शिक्षक’, २००१ यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन.”b मंडळीचे सचिव हा लेख संचालित करतील. प्रथम, संस्थेकडून आलेले मार्च १५, २००१ चे अधिवेशन नेमणूक पत्र वाचावे. त्यातील सर्व वचनांचा उपयोग करून हे दाखवावे, की आपण सर्वांनी संस्थेच्या निदर्शनांचे बारकाईने पालन का केले पाहिजे. अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी उपस्थित राहता यावे म्हणून नोकरी करणाऱ्‍यांनी शक्य तितक्या लवकर सुटीची व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे यावर जोर द्या. संस्थेच्या योजनांना सहकार्य दिल्याबद्दल सर्वांची प्रशंसा करा.

२० मि: “सुटसुटीत सादरता सर्वोत्तम सादरता.”c जुलै १९९९ च्या आमची राज्य सेवेच्या पृष्ठ ४ वरील “मुद्द्‌याचं बोलूया!” या लेखातील मुद्दे समाविष्ट करा. सुटसुटीत सादरतेची एक किंवा दोन संक्षिप्त प्रदर्शने दाखवा.

गीत क्र. ११ (८५) आणि समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल २३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २३ (२००)

५ मि: स्थानीय घोषणा.

१५ मि: “भविष्याची योजना करणे—पण कशासाठी?” भाषण. नोव्हेंबर १, २००० च्या टेहळणी बुरूज पृष्ठे १८-२१ वरील उचित मुद्द्‌यांचाही भाषणादरम्यान उल्लेख करा.

२५ मि: “द बायबल—इट्‌स पावर इन युअर लाईफ या व्हिडिओबद्दलचे तुमचे मत.” श्रोत्यांबरोबर चर्चा. १९९७ वार्षिक पुस्तक, पृष्ठ ५४ परिच्छेद १ वर दिलेल्या अनुभवात, संस्थेच्या व्हिडिओंचा चांगला उपयोग करण्याविषयी दिलेल्या सूचनेचा आपणही अवलंब का करू नये? जूनमध्ये आपण जेहोवाज विटनेसेस स्टॅण्ड फर्म अगेन्स्ट नात्सी असॉल्ट या व्हिडिओची उजळणी करणार आहोत.

गीत क्र. १ (१३) आणि समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल ३० ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २२ (१३०)

१० मि: स्थानीय घोषणा. सर्वांना एप्रिल महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. पुस्तक अभ्यास गटातील सर्वांनी त्यांचा सेवा अहवाल दिला आहे की नाही याची पुस्तक अभ्यास संचालकांनी खात्री करावी जेणेकरून सर्व अहवाल मे ६ पर्यंत संकलित करता येतील.

१५ मि: “चांगले शेजारी बनून साक्ष द्या.”d कोणकोणत्या मार्गांनी आपण आपल्या आचरणाद्वारे साक्ष देऊ शकतो ते सांगा.—नोव्हेंबर १, १९९७ टेहळणी बुरूज पृष्ठ १८, परिच्छेद १६ पाहा.

२० मि: पायनियर इतरांना साहाय्य करत आहेत. भाषण व मुलाखती यांच्याद्वारे सेवा पर्यवेक्षक हा भाग हाताळतील. सप्टेंबर १९९८ ची आमची राज्य सेवा पृष्ठ ८ वरील पायनियर साह्‍य कार्यक्रम याची उजळणी करा. स्थानीयरीत्या कोणकोणत्या उभारणीकारक गोष्टी साध्य करण्यात आल्या ते सांगा. कोणाला तरी साहाय्य केलेल्या पायनियरची आणि ज्याला पायनियरने साहाय्य केले अशा एका प्रचारकाची मुलाखत घ्या. सेवेमध्ये दोघांनी एकत्र मिळून कार्य केल्याने त्यांना कोणते फायदे मिळाले ते दाखवा. येणाऱ्‍या महिन्यांमध्ये या तरतुदीचा फायदा करून घेण्यास इतरांना आमंत्रण द्या.

गीत क्र. ९ (३७) आणि समाप्तीची प्रार्थना.

मे ७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ६ (४५)

१० मि: स्थानीय घोषणा.

१५ मि: “देवाला तर सर्व शक्य आहे.”e प्रोक्लेमर्स पुस्तकाच्या पृष्ठ ४४३ वर जे म्हटले आहे त्यावर संक्षिप्त विवेचन द्या. १९३५ मध्ये किती प्रमाणात प्रचार कार्य केले गेले याची तुलना चालू इयरबुक मधील सेवा अहवालांशी करा आणि फरक दाखवा. ही प्रचंड वृद्धी एकेकाळी कशी अशक्य वाटत होती याकडे श्रोत्यांचे लक्ष वेधा.

२० मि: आपले कुटुंब पवित्र आचरण कसे प्रदर्शित करू शकते? वडील आणि त्यांचे कुटुंब ऑगस्ट १, १९९६ चे टेहळणी बुरूज, पृष्ठे १७-२० वरील माहितीची चर्चा करतात. घरी, नातेवाईकांमध्ये असताना, मंडळीत, शेजारीपाजारी, शाळेत व नोकरीच्या ठिकाणी पवित्र आचरण कसे ठेवता येईल त्या मार्गांची उजळणी करा.

गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीप]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवा आणि प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवा आणि प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवा आणि प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवा आणि प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवा आणि प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा