वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/१० पृ. ५
  • ‘राज्याची ही सुवार्ता गाजवली जाईल!’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘राज्याची ही सुवार्ता गाजवली जाईल!’
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • मिळती जुळती माहिती
  • आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • आमचे सेवकपण खंड पडू न देता पुढे चालू ठेवणे
    आमची राज्य सेवा—१९९०
  • “जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • गिदोन मिद्यानी लोकांना हरवतो
    बायबलमधून शिकू या!
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१०
km ५/१० पृ. ५

‘राज्याची ही सुवार्ता गाजवली जाईल!’

१. प्रचार कार्य कोणीही रोखू शकत नाही हे आपल्याला कसे माहीत आहे?

१ यहोवाला आपली इच्छा पूर्ण करण्यापासून कोणतीही गोष्ट थांबवू शकत नाही. (यश. १४:२४) गिदोन शास्त्याला व त्याच्यासोबतच्या ३०० लोकांना, १,३५,००० मिद्यानी सैनिकांसोबत लढणे अशक्य वाटत होते. पण, यहोवाने त्याला सांगितले: ‘तू . . . जाऊन इस्राएलाला मिद्यानाच्या हातून सोडवशील; मी तुला पाठविले आहे ना?’ (शास्ते ६:१४) आज यहोवाचा कोणत्या कार्याला पाठिंबा आहे? येशूने म्हटले: “राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल.” (मत्त. २४:१४) कोणीही हे कार्य पूर्ण होण्यापासून रोखू शकत नाही!

२. सेवेत यहोवा आपल्याला वैयक्‍तिक रीत्या मदत करेल अशी अपेक्षा आपण का करू शकतो?

२ यहोवा आपल्याला वैयक्‍तिक रीत्या मदत करतो: यहोवा त्याच्या साक्षीदारांना गट या नात्याने यशस्वी होण्यास मदत करतो हा आपल्याला भरवसा आहे पण, वैयक्‍तिक रीत्या आपण त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करू शकतो का? प्रेषित पौलाला गरजेच्या वेळी यहोवाने आपला पुत्र येशू याच्याद्वारे मदत पुरवल्याचे जाणवले होते. (२ तीम. ४:१७) यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण वैयक्‍तिक रीत्या जे काही प्रयत्न करतो त्यावर त्याचा आशीर्वाद असेल असा भरवसा आपण बाळगू शकतो.—१ योहा. ५:१४.

३. यहोवा कोणकोणत्या परिस्थितीत आपली मदत करतो?

३ जीवनाच्या दैनंदिन कामांमुळे सेवाकार्य करण्यासाठी तुमच्यात काही त्राणच उरत नाही का? बायबल सांगते की यहोवा “भागलेल्यांस जोर देतो.” (यश. ४०:२९-३१) तुम्हाला छळाचा किंवा विरोधाचा सामना करावा लागत आहे का? स्तोत्रकर्त्याद्वारे यहोवा आपल्याला असे उत्तेजन देतो: “तू आपला भार परमेश्‍वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल.” (स्तो. ५५:२२) काही वेळा तुमच्यातला आत्मविश्‍वास कमी झाल्याचे तुम्हाला जाणवते का? यहोवा आपल्याला आश्‍वासन देतो: “जा, मी तुझ्या मुखास साहाय्य होईन.” (निर्ग. ४:११, १२) तुमच्या आजारपणामुळे सेवेतील तुमचा सहभाग कमी झाला आहे का? तुमचे मनापासूनचे प्रयत्न, मग ते थोडे असले तरी, यहोवा त्यांची कदर करतो व त्यांचा उपयोग करून घेऊ शकतो.—१ करिंथ. ३:६, ९.

४. यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे आपल्यावर काय परिणाम होईल?

४ यहोवाने मदतीसाठी ‘त्याचा हात लांबवला आहे, तो कोण मागे फिरवेल?’ (यश. १४:२७, पं.र.भा.) आपल्या सेवेवर यहोवाचा आशीर्वाद आहे असा भरवसा आपल्याला मिळाला असल्यामुळे आपण सावधगिरीने व “निर्भीडपणे” त्याच्याविषयी प्रचार करत राहू या.—प्रे. कृत्ये १४:३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा