वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०१ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००१
  • उपशिर्षक
  • फेब्रुवारी १२ ने सुरू होणारा सप्ताह
  • फेब्रुवारी १९ ने सुरू होणारा सप्ताह
  • फेब्रुवारी २६ ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च ५ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००१
km २/०१ पृ. २

सेवा सभा आराखडा

फेब्रुवारी १२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १६ (१४३)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यांतून काही निवडक घोषणा. फेब्रुवारी २६ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील सेवा सभेत बायबल—मानवजातीचे सर्वात जुने आधुनिक पुस्तक (इंग्रजी) या व्हिडिओची चर्चा केली जाणार आहे. आमची राज्य सेवाच्या याच पानावर दिलेल्या प्रश्‍नांच्या आधारावर ही चर्चा असेल.

१५ मि: “आपल्या उत्तम कार्यांनी यहोवाचे गौरव करा.”a उद्‌घोषक (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठ १८७, परिच्छेद २-३ मधील विवेचनांचाही समावेश करा.

२० मि: “इतरांचे मन कसे वळवायचे?” या लेखावर मंडळीचे पुस्तक अभ्यास संचालक आणि एक पायनियर अथवा एक प्रभावशाली प्रचारकामध्ये चर्चा होते. टेहळणी बुरूज मे १५, १९९८, पृष्ठे २१-३ वरील काही निवडक मुद्द्‌यांचा ते चर्चेत समावेश करतात. मासिकाच्या पृष्ठ २३ वरील “तुमच्या विद्यार्थ्याच्या हृदयाचा ठाव घेणे” या चौकानातील माहितीचे देखील परिक्षण करा. स्थानीय क्षेत्रातील एका विशिष्ट खोट्या धार्मिक विश्‍वासाचे उदाहरण देऊन, बायबल या विषयावर काय म्हणते ते घरमालकाला कसे पटवून द्यायचे त्याची चर्चा करा.

गीत क्र. ८ (५३) आणि समाप्तीची प्रार्थना.

फेब्रुवारी १९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २७ (२२१)

८ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.

१५ मि: “यहोवाच्या महत्कृत्यांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.”b यशयाच्या भविष्यवाणीबद्दल आपली कदर वाढवणाऱ्‍या या नवीन पुस्तकातील काही चित्रे दाखवा.

२२ मि: “यहोवाचे नाव आणि त्याची कृत्ये जाहीर करा.”c मार्च आणि एप्रिल महिन्यात जास्तीतजास्त सेवा करण्यासाठी मंडळीने केलेल्या खास योजनांची वडील उजळणी करतात. आणि या दोन महिन्यांदरम्यान होता होईल तितक्या प्रचारकांना साहाय्यक पायनियरींग करायचे उत्तेजन द्या. गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात ज्यांनी पायनियरींग केली आहे अशा काही बंधूभगिनींना, त्यांना मिळालेल्या समाधानाचा अनुभव सांगण्यास सांगा. योग्य असलेल्या सर्व अक्रियाक प्रचारकांना मदत करण्यावर तसेच मुलांना व इतर बायबल विद्यार्थ्यांना बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक होण्यास उत्तेजन देण्यावर आपले लक्ष केंद्रित ठेवा.—नोव्हेंबर २००० च्या आमची राज्य सेवा यातील प्रश्‍न पेटी पाहा.

गीत क्र. ४ (४३) आणि समाप्तीची प्रार्थना.

फेब्रुवारी २६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २२ (१३०)

८ मि: स्थानीय घोषणा. फेब्रुवारीचा प्रचारकार्याचा रिपोर्ट घालण्यास सर्व प्रचारकांना आठवण करून द्या.

१२ मि: ज्ञान पुस्तकासाठी काही सादरता. मार्च महिन्यात ज्ञान पुस्तक देण्यासाठी तुमच्याकडे एखादी सादरता आहे का? आमची राज्य सेवाच्या गेल्या अंकांच्या मागील पृष्ठावर पहिल्या भेटीसाठी आणि पुनर्भेटीसाठी अनेक सादरता दिल्या आहेत. सुचवलेल्या या सादरतांपैकी दोन अथवा तीन सादरतांची उजळणी करा. (मार्च, जून, नोव्हेंबर १९९६; जून १९९७; मार्च १९९८) नोव्हेंबर १९९६ च्या अंकात, बायबल अभ्यास थेटपणे सुरू करण्यासाठी असलेल्या सादरतांची दोन प्रात्यक्षिके दाखवा. नवीन अभ्यास सुरू करण्यास प्रत्येकाला खास प्रयत्न करण्याचे उत्तेजन द्या.

२५ मि: “बायबल—मानवजातीचे सर्वात जुने आधुनिक पुस्तक या व्हिडिओबद्दल कृतज्ञता दाखवणे.” याच पानावरील प्रश्‍नांचा उपयोग करून श्रोत्यांबरोबर चर्चा करा. नवे जग भाषांतराच्या पूर्ण किंवा काही भागाच्या १० कोटी पेक्षा अधिक प्रती ३७ भाषांत छापण्यात आल्या आहेत यावर जोर द्या. एप्रिल महिन्यात आपण या मालिकेतील तिसरा व्हिडिओ ज्याचे शीर्षक आहे, बायबल—तुमच्या जीवनावरील त्याचा शक्‍तिशाली प्रभाव याची उजळणी करणार आहोत.

गीत क्र. ७ (५१) आणि समाप्तीची प्रार्थना.

मार्च ५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २६ (२१२)

५ मि: स्थानीय घोषणा.

१८ मि: “यहोवा सामर्थ्य देतो.”d शास्त्रवचने आपल्या जीवनात कशी लागू होतात ते श्रोत्यांना विचारा.

२२ मि: “यशस्वी टेलिफोन साक्षकार्य.”e सेवा पर्यवेक्षक हा भाग हाताळतील. टेहळणी बुरूज डिसेंबर १५, १९९९ पृष्ठ २३, परिच्छेद १७ मध्ये दिलेल्या उत्तेजनाचा समावेश करा. नोव्हेंबर २००० च्या आमची राज्य सेवा यांतील “आन्सरींग मशीनला तुम्ही काय उत्तर द्याल?” या पेटीतील माहितीची देखील उजळणी करा. टेलिफोन साक्षकार्यासाठी कोणते क्षेत्र तयार करण्यात आले आहेत ते सांगा. तुमच्या मंडळीतील कोणाला या कार्यात यश मिळाले असेल तर त्यांना संक्षिप्त अनुभव सांगण्यास सांगा.

गीत क्र. ५ (४६) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीप]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवा आणि प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवा आणि प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवा आणि प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवा आणि प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवा आणि प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा