वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०१ पृ. १
  • इतरांचे मन कसे वळवायचे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इतरांचे मन कसे वळवायचे?
  • आमची राज्य सेवा—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • मन वळवण्याच्या कलेद्वारे हृदयाचा ठाव घेणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • राज्य संदेशाचा स्वीकार करण्यास इतरांना साहाय्य करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • मन वळवण्याच्या कलेचा उपयोग करून शिकवा
    आमची राज्य सेवा—२०१०
  • आपण प्रत्येक व्यक्‍तीला कसे उत्तर द्यावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००१
km २/०१ पृ. १

इतरांचे मन कसे वळवायचे?

१ लोकांची मने वळवणारा सेवक म्हणून प्रेषित पौलाची ख्याती होती. (प्रे. कृत्ये १९:२६) राजा अग्रीप्पानेही त्याला म्हटले होते की, “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवितोस!” (प्रे. कृत्ये २६:२८) पण कोणत्या कारणामुळे पौल सेवाकार्यात लोकांची मने वळवू शकला? तो शास्त्रवचनांतून लोकांच्या बुद्धीला पटतील असे तर्क करायचा आणि त्यांच्या पार्श्‍वभूमीनुसार चर्चा करायचा.—प्रे. कृत्ये २८:२३.

२ पौलाप्रमाणे आपणही सेवेमध्ये लोकांची मने वळवण्याची कला आत्मसात केली पाहिजे. ती कशी? लोकांबरोबर बोलून व त्यांचे बोलणे ऐकून घेण्याद्वारे आपण त्यांना समजून घेतले पाहिजे. (नीति. १६:२३) तीन गोष्टी आपल्याला असे करण्यास मदत करू शकतात.

३ लक्षपूर्वक ऐका: समोरची व्यक्‍ती बोलत असते तेव्हा तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐका जेणेकरून तुम्हाला असा एखादा समान मुद्दा मिळू शकतो ज्याच्या आधारावर तुम्ही आपली चर्चा पुढे चालू ठेवू शकाल. घरमालक एखादा प्रश्‍न विचारतो तेव्हा, त्या प्रश्‍नामागचा त्याचा तर्क समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला, घरमालकाचा विश्‍वास काय आहे, तो असा विश्‍वास का करतो आणि कोणत्या गोष्टीमुळे त्याचा इतका पक्का विश्‍वास झाला आहे हे समजण्यास तुम्हाला मदत होईल. (नीति. १८:१३) अगदी कुशलतेने तुम्ही त्याच्याकडून हे काढून घेऊ शकता.

४ प्रश्‍न विचारा: एखादा मनुष्य त्रैक्य मानत असेल तर तुम्ही त्याला विचारू शकता: “तुम्ही पहिल्यापासूनच त्रैक्य मानता का?” उत्तर मिळाल्यावर विचारा: “बायबल या विषयावर काय म्हणते त्याचा तुम्ही कसोशीने अभ्यास केला आहे का?” तुम्ही असेही म्हणू शकता: “देव त्रैक्याचा भाग असता तर बायबलमध्ये तसे स्पष्टपणे सांगितले असते असे तुम्हाला वाटत नाही का?” या प्रश्‍नांच्या मिळणाऱ्‍या उत्तरांद्वारे तुम्हाला या विषयावर शास्त्रवचनांतून तर्क करण्यास मदत होऊ शकते.

५ बुद्धीला पटतील असे तर्क करा: येशूच देव आहे असा विश्‍वास करणाऱ्‍या एका स्त्रीला एका साक्षीदाराने विचारले: ‘कुटुंबात दोन व्यक्‍तींचा समान दर्जा आहे हे समजावयाचे असल्यास तुम्ही कुणाचे उदाहरण द्याल?’ ती म्हणाली: “कदाचित दोन भावांचं.” साक्षीदार बांधव म्हणाला: “अगदी बरोबर, कदाचित एकसारखे दिसणाऱ्‍या जुळ्या भावांचं उदाहरण देता येईल. परंतु आपण देवाकडे पिता या नात्याने पाहावं आणि त्याच्याकडे पुत्र या नात्याने पाहावं, असं शिकवताना येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होता?” या दोघांतील एक जण मोठा आहे व त्याच्याजवळ जास्त अधिकार आहे, हा मुद्दा त्या स्त्रीच्या चटकन लक्षात आला. (मत्त. २०:२३; योहा. १४:२८; २०:१७) मन वळवण्याच्या कलेमुळेच हा मुद्दा तिच्या मनापर्यंत, तिच्या हृदयापर्यंत पोहंचला होता.

६ अर्थात, आपली सादरता कितीही अचूक व बुद्धीला पटणारी असली तरीसुद्धा सर्वच जण सत्य स्वीकारतील असे नाही. पण पौलाप्रमाणे आपण आपल्या क्षेत्रातील नम्र अंतःकरणाच्या लोकांना शोधून राज्य संदेशाचा त्यांनी स्वीकार करावा म्हणून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करू या.—प्रे. कृत्ये १९:८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा