बायबल—मानवजातीचे सर्वात जुने आधुनिक पुस्तक या व्हिडिओबद्दल कृतज्ञता दाखवणे
हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही पुढील मुद्द्यांकडे लक्ष दिले असेल. जसे की: (१) कोणत्या वस्तुस्थितींमुळे बायबल हे अतुलनीय ठरते? (२) बायबल हे एक प्राचीन पुस्तक असले तरी आधुनिक विज्ञानाशी जुळते याचे एक उदाहरण द्या. (३) आज आपल्याजवळ जे बायबल आहे ते मूळ लिखाणापासून बदलले नाही याची आपण खात्री कशी बाळगू शकतो? (४) प्राचीन बायबल हस्तलिखितांतील लिखाणाचा एक उल्लेखनीय पैलू कोणता आहे आणि यामुळे तुमचा भरवसा कसा वाढतो? (५) जॉन वेक्लिफ, योहान्स गुटनबर्ग, विल्यम टिंडेल, मेरी जोन्स आणि चार्ल्स टेझ रस्सल यांनी जगभरात देवाच्या वचनाचा प्रसार करण्यासाठी हातभार कसा लावला? (६) चर्चने बायबलचा कडा विरोध कसा केला; पण तरीसुद्धा कोणत्या कारणामुळे ते आजपर्यंत टिकून राहिले? (७) यहोवाच्या संघटनेने बायबलचे किती भाषांमध्ये भाषांतर केले आहे व किती प्रती छापल्या आहेत? (८) जुगारीच्या गर्तेत पूर्णपणे बुडालेल्यांसाठी (१ तीम. ६:९, १०), वैवाहिक समस्या व एकमेकांबरोबर विश्वासू न राहणाऱ्या पतीपत्नींसाठी (१ करिंथ. १३:४, ५; इफिस. ५:२८-३३), भौतिक धनसंपत्ती गोळा करण्याच्या मागे लागलेल्या लोकांसाठी (मत्त. १६:२६) बायबलने व्यावहारिक सल्ला व मदत कशी दिली आहे? (९) शास्त्रवचनांतील तत्त्वांचा अवलंब केल्यावर आपण जगातील राष्ट्रीय, वांशिक आणि जातीय द्वेषावर मात कशी करू शकतो याचे कोणकोणते पुरावे आहेत? (१०) बायबलमधील विषय शिकल्यावर तुम्हाला कोणत्या प्रकारे खूप आनंद मिळाला? (११) या व्हिडिओचा कोणाला फायदा होईल असे तुम्हाला वाटते आणि तो तुम्ही त्यांना कसा सादर करू शकाल?