साहित्य वाटपाची सुलभ योजना
१ विनामूल्य साहित्य वाटप करण्याची सुलभ योजना गेल्या एक वर्षापासून कार्यरत आहे. ही योजना यशस्वी ठरली आहे का? क्षेत्र सेवेच्या अहवालांवरून दिसून येते की, सर्व प्रकारच्या प्रकाशनांचे वाटप वाढले आहे. लाखो लोकांना “जीवनाचे पाणी फुकट” घेण्याची संधी दिली जात आहे.—प्रकटी. २२:१७.
२ तथापि, प्रत्येकाला साहित्य दिलेच पाहिजे असे आपल्यावर बंधन नाही आणि आस्था नसलेल्या एखाद्या व्यक्तीस साहित्य देण्याची आपली इच्छाही नाही. आपण आपल्या स्वतःच्या वस्तूंचा जसा जपून वापर करतो त्याचप्रमाणे स्थानीय मंडळीद्वारे संस्थेकडून विनामूल्य मिळणाऱ्या साहित्याचा प्रत्येकाने विचारीपणाने वापर करावा. संस्था प्रचारकांना विनामूल्य साहित्य देते याचा अर्थ त्या प्रकाशनांची छपाई आणि वाटप करण्यात काहीच खर्च येत नाही असे नाही. तर, यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांच्याविषयी अचूक ज्ञान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना आपले साहित्य किती मदतदायी ठरते याचा सर्वांनी खासकरून विचार केला पाहिजे.—योहा. १७:३.
३ पण सर्वांना विनामूल्य साहित्य देणे संस्थेला कसे जमते? प्रकाशनांची छपाई आणि वाटप करण्यासाठी आवश्यक असलेला खर्च देणग्यांद्वारे भागवला जातो. यहोवाचे समर्पित सेवक मुख्यतः या देणग्या देतात. राज्याची घोषणा करण्याच्या अति निकडीच्या कार्याला आधार देण्यासाठी यहोवाचे साक्षीदार सामान्य जनतेवर अवलंबून राहत नाहीत. आपण पूर्वीही कधी निधी गोळा केलेला नाही आणि आताही करत नाही. परंतु, आपल्या क्षेत्रामध्ये खरोखर आस्था दाखवणारे आणि या कार्याची प्रशंसा करणारे लोक स्वेच्छेने जी काही लहानसहान देणगी देतात त्याची कदर केली जाते.
देणग्यांद्वारे काय साध्य होते
४ त्यामुळे, बायबल शिक्षणाचे आपले जागतिक कार्य ऐच्छिक अनुदानांकरवी कशाप्रकारे पार पाडले जाते ते थोडक्यात आणि स्पष्टपणे सांगता येण्याची आपली तयारी असायला हवी. या आधुनिक युगातील राज्य प्रचाराचे कार्य पूर्ण करण्यासाठी लागणारा अवाढव्य खर्च, गोळा होणाऱ्या निधीतून भागवला जातो. जगभरात वितरण करण्यासाठी साहित्य छापण्याव्यतिरिक्त येशूने आपल्या शिष्यांना दिलेली नेमणूक पूर्ण करण्यासाठी लागणारी शाखा दफ्तरे, बेथेल गृहे, सेवा सेवक प्रशिक्षण प्रशाला, खास पायनियर, प्रवासी पर्यवेक्षक आणि आवश्यक असलेल्या इतर असंख्य सेवांचे संचालन संस्था करते.—मत्त. २४:१४; २८:१९, २०.
५ यहोवाच्या लोकांमध्ये होणारी अभूतपूर्व वाढ पाहून पुष्कळजण मदत करायला स्वतःहून तयार होत आहेत. यांतले पुष्कळजण प्रत्यक्षपणे नवीन शाखा आणि राज्य सभागृहांच्या बांधकामात मदत करू शकत नाहीत किंवा दूरदूरच्या देशांमध्ये जाऊन सुवार्तेचे कार्य करू शकत नाहीत. परंतु, या उल्लेखनीय कार्यांमध्ये आपल्याला जमेल तितका भाग घेता येण्यासाठी पुष्कळ प्रचारक आणि त्यांची कुटुंबे न चुकता जागतिक कार्यासाठी अनुदान देतात. (पडताळा १ करिंथकर १६:१, २.) अशा तऱ्हेने, संस्थेच्या सर्व कार्यांचा आणि साहित्य वाटपाचा खर्चसुद्धा भागवला जातो. जागतिक कार्यासाठी दिले जाणारे ऐच्छिक अनुदान केवळ साहित्याचा खर्च भागवण्यासाठी असते असा विचार कोणीही करू नये.
६ घरमालकाला किंवा इतर कोणालाही साक्ष देताना त्यांच्यासोबत बायबलच्या एखाद्या विषयावर चर्चा करण्यास आपण तयार असले पाहिजे. रिझनिंग फ्रॉम द स्क्रिपचर्स या पुस्तकात अनेक चित्तवेधक प्रस्तावना आणि इतर उचित बायबलचे विषय दिले आहेत. किंवा आपण आमची राज्य सेवा यात दिलेल्या सादरतांचा उपयोग करू शकतो. राज्य संदेशाप्रती एखाद्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय आहे यानुसार प्रचारकाने साहित्य सादर करण्याविषयी ठरवावे. एखादे पुस्तक किंवा इतर कोणतेही प्रकाशन देण्याइतकी आस्था त्या व्यक्तीला नाही असे दिसून आल्यास तुम्ही उचितपणे ते संभाषण थांबवून पुढच्या घरी जाऊ शकता. किंवा त्या व्यक्तीने वाचायची इच्छा दाखवली तर तुम्ही तिला एखादी हस्तपत्रिका किंवा पत्रिका देऊ शकता. एखाद्या व्यक्तीने आस्था दाखवली असेल तर तिची नोंद करायला विसरू नका म्हणजे पुनर्भेट देता येईल. एखादी व्यक्ती व्यस्त असल्यामुळे किंवा आपण योग्य वेळी न गेल्यामुळे त्या व्यक्तीशी नीट चर्चा करता आली नाही तरीसुद्धा पुनर्भेट देता येऊ शकते.
७ आपले बायबल शिक्षणाचे कार्य व्यावसायिक स्वरूपाचे नाही हे साहित्य वाटपाच्या सुलभ योजनेमुळे सर्वांना दिसून येईल. शिवाय, राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याचे आणि येशू ख्रिस्ताचे शिष्य बनवण्याचे ध्येय केंद्रस्थानी ठेवायला ते
(पान ७ वर चालू)
मदत करते. धर्मादाय संस्थांकरता देणगी गोळा करणाऱ्या इतर संघटनांप्रमाणे यहोवाचे साक्षीदार देणग्या गोळा करत नाहीत; परंतु सर्वांना विनामूल्य साहित्य देता येऊ शकते याचा त्यांना आनंद वाटतो. आपल्या कार्यामध्ये ज्यांना आस्था नाही अशांकडून जागतिक कार्यासाठी देणगी कधीच मागितली जात नाही. (टेहळणी बुरूज, नोव्हेंबर १, २०००, पृष्ठे २८-३१ पाहा.) संघटनेत काम करणारे सर्वजण स्वयंसेवक असल्यामुळे आणि त्यांना कसल्याही प्रकारचा पगार किंवा कमिशन दिले जात नसल्यामुळे जागतिक बायबल शिक्षणाचे कार्य पार पाडण्यासाठी शंभर टक्के अनुदान वापरले जाते. जागतिक कार्यासाठी असलेल्या देणगीसंबंधी जे लोक स्वतःहून विचारणा करतात किंवा ज्यांना आपल्या कार्यामध्ये आस्था आहे केवळ त्यांच्याशीच याची चर्चा केली जाते.
८ आपण आवेशाने आपली सेवा आणखी वाढवत राहतो आणि संस्थेच्या मूल्यवान प्रकाशनांचा सुज्ञतेने वापर करत राहतो तसे यहोवा आपल्यामध्ये वाढ करतच राहील. प्रत्येक ठिकाणी असे भले लोक भेटतात ज्यांना आपल्या सेवाकार्याचे स्वरूप सांगितल्यावर ते कदर करतात आणि स्वेच्छेने अनुदान देऊन साहाय्य करण्याची तयारी दाखवतात.
साहित्य वाटपाची सुलभ योजना (चालू)