घोषणा
▪ साहित्य सादरता जानेवारी: माहितीपत्रके: विसाव्या शतकातील यहोवाचे साक्षीदार व यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत. तसेच, १९२ पानी जुनी पुस्तके देखील सादर केली जाऊ शकतात. फेब्रुवारी: लाईफ हाऊ डिड इट गेट हियर? बाय एव्होल्युशन ऑर बाय क्रिएशन?, प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!, किंवा मंडळीत १९२ पानी जुन्या पुस्तकांचा साठा असेल तर त्यापैकी कोणतेही पुस्तक देता येऊ शकते. मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. गृह बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी खास प्रयत्न केला जावा. एप्रिल: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिके. पुनर्भेटींमध्ये आस्था दिसल्यास, वर्गण्या दिल्या जाऊ शकतात. सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक किंवा बायबल कथांचं माझं पुस्तक सादर करा.
▪ सन २००२ मधील स्मारक विधी, मार्च २८ रोजी सूर्यास्तानंतर असेल. ही सूचना मुद्दामहून इतक्या आधी दिली जात आहे. त्यामुळे, अनेक मंडळ्या जर एकाच राज्य सभागृहाचा उपयोग करणार असतील आणि या प्रसंगासाठी बाहेरचा हॉल बुक करण्याची आवश्यकता असेल तर त्यासाठी बांधवांना पुरेसा वेळ मिळेल. हॉलच्या इमारतीत चाललेल्या इतर कार्यक्रमांमुळे कोणताही त्रास न होता स्मारकविधीचा सोहळा शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडावा म्हणून वडिलांनी हॉलच्या मॅनेजमेन्टशी आधीच बोलावे. हा एक महत्त्वपूर्ण प्रसंग असल्यामुळे स्मारकविधीचे भाषण देण्यासाठी एखाद्या बांधवाला नियुक्त करताना वडीलवर्गाने आळीपाळीने भाषण देण्याऐवजी किंवा दर वर्षी एकाच बांधवाला भाषण देण्यास नियुक्त करण्याऐवजी अधिक कार्यक्षम असलेल्या एखाद्या वडिलाला हे भाषण देण्यासाठी नेमावे. अर्थात, अभिषिक्त वर्गापैकी एखादा सक्षम बांधव असल्यास गोष्ट वेगळी आहे.
▪ जानेवारी ८ च्या सेवा सभेला उपस्थित राहणाऱ्या सर्व बाप्तिस्मा प्राप्त प्रचारकांना आगाऊ वैद्यकीय सूचना/मुक्तता कार्ड आणि त्यांच्या मुलांकरता ओळख पत्र उपलब्ध करून दिले जाईल.
▪ फेब्रुवारीपासून ४ मार्चपर्यंत, विभागीय पर्यवेक्षकांसाठी नवीन जाहीर भाषणाचा विषय असेल, “न्यायाचा दिवस—भीतीचा की आशेचा समय?”
▪ यंदा रविवारी, एप्रिल ८ रोजी सूर्यास्तानंतर स्मारक विधी साजरा करण्यासाठी मंडळ्यांनी सोयीस्कर योजना कराव्यात. भाषण लवकर सुरू झाले तरी, बोधचिन्हे सूर्यास्ताच्या आधी फिरवली जाऊ नयेत. तुमच्या परिसरात सूर्यास्त कधी होतो हे स्थानीय सूत्रांकडून माहीत करून घ्या. त्या दिवशी, क्षेत्र सेवेच्या सभेशिवाय इतर कोणत्याही सभा भरवल्या जाणार नसल्यामुळे त्या दिवसाचा टेहळणी बुरूज अभ्यास इतर वेळी घेण्याची व्यवस्था करा. विभागीय पर्यवेक्षकांना त्या आठवड्याच्या सभेत स्थानीय परिस्थितींनुसार फेरबदल करावा लागेल. प्रत्येक मंडळीने आपला स्वतःचा स्मारक विधी साजरा करावा हे जरी इष्ट असले तरी नेहमीच हे शक्य नसेल. एरवी जर दोन किंवा तीन मंडळ्या एकच राज्य सभागृह वापरत असतील तर कदाचित अनेक मंडळ्या खास त्या सायंकाळसाठी दुसरे एखादे सभागृह वापरू शकतात. शक्य असेल तेथे, दोन कार्यक्रमांमध्ये कमीत कमी ४० मिनिटांचा अवधी द्यावा ज्यामुळे सगळ्यांना कार्यक्रमाचा लाभ घेता येईल आणि नवीन लोकांना व आस्थेवाईकांना भेटायला वेळ मिळेल. वाहतूक आणि वाहने उभी करण्यासाठी जागा तसेच प्रवाशांची ने-आण करण्याची व्यवस्था यांचाही विचार करावा. स्थानीय परिस्थितींनुसार काय योग्य असेल हे वडील वर्गाने ठरवावे.
▪ सन २००१ च्या स्मारक विधीसाठी असलेले खास जाहीर भाषण रविवार, एप्रिल १ रोजी दिले जाईल. त्या भाषणाचा विषय असेल, “कोणाचा बचाव होऊ शकतो?” त्यासाठी एक रूपरेषा पुरवली जाईल. त्या सप्ताहांती ज्या मंडळ्यांमध्ये विभागीय पर्यवेक्षकांची भेट, विभागीय संमेलन किंवा खास संमेलन दिवस असेल त्यांच्याकरता हे खास भाषण एप्रिल ९ च्या आठवडी असेल. कोणत्याही मंडळीत एप्रिल १, २००१ च्या आधी हे खास भाषण दिले जाऊ नये.
▪ जानेवारी ८, २००१ पासून उर्दू भाषेत सावध राहा! नियतकालिकाचा मासिक अंक सुरू होईल.