रक्ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते? या माहितीपत्रकाच्या अभ्यासासाठी प्रश्न
या अभ्यासामध्ये काही ठिकाणी पृष्ठ २७-३१ मधल्या पुरवणीचा उल्लेख केला आहे. तेथे दर्शवलेल्या परिच्छेदांवरील टिपणी त्या त्या अभ्यासात सामील केली जाऊ शकते. वेळ असल्यास पुरवणीतील परिच्छेद वाचावेत.
पहिला आठवडा
पृष्ठ २
१-४. रक्ताने जीवन वाचू शकते याचा विचार करण्याची ही योग्य वेळ का आहे? (पृष्ठ २७, परिच्छेद १-३ पाहा.)
पृष्ठ ३
१, २. जीवनाचा रक्ताशी संबंध असल्याचा दृष्टिकोन का स्वाभाविक आहे व या बाबतीत देव कसा गोवलेला आहे?
३, ४. रक्ताविषयी देवाचे विचार काय आहेत यात आपण आस्था का बाळगावी?
५. उत्पत्ती ९:३-६ कडे आपण कोणत्या कारणांमुळे लक्ष द्यावे व त्या उताऱ्याचे महत्त्व काय?
६. रक्तासंबंधी इस्राएली लोकांवर कोणते बंधन होते?
पृष्ठ ४
१, २. प्राचीन इस्राएली लोकांना देवाच्या नियमांचा कसा फायदा झाला, परंतु इस्राएलांनी रक्त टाळण्याचे प्रमुख कारण काय होते?
३. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये रक्ताबद्दलच्या नियमाकडे कशा दृष्टीने पाहायचे होते?
पृष्ठ ५
१, २. रक्ताच्या नियमाबद्दल येशूने कोणते उदाहरण घालून दिले?
३, ४. (अ) ख्रिस्ती लोक व रक्त यांच्याविषयी प्रेषितांच्या कार्यकारी समितीने काय ठरवले? (ब) रक्त वर्ज्य करण्याचा हुकूम तात्पुरता होता किंवा नाही हे आपल्याला कसे कळते?
५. येशूच्या प्रेषितांच्या मते रक्त टाळणे हे किती महत्त्वाचे होते?
६, ७. रक्ताबाबतचा हुकूम कायमचा बंधनकारक असल्याचे आणखी कोणत्या पुराव्यावरून सिद्ध होते?
पृष्ठ ६
१, २. ख्रिस्तपूर्व काळात औषध म्हणून रक्ताचा उपयोग कसा केला गेला?
३. रोमी काळात अगदी औषध म्हणून देखील रक्त वापरण्यासंबंधी सुरवातीच्या ख्रिस्ती लोकांची प्रतिक्रिया कशी होती?
४-६. (अ) रक्त संक्रमणाचा वापर कसा सुरू झाला? (ब) देवाचा नियम लक्षात घेता शिरेतून रक्ताचे संक्रमण करणे चूक का होईल?
७. यहोवाचे साक्षीदार रक्त संक्रमणाला का नकार देतात? (पृष्ठ २७, परिच्छेद ४-६ व पृष्ठ २८ परिच्छेद १ पाहा.)
पृष्ठ ७
१. ख्रिस्ती लोकांनी रक्त संक्रमण टाळण्याचे प्रमुख कारण धार्मिक असले तरी उपचारात रक्त वापरण्यासंबंधी वैद्यकीय बाजू आपण का पारखली पाहिजे?
दुसरा आठवडा
पृष्ठ ७
२, ३. आधुनिक वैद्यक शास्त्रात रक्त संक्रमणाला काय महत्त्व आहे?
४, ५. रक्त संक्रमणे धोकादायक आहेत याचा विचार करणे का वाजवी आहे?
पृष्ठ ८
१. रक्त संक्रमणाविषयी काय विचारणे सुज्ञतेचे आहे?
२, ३. रक्ताचा गट ओळखणे व त्यांची परस्पर जुळणी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्या तरी पुरेशा का नाहीत?
४, ५. रक्त संक्रमणामुळे रोगप्रतिकारासंबंधी समस्या कशा उत्पन्न होऊ शकतात?
६, ७. कर्करोगासाठी शस्त्रक्रिया केल्यानंतर रक्त संक्रमणाने कोणता अपाय होऊ शकतो?
पृष्ठ ९
१. रक्त संक्रमण व कर्करोगासाठी केलेल्या शस्त्रक्रियांबद्दल असलेल्या पुराव्याचे महत्त्व काय?
२, ३. संक्रमणाने रोगप्रतिकारक क्षमतेला आणखी कोणता अपाय होऊ शकतो?
४, ५. संक्रमणापासून रोगांची लागण होऊ शकते याविषयी लोकांना माहिती असण्याची गरज का आहे?
पृष्ठ १० (चौकट)
१, २. संक्रमणामुळे काविळीची लागण होण्याचा धोका किती गंभीर आहे?
३. रक्तातून काविळीची लागण होण्याच्या धोक्यावर मात करण्यात आली आहे असे एका वेळी का वाटले?
४, ५. रक्तापासून काविळीची लागण होण्याच्या धोक्याकडे दुर्लक्ष करता येत नाही असे कोणत्या घटनांमुळे सिद्ध झाले?
६-८. काविळीबद्दलची चिंता आता राहिलेली नाही असे का म्हणता येत नाही?
पृष्ठ ११
१. रक्तामुळे होणाऱ्या रोगांचा धोका संपत आलेला नसल्याचे कोणत्या उदाहरणाने दिसून येते?
२-४. आपल्या वसाहतीत सर्वसामान्य नसलेल्या रोगांचा धोका रक्त संक्रमणामुळे कसा निर्माण होऊ शकतो? (पृष्ठ ११ वरील चौकटही पाहा.)
५-७. नव्या प्राणघातक रोगांचा संबंध रक्ताशी असू शकेल हे एड्सच्या साथीने कसे दाखवून दिले आहे?
पृष्ठ १२
१, २. एड्स विषाणूवरील (व्हायरसच्या) प्रतिद्रव्ये शोधण्याच्या परीक्षांचा उपयोग केल्यानंतरही रक्त धोक्यापासून मुक्त असल्याची हमी का देता येत नाही?
३-५. या बाबतीत धोका फक्त एड्सचाच नाही असे का?
६, ७. रक्तातून पसरणाऱ्या विषाणुंबद्दल (व्हायरस) तज्ज्ञांना कोणत्या साधार चिंता आहेत?
तिसरा आठवडा
पृष्ठ १३
१, २. उत्तम प्रतीची वैद्यकीय सेवा कोणाला हवी आहे व त्यात कशाचा समावेश आहे?
३-५. रक्ताच्या संक्रमणाला पर्याय असल्याचे तुम्ही सोदाहरण कसे दाखवू शकाल?
६-८. अनेकदा रक्ताचे संक्रमण केव्हा केले गेले आहे, परंतु या प्रथेला पक्का आधार का नव्हता?
पृष्ठ १४
१. हिमोग्लोबिनची पातळी सामान्यापेक्षा कमी असली तरी चालू शकते असे कशाने दिसून येते?
२, ३. खूप जास्त रक्तस्राव झाल्यास कशाची गरज असते व ह्या समस्येवर कसा उपाय करता येतो?
४. रक्ताची जागा भरून काढणारे रक्तहीन द्रव परिणामकारक का असतात?
५. लाल पेशी गमावल्याने झालेले नुकसान हाताळण्यास डॉक्टर रुग्णाची मदत कशी करू शकतात?
पृष्ठ १५
१. लाल पेशींचे उत्पादन जलद होण्यासाठी काय करता येते?
२-४. शस्त्रक्रियेच्या वेळी रक्त गमावण्याचे प्रमाण कमी कसे करता येते?
पृष्ठ १६
१-३. संक्रमणाविना मोठ्या शस्त्रक्रिया करणे शक्य असल्याचे कोणत्या पुराव्याने दिसून येते?
४-६. रक्त न वापरता किती वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करणे शक्य आहे? (पृष्ठ २८ परिच्छेद २-४ पाहा.)
पृष्ठ १७
१. रक्त न देता केलेल्या हृदयाच्या शस्त्रक्रियांमध्ये कोणते चांगले परिणाम प्राप्त झालेले आहेत?
२-४. रक्तहीन शस्त्रक्रियांमध्ये सहसा अनुभवास येणाऱ्या उत्तम परिणामांना स्वतः साक्षीदार रुग्ण कसा हातभार लावतात?
चौथा आठवडा
पृष्ठ १७
५, ६. जोखिम/फायदे परीक्षण म्हणजे काय व त्याचा उपयोग कसा केला जातो?
पृष्ठ १९
१, २. जोखिम/फायदे परीक्षणात रुग्ण कोणती भूमिका करतो?
३-५. धोके व फायद्यांचा विचार करताना रक्ताच्या उपचारपद्धतीचा विचार का करावा? (पृष्ठ ३१, परिच्छेद १, २ पहा.)
६. वैद्यकीय उपचारपद्धती निवडण्याच्या हक्कासंबंधी कोणते कायदेविषयक तत्त्व लागू होते? (पृष्ठ ३०, परिच्छेद १-८ पाहा.)
पृष्ठ १८ (चौकट)
१-४. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कायदेविषयक चिंतांतून मुक्त करण्यासाठी साक्षीदार असलेले रुग्ण काय करतात? (पृष्ठ २८, परिच्छेद ५ पाहा.)
५-७. कायदेविषयक चिंतांचे निरसन करण्यासाठी साक्षीदार जे करतात ते लक्षात घेता, डॉक्टर व इस्पितळांनी सहकार्य देणे योग्य का आहे?
पृष्ठ २०
१-३. साक्षीदारांनी घेतलेल्या निर्णयाला काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कशी प्रतिक्रिया दाखवली आहे?
४, ५. साक्षीदार असलेल्या काही रुग्णांच्या बाबतीत न्यायालये कशी गोवली गेली आहेत?
पृष्ठ २१
१, २. साक्षीदारांना रक्ताचा प्रश्न येतो तेव्हा न्यायालयाकडे धाव घेणे हा सर्वोत्तम उपाय का नाही?
३, ४. रुग्ण लहान मूल असले तरी न्यायालयाकडे वळणे, कोणत्या कारणांमुळे अनुचित आहे?
५, ६. मुलांवर कोणता उपचार करायचा हे ठरवताना पालकांना कोणता हक्क आहे? (पृष्ठ २८ परिच्छेद ६, व पृष्ठ २९, परिच्छेद १ पाहा.)
पृष्ठ २२
१-४. आपल्या मुलांसाठी वैद्यकीय निर्णय घेण्यास आईवडील स्वतंत्र असावेत असे सूचित करणारे काही कायदे कोणते आहेत?
५. साक्षीदार आईवडील व वैद्यकीय कर्मचारी यांच्यात सहकार्य का असावे?
पाचवा आठवडा
पृष्ठ २२
६, ७. रक्त व रक्तहीन उपचार घेण्यासंबंधी साक्षीदारांची मागणी याविषयी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत?
पृष्ठ २३
१-३. रक्त नाकारल्यामुळे कोणी मृत्युमुखी पडले तरी आपण कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये? (पृष्ठ २९, परिच्छेद २-५, व पृष्ठ ३१, परिच्छेद ३-५ पाहा.)
४, ५. मृत्यू व रक्त यांच्या बाबतीत एक वास्तववादी दृष्टिकोन कोणता आहे?
पृष्ठ २४
१, २. रक्त खरोखर जीव वाचवू शकते हे आपण कशामुळे नीट समजू शकतो?
३, ४. ख्रिस्तपूर्व काळात रक्ताबद्दल देवाचा दृष्टिकोन काय होता व का?
पृष्ठ २५
१. प्रायश्चित्ताच्या दिवशी रक्ताचा वापर कशासाठी होत असे व त्याबद्दल आपण आस्था का बाळगावी?
२, ३. प्रायश्चित्ताच्या दिवसाचा व येशूच्या भूमिकेचा परस्पर संबंध काय आहे?
४. (अ) ख्रिस्ती लोक कोणत्या महत्त्वाच्या कारणासाठी रक्त वर्ज्य करतात? (ब) रक्त संक्रमणाच्या धोक्यावर आपण जास्त भर का देऊ नये?
५, ६. (अ) रक्त आणि देवाशी आपले नाते यांचा काय संबंध आहे? (ब) रक्तासंबंधी कोणती शिकवण सर्वात महत्त्वाची आहे असे आपण समजावे?
७. रक्ताविषयी साक्षीदारांच्या भूमिकेने जीवनाबद्दल आदर प्रदर्शित होतो असे आपण का म्हणू शकतो?
पृष्ठ २६
१, २. आपल्या सार्वकालिक भविष्यामध्ये रक्त कसे गोवलेले आहे?