वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०१ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००१
  • उपशिर्षक
  • जानेवारी ८ ने सुरू होणारा सप्ताह
  • जानेवारी १५ ने सुरू होणारा सप्ताह
  • जानेवारी २२ ने सुरू होणारा सप्ताह
  • जानेवारी २९ ने सुरू होणारा सप्ताह
  • फेब्रुवारी ५ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००१
km १/०१ पृ. २

सेवा सभा आराखडा

जानेवारी ८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १८ (१६२)

७ मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.

१८ मि: “तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या.”a जून १, १९९७ चे टेहळणी बुरूज, पृष्ठे १५, परिच्छेद १२-१३ यातील मुद्दे निवडा. साक्ष देण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेण्यासाठी सर्वांना उत्तेजन द्या.

२० मि: आपल्या आरोग्यासाठी प्रेमळ तरतूद. कार्यक्षम बांधवाचे भाषण. आगाऊ वैद्यकीय सूचना/मुक्‍तता कार्ड भरणे, रक्‍त संक्रमण टाळण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे हे सांगा. आजच्या सभेनंतर बाप्तिस्मा प्राप्त प्रचारकांना हे कार्ड देण्यात येईल, परंतु ते लगेच तिथेच भरू नये. मंडळीकडे पुरेसे कार्ड असले पाहिजेत. कृपया सांगा की, कार्डावर स्वतः साक्षीदारांसमोर सही करणे आणि तारीख घालणे हे सर्व पुढील मंडळीच्या पुस्तक अभ्यासानंतर केले जाईल. ज्यांना यासाठी मदत हवी असेल ते पुस्तक अभ्यास चालकाची मदत घेऊ शकतात. साक्षीदार म्हणून सही देणाऱ्‍यांनी त्या व्यक्‍तीला कार्डावर सही करताना ती प्रत्यक्षात पाहायला पाहिजे. पुस्तक अभ्यास चालकांनी खात्री करावी की, त्यांच्या ग्रुपमध्ये असलेल्या सर्वांना आगाऊ वैद्यकीय सूचना/मुक्‍तता कार्ड भरण्यास मदत केली आहे. पालकांना आपल्या मुलांसाठी या सभेनंतर ओळख पत्रे दिली जातील. बाप्तिस्मा प्राप्त नसलेले प्रचारक या कार्डांवरील भाषा घेऊन स्वतःच्या परिस्थितीनुसार आणि विश्‍वासानुसार स्वतःकरता आणि आपल्या मुलांकरता ही सूचना कार्डे तयार करू शकतात.

गीत क्र. २० (९३) आणि समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी १५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ७ (५१)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.

२० मि: “साहित्य वाटपाची सुलभ योजना.” कार्यक्षम वडील श्रोत्यांसोबत या लेखातील माहितीची चर्चा करतात. एका अनुभवी प्रचारकाला तीन संक्षिप्त प्रात्यक्षिके उत्तम तयारीनिशी सादर करण्यास सांगा. या महिन्याची सादरता वापरून, पहिले प्रात्यक्षिक १९९९ डिसेंबरच्या आमची राज्य सेवा पृष्ठ ३, परिच्छेद ४ यात दिलेल्या सूचनांवर आधारलेले आहे. प्रचारक पुनर्भेटीकरता व्यवस्था करतो आणि घरमालकाने दिलेले अनुदान एका पाकीटात घालतो. दुसऱ्‍या प्रात्यक्षिकात, घरमालक प्रचारकाशी बोलतो परंतु त्याला राज्य संदेशात खरी आस्था नसल्यामुळे प्रचारक त्याला कोणतेही प्रकाशन देत नाही असे दाखवा. तिसऱ्‍या प्रात्यक्षिकात, खरोखर आस्था दाखवलेल्या परंतु व्यस्त असलेल्या व्यक्‍तीला पत्रिका कशी दिली जाते ते दाखवा. प्रचारक पुनर्भेटीसाठी योजना करतो.

१५ मि: तुम्ही शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करत आहात का? भाषण आणि मुलाखती. डिसेंबर १५, १९९६, टेहळणी बुरूज, पृष्ठे १७-१८, परिच्छेद १२-१४ मधील माहिती विचारात घ्या. संपूर्ण कुटुंबाने दररोज शास्त्रवचनावर चर्चा करणे किती सुज्ञपणाचे आहे हे त्यात दाखवले आहे. कौटुंबिक सदस्यांची मुलाखत घ्या आणि प्रत्येकाला अलीकडेच चर्चा केलेल्या शास्त्रवचनाचा कसा फायदा झाला आणि का हे विचारा. यामुळे आपले कुटुंब मजबूत आणि सेवेत सक्रिय राहते. म्हणून आपल्या कौटुंबिक अभ्यासात ही चर्चा नियमित केली जावी यावर जोर द्या.

गीत क्र. २६ (२१२) व समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी २२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १२ (११३)

७ मि: स्थानीय घोषणा.

१८ मि: प्रस्तावना कशा तयार कराव्यात. भाषण आणि प्रात्यक्षिके. रीझनिंग पुस्तक, पृष्ठ ९ वरील मुद्द्‌यांची उजळणी करा. आपली पद्धत, आपले व्यक्‍तिमत्त्व आणि क्षेत्र यांना साजेशा प्रस्तावना कशा निवडल्या जाऊ शकतात हे दाखवा. अपेक्षा माहितीपत्रकासोबत वापरल्या जाणाऱ्‍या काही प्रस्तावनांची उजळणी करा आणि त्यातील एक किंवा दोन प्रस्तावनांचे प्रात्यक्षिक दाखवा. (एप्रिल १९९७ आमची राज्य सेवा, पृष्ठ ८ पाहा.) रीझनिंग पुस्तक आणि आमची राज्य सेवा यात दिलेल्या सूचनांचा आपल्या प्रचारकार्यात चांगला उपयोग करण्यासाठी सर्वांना उत्तेजन द्या.

२० मि: “चांगले ऐकणारे असा.” भाषण आणि श्रोत्यांशी चर्चा. प्रशाला मार्गदर्शकपुस्तक, पृष्ठे २७-८, परिच्छेद १५-१७ यातील मुद्द्‌यांची उजळणी करा. आपल्या लक्षात किती राहिले आहे यावरून आपल्या ऐकण्याच्या सवयीची परीक्षा होते. आजच्या ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत शिकलेले काही महत्त्वपूर्ण मुद्दे सांगायला श्रोत्यांना उत्तेजन द्या.

गीत क्र. ६ (४५) व समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी २९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १६ (१४३)

१० मि: स्थानीय घोषणा. जानेवारीचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची प्रचारकांना आठवण करून द्या. फेब्रुवारीसाठी कोणती साहित्य सादरता आहे आणि मंडळीकडे कोणती पुस्तके आहेत ते सांगा.

१५ मि: निर्माणकर्त्याला अधिक जवळून जाणून घ्या. जून १५, १९९९ च्या टेहळणी बुरूज पृष्ठे २४-६ वर आधारित भाषण; त्याद्वारे मंडळीमध्ये इज देअर अ क्रिएटर हू केअर्स अबाऊट यू या पुस्तकाच्या अभ्यासाविषयी उत्सुकता वाढवा. पुस्तक अभ्यासातील साप्ताहिक चर्चांमध्ये युवकांना भाग घेण्यास उत्तेजन द्या. सर्वांना नियमितपणे उपस्थित राहून आपल्या महान निर्माणकर्त्याविषयी होता होईल तितके अधिक शिकण्यास आवडेल. मंडळ्यांमध्ये क्रिएटर पुस्तकाचा अभ्यास होणार नसेल तर पाच नेमलेल्या माहितीपत्रकांच्या अभ्यासासाठी ही माहिती लागू करा.

२० मि: “पालकांनो आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावा.” भाषण आणि ज्यांची मुले चांगली आध्यात्मिक प्रगती करत आहेत त्या पालकांची मुलाखत. क्षेत्र सेवेत मुलांना सामील करण्यासाठी पालकांनी केलेल्या सकारात्मक गोष्टींचा ते उल्लेख करतात. वेळेनुसार, कौटुंबिक सौख्यानंद या पुस्तकातील पृष्ठे ५५-९ वरील सल्लेसुद्धा सामील करा.

गीत क्र. ९ (३७) व समाप्तीची प्रार्थना.

फेब्रुवारी ५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ८ (५३)

१० मि: स्थानीय घोषणा.

१५ मि: “आनंदाने आचरण करणारे व्हा.”b इन्साईट पुस्तक, खंड दुसरा, पृष्ठ १२०, परिच्छेद ६-८ मध्ये सांगितल्यानुसार देवाच्या सेवेतील आपला आनंद कशामुळे द्विगुणीत होतो ते दाखवा.

२० मि: हितकर मनोरंजनाचा आस्वाद घेणे शक्य आहे. जून ८, १९९७ च्या सावध राहा! नियतकालिकात दिलेल्या माहितीवर काही कौटुंबिक सदस्य चर्चा करतात. कुटुंबातले सदस्य कोणते मनोरंजन निवडतात याविषयी वडिलांना चिंता आहे. “काय दशा आहे करमणुकीची?” (पृष्ठे ४-७) याची संक्षिप्त उजळणी केल्यावर हितावह आणि फायदेकारक असलेल्या मनोरंजनाच्या प्रकारांची ते चर्चा करतात. आपली सेवा पुस्तक, पृष्ठे १३१-२ वरील “मनोरंजन” या उपशिर्षकाखालील आणि पृष्ठे १३५-६ वरील “सर्व देवाच्या गौरवासाठी करा” या उपशिर्षकाखालील माहिती विचारात घ्या. पालकांचा पुढाकार आणि सर्वांच्या भल्याकरता कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य किती महत्त्वाचे आहे ते सांगा.

गीत क्र. ११ (८५) व समाप्तीची प्रार्थना.

[तळटीप]

a प्रस्तावना एक मिनिटाच्या आत संपवून प्रश्‍नोत्तरांनी चर्चा करावी.

b प्रस्तावना एक मिनिटाच्या आत संपवून प्रश्‍नोत्तरांनी चर्चा करावी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा