सन २००१ करता ईश्वरशासित सेवा प्रशाला
१ आपण सर्वांनी ईश्वरशासित सेवा प्रशालेत होता होईल तितका सहभाग का घ्यावा याची अनेक कारणे शास्त्रवचनात दिली आहेत.—नीति. १५:२३; मत्त. २८:१९, २०; प्रे. कृत्ये १५:३२; १ तीम. ४:१२, १३; २ तीम. २:२; १ पेत्र ३:१५.
२ प्रशालेमध्ये साप्ताहिक बायबल वाचनाचा एक भाग कित्येक वर्षांपासून चालत आला आहे. त्यासाठी दररोज बायबलचे फक्त एक पान वाचावे लागते. या वर्षापासून, प्रत्येक लेखी उजळणीच्या सप्ताहासाठी देखील बायबल वाचनाचा भाग नेमून द्यायला सुरवात केली होती. गेल्या तीन वर्षांसाठी दिलेला जादा बायबल वाचनाचा आराखडा आता पूर्ण झाला आहे. परंतु, आराखड्यात दिलेल्या भागापेक्षा तुम्हाला जास्त वाचन करायचे असल्यास तुम्ही वैयक्तिक वाचनासाठी एक आराखडा तयार करू शकता.
३ नेमणूक क्र. २ बांधवांना, देवाच्या वचनाचे “सार्वजनिक शास्त्रवाचन” करण्यासाठी प्रशिक्षण देते. (१ तीम. ४:१३, मराठी कॉमन लँग्वेज) तुम्हाला वाचनाची नेमणूक मिळाली असल्यास वारंवार मोठ्याने वाचून सराव करा. शब्दोच्चार, जोर देण्यासाठी आवाजात चढ-उतार करणे आणि चांगले वाचन कसे करावे हे शिकण्यासाठी प्रशाला मार्गदर्शक पुस्तकात दिलेल्या विविध सल्ल्यांचा वापर तुम्ही करू शकता.
४ नेमणूका क्र. ३ आणि ४ वेगवेगळ्या माहितीपत्रकांवर आणि सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकावर आधारित आहेत. नेमलेल्या भागातली माहिती जर फारच जास्त असेल आणि तुम्हाला दिलेल्या वेळेत तो सादर करता येत नसेल तर तुमच्या मंडळीच्या क्षेत्रासाठी उपयुक्त असेल तितकीच माहिती घ्या. तुमच्या क्षेत्रासाठी उचित असणारे कोणतेही सेटिंग तुम्ही या भाषणांसाठी वापरू शकता.
५ प्रशालेतील तुमच्या नेमणुका पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करा. चांगली तयारी करण्यासाठी वेळ काढा आणि जे काही बोलाल ते अंतःकरणापासून बोला. असे केल्याने तुम्ही मंडळीला उत्तेजन देऊ शकाल आणि २००१ साली ईश्वरशासित सेवा प्रशालेत पूर्ण सहभाग घेतल्याने स्वतःचाही फायदा करून घेऊ शकाल.