द बायबल—ॲक्यूरेट हिस्ट्री, रिलाइअबल प्रॉफसी या व्हिडिओतून शिकणे
हा व्हिडिओ पाहिल्यावर, तुम्हाला पुढील प्रश्नांची उत्तरे देता येतील का? (१) बायबलमधील विश्वसनीय माहितीचा उगम कोण आहे? (दानी. २:२८) (२) बायबलमध्ये प्राचीन इजिप्तचे अचूक चित्र कसे रेखाटले आहे आणि यशया १९:३, ४ मधील भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? (३) असेरियन लोक, त्यांचे राजे आणि असेरियाचा अंत याविषयी बायबलमध्ये सांगितलेल्या माहितीला पुरातनवस्तुशास्त्र कसा आधार देते? (नहूम ३:१, ७, १३) (४) बॅबिलोनसंबंधी कोणत्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत? (५) मेद-पारस यांच्यामुळे देवाच्या लोकांवर काय परिणाम झाला? (६) दानीएल ८:५, ८ याची पूर्णता कशी झाली आणि हे भाकीत किती वर्षांआधी करण्यात आले होते? (७) येशूने खरा मशीहा असल्याचे कसे सिद्ध केले? (८) प्रकटीकरण १३:११ आणि १७:११ मधील भविष्यवाणींची पूर्णता कोणत्या आधुनिक राजकीय सत्तांनी केली आहे? (९) उपदेशक ८:९ या शास्त्रवचनाची सत्यता व्हिडिओतील कोणत्या दृश्यांमधून सिद्ध झाली आहे? (१०) हा व्हिडिओ पाहून भविष्याविषयी बायबलमध्ये केलेल्या अभिवचनांवरील तुमचा विश्वास कसा दृढ झाला आहे? (११) या व्हिडिओच्या आधारे बायबल हे परमेश्वर प्रेरित आहे हे इतरांना तुम्ही कसे पटवून द्याल?