सेवा सभा आराखडा
नोव्हेंबर १३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ६ (४५)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.
१३ मि: किंगडम न्यूज क्र. ३६ चे वितरण करताना आलेले अनुभव. किंगडम न्यूज क्र. ३६ चे वितरण करताना आतापर्यंत आलेले चांगले अनुभव सांगायला वेगवेगळ्या प्रचारकांना विचारा. या मोहिमेदरम्यान जास्त कार्य करण्याची आणि वेगवेगळ्या प्रचारकांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल गुणग्राहकता व्यक्त करण्यास सामान्य आणि साहाय्यक पायनियरांना आमंत्रण द्या.
२२ मि: रीझनिंग पुस्तकाचा चांगल्याप्रकारे उपयोग करा. पृष्ठे ७-८ प्रश्नोत्तराने चर्चा. क्षेत्रात अधिक प्रभावीपणे भाग कसा घेता येईल याबाबतीत आपल्याला मार्गदर्शन देण्याकरता हे पुस्तक बनवण्यात आले आहे. टेलिफोनद्वारे साक्ष देतानाही या पुस्तकाचा कसा उपयोग करता येतो ते सांगा. एखाद्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरता उपयुक्त माहिती कशी शोधायची त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. मंडळीतील सर्वांना हे पुस्तक वाचण्याचे, ते नेहमी आपल्या बॅगमध्ये ठेवण्याचे आणि त्याचा नेहमी उपयोग करण्याचे उत्तेजन द्या.
गीत क्र. ५ (४६) आणि समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर २० ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ८ (५३)
१२ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. आतापर्यंत किती क्षेत्र पूर्ण झाले आहे आणि आणखी काही क्षेत्र बाकी असल्यास नोव्हेंबर ३० पर्यंत ते पूर्ण करण्याकरता काय करता येण्यासारखे आहे हे संक्षिप्तपणे सांगा.
१३ मि: प्रश्न पेटी. वडिलांचे भाषण.
२० मि: “प्रचार करत राहा!” भाषण आणि मुलाखत. काही जण यहोवाच्या संस्थेत पुष्कळ वर्षांपासून आहेत व त्यांनी जवळजवळ त्यांचे संपूर्ण आयुष्य प्रचार कार्यासाठी वेचले आहे. सकारात्मक मनोवृत्ती ठेवल्यामुळे त्यांना या कामात आनंद मिळाला आहे. (ज्ञान पुस्तक, पृष्ठ १७९ परिच्छेद २० आणि टेहळणी बुरूज ऑगस्ट १, १९९२, पृष्ठे २०-१ परिच्छेद १४-१५ पाहा.) इतक्या वर्षांपासून सेवा कार्य करण्यात कसे टिकून राहता आले हे सांगायला एखाद्या प्रचारकाला बोलवा.
गीत क्र. १७ (१८७) व समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर २७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २ (१५)
१० मि: स्थानीय घोषणा. मंडळीतील सर्वांना नोव्हेंबरचा रिपोर्ट द्यायची आठवण करा. डिसेंबर महिन्यात, ज्ञान पुस्तक आणि न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन हे साहित्य आपल्याला सादर करायचे आहे. यहोवाच्या साक्षीदारांनी अनेक भाषांमध्ये बायबल प्रकाशित करण्यात महत्त्वाची भूमिका कशी बजावली आहे त्याचे स्पष्टीकरण द्या.—टेहळणी बुरूज ऑक्टोबर १५, १९९७, पृष्ठे ११-१२ पाहा.
२० मि: “किंगडम न्यूज क्र. ३६ मुळे उत्पन्न झालेल्या आस्थेला खतपाणी घालणे.” परिच्छेद १-५ वर प्रश्नोत्तराने चर्चा. किंगडम न्यूज देण्याकरता बाकी असलेल्या क्षेत्रात जाण्यासाठी काय योजना करण्यात आल्या आहेत त्या सांगा. पुनर्भेट करण्याआधी परिच्छेद ७ आणि ८ वरील सादरतांची उजळणी करा. दोन्ही परिच्छेदांचे प्रात्यक्षिक दाखवा. आवड दाखवणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला भेटून तिच्याबरोबर बायबल अभ्यास सुरू करणे महत्त्वाचे आहे हे स्पष्टपणे सांगा. शेवटी परिच्छेद ९ आणि त्यातील वचनांची चर्चा करा.
१५ मि: “टीव्ही पाहण्याच्या सवयींवर मला ताबा कसा ठेवता येईल?” टीव्ही पाहण्यात आपला बराच वेळ घालवणाऱ्या एका तरुण बांधवाबरोबर वडील चर्चा करतात. सुरवातीला, तो बांधव म्हणतो की टीव्ही पाहण्यात काही गैर नाही. टीव्ही पाहिल्याने तेवढाच विरंगुळा मिळतो आणि आपल्यावर त्याचा विपरित परिणाम होत नाही असे तो म्हणतो. वडील त्याच्याबरोबर तरुणांचे प्रश्न या पुस्तकातील ३६ व्या अध्यायातील मुख्य मुद्द्यांची उजळणी करतात. ते त्याला सांगतात, की टीव्ही पाहण्यात बराच वेळ घालवल्याने किती अमूल्य वेळ वाया जातो. तोच वेळ व्यक्तिगत अभ्यासासाठी, क्षेत्र सेवेसाठी किंवा मंडळीतील इतर कामांसाठी खर्च करता आला असता. वडिलांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल तरुण बांधव आभार व्यक्त करतो व म्हणतो, की त्याच्या आध्यात्मिक लाभासाठी तो टीव्ही पाहण्यात अधिक वेळ घालवण्याची आपली सवय सोडून द्यायचा प्रयत्न करील.
गीत क्र. २२ (१३०) व समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर ४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ४ (४३)
१० मि: स्थानीय घोषणा. “आन्सरींग मशीनला तुम्ही काय उत्तर द्याल.”
१५ मि: किंगडम न्यूज क्र. ३६ चे वितरण करताना आलेले अनुभव. क्षेत्र यशस्वीरीत्या कसे पूर्ण केले ते सांगा. मंडळीतील कोणी पहिल्यांदाच क्षेत्र सेवेत गेले होते का? घरमालकांनी काढलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल सांगा. काही प्रचारकांना बायबल अभ्यास सुरू करता आले का? असल्यास, त्यांना त्याविषयी सांगायला किंवा मग त्याचे प्रात्यक्षिक दाखवायला सांगा. आवड दाखवली आहे अशांची अधिक रुची वाढवण्याची आठवण सर्वांना करून द्या.
२० मि: “समयोचित भाषण.” श्रोत्यांबरोबर चर्चा आणि प्रात्यक्षिक. पुष्कळांना वाटते, की त्यांना संभाषण सुरू करता येत नाही. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याकरता आपल्या अंगी विशिष्ट कला असली पाहिजे तरच लोक आपले बोलणे ऐकतील असा पुष्कळांचा चुकीचा समज आहे. आपण सर्व जण मग ते नवीन असोत किंवा तरुण प्रचारक असोत, चांगली तयारी केल्यास चर्चा करू शकतो. सुचवलेल्या सादरतांची उजळणी करा, त्या किती सोप्या आहेत यावर लोकांचे लक्ष केंद्रित करा आणि दोन किंवा तीन प्रचारकांना त्यांचे प्रात्यक्षिक दाखवायला सांगा. मार्च १९९८ ची आमची राज्य सेवा यात पृष्ठ ८ वरील अतिरिक्त सादरता आहेत. सर्वांना सकारात्मक मनोवृत्ती बाळगण्याचे उत्तेजन द्या. यामुळे सेवेत त्यांना आनंद मिळेल.
गीत क्र. २९ (२२२) व समाप्तीची प्रार्थना.