आन्सरींग मशीनला तुम्ही काय उत्तर द्याल
घरात नसलेल्या लोकांना भेटण्याचे किंवा आपण साक्षीकार्यासाठी जाऊ शकत नाही अशा क्षेत्रांमध्ये लोकांशी बोलण्याचे एक उत्तम व प्रभावकारी साधन म्हणजे टेलिफोन. परंतु, आजकाल पुष्कळ लोक फोनवर बोलत नाहीत. त्यांच्याकडे आन्सरींग मशीन असते. त्यांच्याऐवजी ते आन्सरींग मशीन बोलते. अशावेळी आपण काय करू शकतो? अशावेळी फोन कट करू नका. तर, आधीच तयार केलेले व लिहून घेतलेले उत्तर फोनवर तुम्ही वाचून दाखवू शकता. पण त्याआधी घरी, अगदी स्वाभावीकपणे आणि मैत्रीपूर्ण आवाजात बोलण्याचा सराव करा. तुम्ही काय म्हणू शकता?
घरमालकाला तुम्ही राज्य सभागृहात होणाऱ्या पुढील जाहीर भाषणाचे आमंत्रण देऊ शकता. तुम्ही असे म्हणू शकता: “मी फोन केला तेव्हा तुम्ही घरी नव्हता. तुम्हाला एक बायबल आधारित भाषण [भाषणाचा विषय सांगा] ऐकायचे असल्यास कृपया यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात या. हे भाषण ऐकायला सर्वांना आमंत्रण आहे. येथे कसलीही वर्गणी गोळा केली जात नाही.” मग, सभेचा दिवस आणि वेळ स्पष्टपणे सांगा. सभागृहाचा अचूक पत्ता, मार्ग वगैरे सर्व माहिती स्पष्ट सांगा.
सभेत तुम्हाला एखादा नवीन चेहरा दिसल्यास त्यांच्याशी जाऊन बोला, आपली ओळख करून द्या आणि त्यांचे स्वागत करा. आणि होय, मोफत गृह बायबल अभ्यासाबद्दल त्यांना सांगायला विसरू नका!