वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०० पृ. १
  • लोकांचे जीव धोक्यात आहेत!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लोकांचे जीव धोक्यात आहेत!
  • आमची राज्य सेवा—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • प्रचार करत राहा!
    आमची राज्य सेवा—२०००
  • आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • ‘प्रभूमध्ये तुला मिळालेल्या सेवेकडे लक्ष दे’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • देवासोबत काम करणं—आनंदी असण्याचं एक कारण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०००
km ९/०० पृ. १

लोकांचे जीव धोक्यात आहेत!

१ बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे, की “सर्व माणसांचे तारण व्हावे” अशी यहोवाची इच्छा आहे. पण, लोकांनी यहोवा देव आणि येशू ख्रिस्ताद्वारे येणारे त्याचे राज्य यांबद्दल चांगली मनोवृत्ती दाखवली तरच त्यांना पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याची संधी मिळू शकेल. ही चांगली मनोवृत्ती त्यांना विकसित करायची आहे तर आधी त्यांनी ‘सत्याचे परिपूर्ण ज्ञान’ घेतले पाहिजे. (१ तीम. २:३, ४) देवाचे नवे धार्मिक जग येण्याआधी या पृथ्वीवरील सर्व दुष्टाईचा समूळ नाश केला जाईल, या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. शिवाय, आपल्यावर लोकांचे जीवन वाचवण्याची एक गंभीर कामगिरी सोपवण्यात आली आहे.—मत्त. २४:१४; २८:१९, २०; रोम. १०:१३-१५.

२ इतके तातडीचे का? ‘जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीहि येणार नाही अशा मोठ्या संकटाची’ ताकीद येशूने दिली. (मत्त. २४:२१) हर्मगिदोन येईल तेव्हा या संकटाचा शेवट होईल. (प्रकटी. १६:१६) जे लोक देवाच्या राज्याची सुवार्ता ऐकणार नाहीत त्या सर्वांचा नाश होईल. मग त्या लोकांमध्ये कदाचित आपले नातेवाईक, शेजारी, आपल्याबरोबर काम करणारे लोक, आपले सहविद्यार्थी आणि आपल्या ओळखीचे लोक असू शकतील. देवाने जसे संपूर्ण मानवजातीसाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राचे, येशू ख्रिस्ताचे खंडणी बलिदान दिले तसेच आपणही ‘सर्व माणसांपर्यंत’ सुवार्ता पोहंचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवाने दिलेल्या या बलिदानावरून मानवजातीबद्दलचे त्याचे प्रेम दिसून येते. प्रचार कार्यात भाग घेण्यावरून आपलेही सर्व लोकांबद्दल प्रेम आहे हे दिसून येईल. (योहान ३:१६) देवाने जे शरणस्थान ठरवले आहे तेथे होता होईल तितक्या लोकांना आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रचार कार्यात आवेशाने व पूर्ण मनाने भाग घेण्याद्वारे आपण स्वतः रक्‍तदोषापासून वाचू शकतो.—यहे. ३३:१-७; १ करिंथ ९:१६.

३ आपला हेतू काय आहे? देवाचे वचन वारंवार प्रचार कार्याच्या महत्त्वाबद्दल सांगते. प्रेषित पौलाने म्हटले: “ख्रिस्ताची प्रीती” आपल्याला देवाच्या मार्गांनुसार चालण्याची गळ घालते. (२ करिंथ. ५:१४) तसेच, आपण प्रचार कार्यात भाग घेणे हे आपले कर्तव्य आहे, यावर टेहळणी बुरूज मासिक सतत जोर देते. शिवाय, आपली राज्य सेवा यातही आपल्याला प्रचार कार्य कसे करावे याबाबत नेहमी मार्गदर्शन दिले जाते. मंडळीतील वडील प्रचार कार्याची व्यवस्था करतात आणि त्यात भाग घेण्याचे आपल्याला उत्तेजन देतात. मंडळीतील प्रचारक आपल्याला त्यांच्यासोबत प्रचार कार्यात येण्यास बोलवतात. तसेच, आपली सादरता कशी असावी, आपण मासिके आणि इतर प्रकाशने कशी द्यावीत, पुनर्भेटी कशा कराव्यात, बायबल अभ्यास कसे घ्यावेत आणि मिळेल त्या संधीला आपण साक्ष कशी द्यावी याबाबत वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन मिळत असते. या सर्व गोष्टी आपल्याला लोकांचे जीव वाचवण्याचा आपला हेतू पूर्ण करण्यास मदत करतात!—१ करिंथ. ९:२२, २३; इफिस. १:१३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा