सेवा सभा आराखडा
सूचना: आमची राज्य सेवा यात येणाऱ्या महिन्यांतील प्रत्येक आठवडी एक सेवा सभा असेल. “देवाच्या वचनानुसार आचरण करणारे” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता मंडळ्यांना त्यांच्या सभांमध्ये काही बदल करावे लागतील. उचित असल्यास, अधिवेशनाच्या आधीच्या आठवडी सेवा सभेत १५ मिनिटांसाठी या महिन्याच्या पुरवणीतील सल्ल्याची उजळणी करा. अधिवेशनाच्या वेळी, सकाळचा आणि दुपारचा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी कोणकोणत्या विषयांवर भाषणे दिली जाणार आहेत ते पाहण्याचे सर्वांना उत्तेजन द्या. त्यामुळे रिकाम्या वेळात त्यांवर थोडेसे मनन करता येईल. आणि असे केल्यामुळे भाषणाच्या वेळी लक्ष केंद्रित करून संक्षिप्त नोट्स घेता येतील. अधिवेशनानंतर दोन ते चार आठवड्यांनी, सेवा सभेत ३० मिनिटांचा एक भाग ठेवावा ज्यात अधिवेशनाच्या भाषणांची उजळणी केली जाईल. तीन बांधव हा भाग हाताळतील. हे बांधव प्रश्न विचारतील तेव्हा प्रत्येकजण त्यावर संक्षिप्त विवेचन देऊ शकतात. या विवेचनांवरून दिसून येईल की आपण, अधिवेशनांत शिकलेल्या गोष्टी आपल्या जीवनात आणि क्षेत्र सेवेत कशाप्रकारे लागू करत आहोत. एक दोन निवडक व संक्षिप्त अनुभव सांगितले जाऊ शकतात. मंडळीतील सर्वांनी चांगली तयारी केल्यास सेवा सभेतील हा भाग मनोरंजक व बोधकारक होऊ शकतो.
सप्टेंबर ११ ने सुरू होणार सप्ताह
गीत १६ (१४३)
१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.
१५ मि: “यहोवाच्या आशीर्वादामुळे आपण श्रीमंत होतो.” एका मिनिटात प्रस्तावना देऊन प्रश्नोत्तराने लेखाची चर्चा करा.—इन्साईट, खंड २, पृष्ठ ८०४, परिच्छेद ६-७ पाहा.
२० मि: “ट्रॅक्टच्या मदतीने संभाषण सुरू करणे.” क्षेत्र सेवेत तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही चार ट्रॅक्टची चर्चा करा. प्रत्येक ट्रॅक्टमध्ये ज्याचे उत्तर आहे, असा एक प्रश्न घरमालकाला करा. तो प्रश्न विचारून संभाषण आणि मग बायबल अभ्यास कसा सुरू करता येईल यावर श्रोत्यांचे मत विचारा. दोन वेगवेगळ्या ट्रॅक्टच्या प्रदर्शनाद्वारे आणि सदर महिन्यात जे साहित्य द्यायचे आहे त्याद्वारे हे कसे करता येईल ते दाखवा.
गीत ९ (३७) व समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर १८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ७ (५१)
१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.
१५ मि: गेल्या वर्षी आपण काय केले? सेवा पर्यवेक्षकांचे भाषण. मंडळीच्या २००० सेवा वर्षातून काही ठळक मुद्द्यांची उजळणी करा. साध्य केलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल मंडळीची प्रशंसा करा. जेथे सुधारणा करण्याची गरज आहे त्या मुद्यांचा उल्लेख करा. सभांच्या उपस्थितीबाबत, बायबल अभ्यास सुरू करून ते चालू ठेवण्याबाबत, क्षेत्र सेवेत नियमित असण्याबाबत मंडळी आणखी प्रगती कशी करू शकते तेही सांगा. येणाऱ्या वर्षांत कोणती ध्येये साध्य करता येऊ शकतात ते सांगा.
२० मि: “लोकांचे जीव धोक्यात आहेत.” श्रोत्यांबरोबर चर्चा. लेखातील शास्त्रवचनांची चर्चा करा.
गीत २२ (१३०) व समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर २५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २० (९३)
१५ मि: स्थानीय घोषणा. सर्व प्रचारकांना त्यांचा सप्टेंबरचा सेवा अहवाल देण्याची आठवण करा. प्रश्न पेटीची चर्चा करा.
१५ मि: “तुम्ही पवित्र गोष्टींची कदर बाळगता का?” वडिलांचे भाषण. प्रांतीय अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी उपस्थित राहण्याच्या महत्त्वावर जोर द्या.
१५ मि: “तुम्ही जे काही करता ते सर्व प्रीतीने करावे.” प्रश्नोत्तराने चर्चा. रुम्सचे बुकींग करण्याबाबत संस्थेने पुरवलेल्या मार्गदर्शनानुसार काही बांधव वागत नाहीत तेव्हा त्यांना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो ते सांगा. स्थानिकरीत्या कोणते मुद्दे लागू होतात ते सांगा.
गीत ८ (५३) व समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर २ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १७ (१८७)
५ मि: स्थानीय घोषणा.
१० मि: आपली मासिके जुनी झाली तरी तितकीच मौल्यवान असतात. तुम्ही तुमच्याकडे जमा झालेल्या जुन्या टेहळणी बुरूज व सावध राहा! मासिकांचे काय करता? काही प्रचारक जुनी मासिके फेकून देतात. त्यांना वाटते, की जुनी मासिके कोणी घेणार नाहीत. पण, सप्टेंबर १९९३ च्या आमची राज्य सेवा यात पृष्ठ ३ वर असे म्हटले होते, की आपण ही जुनी मासिके फेकण्याऐवजी ती क्षेत्र सेवेत घेऊन जावीत व उचित प्रसंगी ती घरमालकास द्यावीत. पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी, व्यवसाय करणाऱ्यांसाठी, वृद्ध लोकांसाठी, किशोरवयीनांसाठी असलेली मासिके वेगवेगळी करा आणि संधी मिळेल तेव्हा ती सादर करा. कोणत्या व्यक्तीला कोणते लेख सादर करायचे याबद्दल प्रात्यक्षिक दाखवा. जुनी मासिके सादर करण्यात यश मिळालेल्या प्रचारकांचा अनुभव सांगा.
१५ मि: “देवाच्या वचनांकडे लक्ष द्या.” प्रश्नोत्तरे. कार्यक्रम सुरू होतो तेव्हा सर्वांनी आपापल्या जागी असणे महत्त्वाचे का आहे ते सांगा.
१५ मि: “देवाचे गौरव करणारे आचरण ठेवा.” वडील एका कुटुंबाबरोबर या लेखाची चर्चा करतात. सार्वजनिक ठिकाणी व्यवस्थितपणा, स्वच्छता, उदाहरणीय पेहराव व वागणुक कशी दाखवता येते यावर ते चर्चा करतात.
गीत ५ (४६) व समाप्तीची प्रार्थना.