सेवा सभा आराखडा
ऑगस्ट १४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २३ (२००)
१२ मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. मंडळीच्या मे महिन्याच्या क्षेत्र सेवा अहवालाबद्दल सांगा. ऑगस्ट महिन्यात केवळ दोन शनिवार-रविवार उरले आहेत, तेव्हा महिना संपण्याआधी क्षेत्र सेवेत सहभागी होण्याचे सर्वांना प्रोत्साहन द्या. शनिवारी-रविवारी होणाऱ्या क्षेत्र सेवेच्या सभेच्या वेळेविषयी सांगा.
१५ मि: “विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर.” एका मिनिटात प्रस्तावना देऊन प्रश्नोत्तराने लेखाची चर्चा करा. मंडळीचे पुस्तक अभ्यास चालवणारे आपापल्या गटाच्या क्षेत्र सेवेचे कशाप्रकारे नियोजन करू शकतात आणि सेवेत सहभाग घेण्यासाठी किंवा नियमितपणे सेवेला येण्यासाठी ज्यांना वैयक्तिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे अशा बांधवांना ते कशाप्रकारे मदत करू शकतात याबद्दल आमची सेवा पुस्तकातील पृष्ठे ४४-५ वरून समर्पक मुद्दे सांगा.
१८ मि: शालेय शिक्षणातून कोणते फायदे होतात. एक पिता आपल्या मुलांसोबत चर्चा करतो व मुलांना शालेय शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतो. (पाहा तरुणांचे प्रश्न पुस्तक, पृष्ठे १३३-९.) समाजात अराजकता वाढत चालली आहे. त्यामुळे बऱ्याच मुलामुलींना शाळेला जाणे म्हणजे एक संकट वाटू लागले आहे. शिवाय, काही मुलांना शाळेला जाण्याचा कंटाळा येतो. शालेय शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनात काहीच उपयोग नसतो असे त्यांचे म्हणणे आहे. पिता आपल्या मुलांना बायबलची काही तत्त्वे समजावून सांगतो आणि मूलभूत शिक्षण घेणे का महत्त्वाचे आहे हे त्यांना सांगतो. तो आपल्या मुलांना चांगला अभ्यास करण्याचे व वर्गात नेहमी लक्ष देऊन ऐकण्याचे प्रोत्साहन देतो.
गीत १५ (१२७) व समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट २१ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १६ (१४३)
१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. “मानवांवर प्रीती करणारा देव आजपर्यंत दुःख व अन्याय का सहन करत आहे?” या प्रश्नाचे कसे उत्तर द्यावे याविषयी चांगली तयारी केलेले प्रात्यक्षिक दाखवा. (रीझनिंग पुस्तक, पृष्ठे ३९५-६) या शनिवारी-रविवारी सर्वांना सेवेत सहभाग घेण्याचे प्रोत्साहन द्या.
१० मि: सर्व्हिस ओव्हरसियरचे भाषण. आमची राज्य सेवा डिसेंबर १९९९ अंकातील पृष्ठ ३ वरील “साहित्याचा जपून वापर करा” या लेखातील ठळक मुद्दे सांगा. विचार करून लोकांना साहित्य देण्याचे प्रचारकांना प्रोत्साहन द्या.
२५ मि: “यहोवाच्या मार्गदर्शनाचा तुम्ही फायदा करून घेत आहात का?” प्रश्नोत्तरे.
गीत ६ (४५) व समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट २८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २० (९३)
१० मि: स्थानिक घोषणा. ऑगस्टच्या क्षेत्र सेवेचा रिपोर्ट देण्याची सर्वांना आठवण करून द्या. मंडळीच्या पुस्तक अभ्यास संचालकांनी आपल्या गटातील सर्वांना रिपोर्ट दिला किंवा नाही हे जातीने विचारावे. यामुळे सप्टेंबर ६ पर्यंत सर्व रिपोट्र्सची मोजणी करणे शक्य होईल.
१५ मि: स्थानिक गरजा.
२० मि: “तरुणांनो, सभांचा पुरेपूर फायदा करून घ्या.” हा भाग वडिलांनी घ्यावा. प्रश्नोत्तर पद्धतीने चर्चा. परिच्छेद ८ वर चर्चा करताना, सभांमध्ये पूर्ण लक्ष देण्याकरता काय करता येईल यासंबंधी व्यवहारात आणण्याजोग्या काही सूचना द्याव्यात. (सावध राहा! सप्टेंबर २२, १९९८ या इंग्रजीच्या अंकातील पृष्ठे १९-२० पाहा.) आईवडिलांना आपल्या मुलांना दर सभेला येण्याची सवय लावण्याचे प्रोत्साहन द्या.—टेहळणी बुरूज, सप्टेंबर १, १९९७ अंकातील पृष्ठ २५ वरील अनुभव पाहा.
गीत ८ (५३) व समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर ४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ९ (३७)
१५ मि: स्थानिक घोषणा. प्रश्न पेटी. अनौपचारिक सेवाकार्यात आलेले अनुभव सांगण्यास प्रचारकांना विनंती करा. आमची सेवा पुस्तकातील पृष्ठे ९३-४ वरील माहिती सांगा आणि या पद्धतीनेही सेवेत सहभागी होण्याचे महत्त्व सर्वांना पटवून द्या.
१० मि: हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. टेहळणी बुरूज, नोव्हेंबर १५, १९९६ अंकातील पृष्ठे २२-३ वरील माहितीवर आधारित वडिलांचे भाषण.
२० मि: “तुम्ही सत्यात टिकून आहात का?” भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. ख्रिस्ती सेवेत टिकून राहण्यात आपण कितपत यशस्वी ठरत आहोत याविषयी सर्वांना आत्मपरीक्षण करण्याचे प्रोत्साहन द्या. आपल्यात काही कमतरता किंवा दोष असल्यास आध्यात्मिकरित्या स्वतःला दृढ करण्याकरता काय करावे हे सांगा. टेहळणी बुरूज, ऑक्टोबर १, १९९९ अंकातील पृष्ठे २०-१ वरील परिच्छेद १७-२१ यांत दिलेल्या मुद्द्यांचा समावेश करा. सत्यात बऱ्याच वर्षांपर्यंत टिकून राहिलेल्या दोन किंवा तीन प्रचारकांना विचारा की ते कशामुळे टिकून राहू शकले.
गीत ६ (४५) व समाप्तीची प्रार्थना.