वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०० पृ. १
  • तुम्ही सत्यात टिकून आहात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही सत्यात टिकून आहात का?
  • आमची राज्य सेवा—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • धीर—ख्रिश्‍चनांसाठी आवश्‍यक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • “धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • यहोवासारखा धीर धरा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • आनंद—देवाकडून मिळवता येणारा गुण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०००
km ८/०० पृ. १

तुम्ही सत्यात टिकून आहात का?

१ “माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्‍या कशानेहि होत नाही.” (३ योहा. ४) योहानाने ज्यांना सत्याचे शिक्षण दिले होते ते त्याच्या मुलांसारखे होते. ही मुले सत्यात टिकून आहेत हे जाणून त्याला अत्यंत आनंद झाला. आपला स्वर्गीय पिता जेव्हा पृथ्वीवर त्याच्या लाखो सेवकांना ‘सत्यात चालताना’ पाहात असेल तेव्हा त्याला किती आनंद होत असेल!—नीति. २३:१५; २७:११.

२ देवाची संघटना ख्रिस्ती कार्यात सातत्याने प्रगती करत आहे; पण या संघटनेतील काही लोकांचा उत्साह थोडा मंदावला आहे. या लोकांनी सत्य शिकले तेव्हा ते अतिशय उत्साही होते. पण जसजशी वर्षे उलटली तसतसे ते शिष्य बनवण्याच्या कार्यात धीमे होत गेले आहेत. आता ते या कार्यात क्वचितच भाग घेतात.

३ काही जणांच्या बाबतीत हे समजण्याजोगे आहे. कारण ते शारीरिक दुर्बलतेमुळे किंवा म्हातारपणामुळे आता पूर्वीसारखे कार्य करू शकत नाहीत. पण ते अजूनही सत्यात टिकून आहेत. याबद्दल त्यांची खरे तर प्रशंसा केली पाहिजे. कारण ते आपल्या परीने होईल तितके करत आहेत. पण देवाला आपले जीवन समर्पित केलेल्या प्रत्येकाने स्वतःला विचारून पाहावे की ‘माझ्या जीवनात देवाच्या कार्याला कोणते स्थान आहे? आध्यात्मिक दृष्ट्या मी “कोमट” झालो का की अजूनही मी “नेटाने यत्न” करत आहे?’ (प्रकटी. ३:१५, १६; लूक १३:२४) आपण सर्वांनी आपापल्या सेवेविषयी प्रार्थनापूर्वक विचार केला पाहिजे व जेथे सुधारणेची गरज आहे तेथे सुधारणा केली पाहिजे. आपण नेहमी आठवणीत ठेवले पाहिजे की ‘सत्कृत्य करणाऱ्‍या प्रत्येकाला गौरव, सन्मान व शांती मिळेल’ असे यहोवाने आश्‍वासन दिले आहे.—रोम. २:१०.

४ कसे टिकून राहायचे: येशू कशाप्रकारे टिकून राहिला? पौल याचे उत्तर देतो: “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.” (इब्री. १२:१-३) भविष्यातील आनंदावर लक्ष केंद्रित केल्यामुळेच येशू त्याच्यासमोर आलेल्या सर्व परीक्षांना तोंड देऊ शकला. आपण देखील आपल्यासमोर असलेले आनंदी प्रतिफळ नेहमी डोळ्यापुढे ठेवले तर सत्यात टिकून राहू शकू. (प्रकटी. २१:४, ७; २२:१२) आपण जेव्हा मनःपूर्वक वैयक्‍तिक अभ्यास करतो, नियमित सभांना उपस्थित राहतो आणि निरंतर प्रार्थना करतो तेव्हा यहोवा आपल्याला आध्यात्मिक शक्‍ती देतो. यामुळे यहोवाने सोपवलेले कार्य सातत्याने करण्यास आपल्याला साहाय्य मिळते.

५ आपले सेवक सत्यात टिकून आहेत हे पाहून यहोवाला अत्यंत आनंद होतो. तेव्हा निरंतर ‘सत्यात चालत राहून’ आपण त्याचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा