प्रश्न पेटी
◼ मंडळीच्या प्रचाराचे क्षेत्र दाखवणारा मोठा नकाशा राज्य सभागृहात लावला जावा का?
हो, मंडळीच्या प्रचार क्षेत्राचा मोठा नकाशा फ्रेम करून राज्य सभागृहाच्या भिंतीवर लावण्यात यावा. घोषणा इत्यादी ज्या बोर्डावर लावल्या जातात त्यावर हा नकाशा लावू नये. मंडळीला नेमून दिलेल्या सबंध क्षेत्राची हद्द तसेच प्रत्येक लहानलहान क्षेत्राच्या क्रमांकासहित त्याच्या हद्दी या नकाशावर दाखवल्या जाव्यात. एकाच सभागृहात सभा चालवणाऱ्या दोनतीन मंडळ्या असल्यास या प्रत्येक मंडळीचे क्षेत्र नकाशावर दाखवले जावे. यामुळे प्रचारकांना आणि नवीन लोकांनाही आपण कोणत्या मंडळीच्या क्षेत्रात राहतो हे समजेल. तसेच नकाशावर मंडळीच्या पुस्तक अभ्यासाची ठिकाणे दाखवल्यास, या लोकांना आपापले पुस्तक अभ्यासाचे ठिकाण शोधणे सोपे जाईल. नकाशातील काही माहिती जुनी झाली असल्यास वेळोवेळी नकाशामध्ये आवश्यक बदल करण्यात यावेत.
राज्य सभागृहात हा नकाशा लावल्यामुळे प्रचारकांना वैयक्तिक क्षेत्र मागून घेण्याचे प्रोत्साहन मिळते. तसेच आपल्या घराजवळचे क्षेत्र मागून घेऊ इच्छिणाऱ्यांनाही या नकाशामुळे मदत होते. क्षेत्र सेवेच्या आधी घेतल्या जाणाऱ्या सभांमध्येही हा नकाशा उपयोगी पडतो कारण ही सभा घेणारे बांधव, प्रचारकांच्या प्रत्येक गटाला कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे हे नकाशावर दाखवू शकतात. यामुळे वेळ वाया जात नाही.
हा नकाशा पाहणाऱ्यांना दाखवून देईल की या मंडळीत राज्याचा संदेश घोषित करण्याचे कार्य सुनियोजित पद्धतीने केले जात आहे.—लूक ९:६.