वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०० पृ. १
  • “जागृत राहा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “जागृत राहा”
  • आमची राज्य सेवा—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • “जागृत राहा”!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • “अंतसमया”त जागृत राहणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • जागृत राहणारे ते धन्य!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • निकडीची भावना टिकवून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०००
km ५/०० पृ. १

“जागृत राहा”

१ आपण या युगाच्या शेवटल्या दिवसांत राहात आहोत हे ओळखण्याकरता येशूने काही चिन्हे सांगितली होती. या चिन्हांचे वर्णन केल्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “जागृत राहा.” (मार्क १३:३३) ख्रिस्ती लोकांनी जागृत राहणे का गरजेचे आहे? कारण मनुष्य इतिहासाच्या सर्वात भयंकर काळात आज आपण जगत आहोत. आध्यात्मिक दृष्ट्या, ही वेळ डुलकी घेण्याची मुळीच नाही. कारण, आपण आळस केला तर या शेवटल्या काळात यहोवाने आपल्याला जे अत्यंत महत्त्वाचे काम दिले आहे त्याकडे साहजिकच आपले दुर्लक्ष होईल. आपण कोणत्या कामाबद्दल येथे बोलत आहोत?

२ यहोवाने त्याच्या लोकांना सबंध पृथ्वीवर त्याच्या राज्याविषयीची सुवार्ता सांगण्याचे काम दिले आहे. हे काम महत्त्वाचे आहे, कारण देवाच्या राज्याशिवाय मानवजातीकरता आणखी कोणतीच आशा नाही. हे काम आपण देवाच्या संस्थेच्या मार्गदर्शनानुसार प्रामाणिकपणे करत राहिलो तर आपण दाखवून देऊ की आपण खरे ख्रिस्ती आहोत; आपण या काळाचे गांभीर्य ओळखले आहे; आणि, लोकांना “सार्वकालिक जीवनाची वचने” सांगून त्यांनाही मदत करण्यास आपण उत्सुक आहोत. (योहा. ६:६८) या अत्यंत महत्त्वाच्या कार्यात आपला उत्साही सहभाग असेल, तरच आपण आध्यात्मिकरित्या जागृत आहोत असे म्हणता येईल.

३ प्रचार करण्यामागची प्रेरणा: आपण स्वतःला यहोवाचे साक्षीदार म्हणवतो, त्याअर्थी आपण साक्षकार्यात उत्साहाने सहभाग घेतलाच पाहिजे. ‘देवावर आणि लोकांवर माझे प्रेम आहे म्हणून मी प्रचार कार्य करतो,’ अशी आपल्या सर्वांची भावना असली पाहिजे. (१ करिंथ. ९:१६, १७) लोकांना देवाच्या राज्याचा संदेश सांगितल्यामुळे आपण स्वतःचाच नव्हे, तर आपला संदेश ऐकणाऱ्‍यांचाही जीव वाचवतो. (१ तीम. ४:१६) देवाचे राज्य हेच मनुष्याकरता सर्वात उत्तम सरकार आहे याची आपल्याला खात्री आहे; आणि म्हणून, जोपर्यंत यहोवाची इच्छा आहे तोपर्यंत या राज्याचा प्रचार आपल्याला होता होईल तितक्या नियमितपणे करण्याचा आपण पक्का निर्धार करू या.

४ हे कार्य उत्साहाने करत राहण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे—हे कार्य सुरू असतानाच मोठ्या संकटाची सुरवात होणार आहे. पण तो दिवस आणि ती घटका आपल्याला ठाऊक नाही. तेव्हा सतत जागृत आणि तयार राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यहोवावर प्रार्थनाशीलपणे विसंबून राहिल्याने आपण हे यशस्वीपणे करू शकतो. (इफिस. ६:१८) आज प्रचार कार्य अभूतपूर्व प्रमाणावर केले जात आहे. पण लवकरच तो दिवस येईल जेव्हा मनुष्याच्या इतिहासातले हे सर्वात व्यापक असे प्रचार कार्य शेवटी संपुष्टात आलेले असेल.

५ येशूने दिलेल्या आज्ञेचे विश्‍वासूपणे पालन करा. “जागृत राहा.” पूर्वी कधीही नव्हते इतके हे आज महत्त्वाचे आहे. हे ओळखून उत्साहाने कार्यात सहभाग घ्या. प्रत्येक दिवशी आध्यात्मिकरित्या सावध, जागृत आणि यहोवाच्या सेवेत उत्साही राहण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. होय, आपणास हेच प्रोत्साहन दिले जात आहे, की ‘जागे व सावध राहा.’—१ थेस्सली. ५:६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा